मुंबई : विवोने येत्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने या आठवड्यात ‘फ्रीडम कार्निव्हल’ सेलचं आयोजन केलं आहे. या दरम्यान विवो इंडिया ई-स्टोअरवर ऑफर्स दिली आहे. या सेलची सुरुवात सोमवार (12 ऑगस्ट) पासून झाली आहे. आज म्हणजे 14 ऑगस्ट या सेलचा शेवटचा दिवस आहे. या तीन दिवसीय सेल दरम्यान विवोच्या पॉपुलर स्मार्टफोनवर डिस्काऊंट ऑफर्स देण्यात आल्या आहेत.
या सेलसाठी विवा HDFC बँकसोबत भागीदारी केली आहे. या बँकेच्या क्रेडिट कार्ड युजर्सला 5 टक्के कॅशबॅक ऑफर दिली जाईल. तसेच EMI ट्रॅन्झॅक्शनवरही कॅशबॅक ऑफर असेल. विवो सेल दरम्यान काही निवडक क्रेडिट कार्डवर नो-कॉस्ट EMI पर्यायही दिला जात आहे.
विवोच्या फ्रीडम कार्निव्हल सेलदरम्यान Vivo Z1 Pro हा नुकताच लाँच झालेला लोकप्रिय स्मार्टफोनही या सेलमध्ये उपलब्ध आहे. पण यावर कोणतीही सूट देण्यात आलेली नाही. याऐवजी ग्राहकांना 1 हजार रुपयांचे व्हाऊचर दिले जाईल. या व्हाऊचरवर आपण शॉपिंग करु शकतो.
ट्रिपल रिअर कॅमेरे आणि 32MP सेल्फी कॅमेरावाला Vivo V15 ला सेल दरम्यान 29 हजार 990 रुपयांऐवजी 19 हजार 990 रुपयांमध्ये दिला जात आहे. त्याशिवाय एक्सेचेंज ऑफरसह अॅडिशनल 2 हजार 500 रुपयांची सूटही दिली जाणार आहे.
विवो फ्रीडम सेल दरम्यान, Vivo V15 Pro वर फ्लॅट 3 हजार रुपयांची सूट दिली जात आहे. त्यामुळे ग्राहक 26 हजार 990 रुपया ऐवजी 23 हजार 990 रुपयामध्ये खरेदी करु शकतात. या स्मार्टफोनमध्ये 32MP पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्यासह इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळते.
Vivo Y17 ऑनलाईन स्टोअरवर 18 हजार 990 रुपया ऐवजी 15 हजार 990 रुपयात विक्रीसाठी उपलब्ध आहे. तर Vivo Y15 किंमत सेलदरम्यान 15 हजार 990 ऐवजी 13 हजार 990 रुपये आहे . ग्राहकांना एक्सचेंज ऑफरमध्ये 1500 रुपयांची सूट दिली जात आहे.
विवोच्या 5000mAh बॅटरीच्या स्मार्टफोन Y12 11 हजार 990 रुपयात खरेदी करु शकता. तसेच Y91 स्मार्टफोन 10 हजार 990 रुपया ऐवजी 9 हजार 990 रुपयामध्ये विवोच्या वेबसाईटवर सेल केला जात आहे. तसेच ग्राहक एक्सचेंज ऑफरच्या माध्यमातून 1 हजार 250 रुपयांची सूट दिली जात आहे.