Vivo भारतीय मार्केटमध्ये धमाका करणार, एप्रिलपर्यंत 11 नवे स्मार्टफोन्स बाजारात दाखल होणार

Vivo X50 Pro + आणि Vivo X60 हे दोन स्मार्टफोन्स गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. हे स्मार्टफोन्स लवकरच भारतीय बाजारात दाखल होणार आहेत.

Vivo भारतीय मार्केटमध्ये धमाका करणार, एप्रिलपर्यंत 11 नवे स्मार्टफोन्स बाजारात दाखल होणार
Follow us
| Updated on: Feb 17, 2021 | 6:37 PM

मुंबई : Vivo X50 Pro + आणि Vivo X60 हे दोन स्मार्टफोन्स गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. हे स्मार्टफोन्स लवकरच भारतीय बाजारात दाखल होणार आहेत. Vivo कंपनीने या आठवड्यात कोणताही मोबाईल लाँच करण्याचे जाहीर केलेले नाही. परंतु कंपनी यावर्षी एप्रिलपर्यंत तब्बल 11 नवे स्मार्टफोन लाँच करु शकते. (Vivo may launch 11 new smartphones in India including Vivo X60 Pro+, X50 Pro+, and V21 series till April)

Vivo Vi 20 Pro हे कंपनीने लाँच केलेलं शेवटचं मोठं प्रोडक्ट होतं. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हा फोन लाँच करण्यात आला होता. Mysmartprice च्या रिपोर्टनुसार Vivo कंपनी भारतात Vivo X60 आणि Vivo X50 सिरीज लाँच करु शकते. Vivo X50 Pro+ हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसरसह लाँच केला जाऊ शकतो. ज्यामध्ये 6.56 इंचांचा डिस्प्ले देण्यात येईल. हा 120Hz रिफ्रेश रेटसह सादर केला जाणार असल्याचे बोलले जात आहे. या फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल, सोबत 4350mAh क्षमतेची बॅटरीदेखील असेल.

वीवो X60 Pro+ गेमचेंजर ठरणार?

अनेक स्मार्टफोन कंपन्या क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसरवर फोकस करत आहेत. अशातच Vivo कंपनीदेखील या प्रोसेसरसह स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करत आहे. Vivo X60 Pro + हा जबरदस्त स्मार्टफोन गेल्या महिन्यात चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. या फोनची किंमत 57,000 रुपये इतकी आहे.

Vivo X60 Pro + या स्मार्टफोनच्या फीचर्सबाबत बोलायचे झाल्यास, हा फोन अँड्रॉयड 11 वर काम करतो. या फोनमध्ये 6.56 इंचांचा फुल HD+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन 120Hz इतक्या रिफ्रेश रेटसह सादर करण्यात आला आहे. या फोनमध्ये 92.7 टक्के स्क्रीन टू बॉडी रेश्यो देण्यात आला आहे. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 देण्यात आला आहे, सोबत 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज स्पेस देण्यात आली आहे.

तसेच या फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर कॅमेरा देण्यात आला आहे. सोबत 48 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स देण्यात आली आहे. 32 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर, 8 मेगापिक्सलची पेरिस्कोप लेंसही देण्यात आली आहे. ज्यामुळे एखाद्या डिएसएलआर कॅमेराप्रमाणे फोटो काढण्यास हा फोन सक्षम आहे. सोबतच सेल्फीसाठी या फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. या फोनमध्ये 4200mAh क्षमतेची बॅटरीदेखील देण्यात आली आहे.

हेही वाचा

वर्षभरात तब्बल 4 कोटी फोनची विक्री, नंबर वन पटकावत Xiaomi चा दबदबा, टॉप 5 कंपन्या कोणत्या?

प्रतीक्षा संपली! Redmi Note 10 च्या लाँचिंगचं काऊंटडाऊन सुरु

आऊट ऑफ स्टॉक झालेला POCO चा दमदार स्मार्टफोन भारतीय मार्केटमध्ये धुमाकूळ घालण्यास परतला

(Vivo may launch 11 new smartphones in India including Vivo X60 Pro+, X50 Pro+, and V21 series till April)

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.