VIDEO : Zomato आता ड्रोनने फूड डिलीव्हर करणार, मिनिटांत जेवण घरी पोहोचणार
ऑनलाइन ऑर्डरिंग आणि फूड डिलीव्हरी प्लॅटफॉर्म Zomato ने ड्रोनच्या माध्यमातून अन्न पदार्थ डिलीव्हर करण्याचं जाहीर केलं. ड्रोन डिलीव्हरी टेक्नोलॉजीचं यशस्वीपणे परिक्षण करण्यात आल्याचं कंपनीने सांगितलं.
मुंबई : ऑनलाइन ऑर्डरिंग आणि फूड डिलीव्हरी प्लॅटफॉर्म Zomato ने ड्रोनच्या माध्यमातून अन्न पदार्थ डिलीव्हर करण्याचं जाहीर केलं. ड्रोन डिलीव्हरी टेक्नोलॉजीचं यशस्वीपणे परिक्षण करण्यात आल्याचं कंपनीने सांगितलं. परिक्षणासाठी Zomato ने एक हाइब्रीड ड्रोनचा वापर करण्यात आला आहे. याच्या माध्यमातून 5 किलोमीटरचं अंतर 10 मिनटांमध्ये पार करता येईल. याची सर्वाधिक गती 80 किमी प्रती तास असेल. ग्राहकांपर्यंत कमी वेळात अन्न पदार्थ पोहोचावे म्हणून कंपनीने ड्रोनने फूड डिलीव्हरीची सुरुवात केली आहे.
We successfully tested a hybrid drone ?️ – fusion of rotary wing and fixed wings on a single drone; covered 5 kms in 10 mins with a peak speed of 80 kmph; with a payload of 5kgs.
Exciting times ahead!
For more details – https://t.co/e9qgGQy9ex pic.twitter.com/DbrUCmK2AW
— Deepinder Goyal (@deepigoyal) June 12, 2019
प्रदुषण कमी होईल आणि ट्रॅफीकची समस्येपासून सुटका
Zomato ने लखनऊ बेस्ड ड्रोन स्टार्टअप TechEagle ला विकत घेतल्यानंतर एका महिन्यानंतर हा ड्रोन आला. TechEagle ने जो UAV बनवला तो एक हाइब्रीड एयरक्राफ्ट आहे. ड्रोनच्या माध्यमातून फूड डिलीव्हरी करण्यात कमी वेळ लागणार आहे. त्याशिवाय प्रदूषण आणि ट्रॅफीकच्या समस्येपासूनही सुटका मिळणार आहे.
लवकरच तुमच्या घरी ड्रोनने फूड डिलीव्हरी होणार
एका आठवड्यापूर्वी रिमोट साइटवर या ड्रोनची टेस्टिंग करण्यात आली. याप्रकारचे परिक्षण हे रिमोट साईटवर केले जात असल्याचं कंपनीने सांगितलं. “आम्ही सुरक्षित डिलीव्हरी टेक्नोलॉजी विकसीत करण्यावर काम करतो आहे. या तंत्राचं आम्ही पहिलं यशस्वी परिक्षण केलं आहे. हे कुठलं स्वप्न नाही, तर लवकरच ते सत्यात उतरणार आहे”, असं Zomato चे संस्थापक दीपेंद्र गोयल यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या :