व्हिवो कंपनी (Vivo) भारतीय बाजारात एक नवा स्मार्टफोन (New Smartphone) आणण्याच्या तयारीत आहे. या चीनी कंपनीचा Vivo V25 Pro हा नवा स्मार्टफोन, 17 ऑगस्ट रोजी बाजारात लाँच होणार आहे. या नव्या स्मार्टफोनमध्ये अनेक फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स आहेत. त्याचे एक फीचर तर असे भन्नाट आहे, ते बघून तुम्ही हैराण व्हाल. या स्मार्टफोनबद्दलचा एक व्हिडीओ कंपनीने शेअर केला असून त्यामध्ये या फोनचा रंग (color changing phone) बदलताना दिसत आहे. ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये व्हिवो कंपनीने फोनच्या लॉंचची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. तसेच या व्हिडीओमध्ये रंग बदलणारा फोनही दिसत आहे.
रंग बदलणारे बॅक पॅनेल तयाक करण्यासाठी व्हिवो कंपनीद्वारे Fluorite AG Glass चा वापर करण्यात आला आहे. हे बॅक पॅनेल उन्हाच्या संपर्कात येताच त्याचा रंग बदलतो. याचे प्रात्यक्षिकही या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले आहे. यापूर्वी हेच रंग बदलणारे फीचर व्हीवो च्या Vivo V23 मध्येही दिसले होते.
No more waiting to experience the long-awaited #MagicalPhone.
Block Your Date for the launch day now!
The vivo V25 Pro is launching on 17.08.2022 at 12 PM. Know More: https://t.co/MXzJtG5Qar#vivoV25Pro #DelightEveryMoment #V25Series #LaunchingSoon pic.twitter.com/6b3QptOS9u
— Vivo India (@Vivo_India) August 11, 2022
Vivo V25 Pro स्मार्टफोनबद्दल आत्तापर्यंत बरीच माहिती समोर आली आहे. नुकतेच, प्राइसबाबाने त्याच्या रिपोर्टमध्ये सांगितले होते की, लवकरच लाँच होणारा हा स्मार्टफोन सर्टिफिकेशन साइट गीकबेंचवर दिसला होता. ज्यावरून काही स्पेसिफिकेशन्सचा अंदाज लावण्यात येईल. रिपोर्टस नुसार, या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 1300 चिपसेटसह येऊ शकतो. त्यासह माली जी 77 एमसी 99 जीपीयू वापरण्यात येईल.
Vivo V25 Pro मध्ये फनटच ओएस 12 वर आधारित ॲंड्रॉईडवर काम करेल. त्यामध्ये 12 जीबी पर्यंत रॅमचा पर्याय उपलब्ध असू शकेल. या स्मार्टफोनमध्ये बॅक पॅनेलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप पहायला मिळेल, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सेल इतका असेल. या स्मार्टफोनच्या डिस्प्लेबाबत जास्त माहिती मिळालेली नाही.