खिशात फक्त 101 रुपये ठेवा आणि VIVO चा फोन घेऊन या!
मुंबई : नव्या वर्षात नवा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर VIVO ने तुमच्यासाठी खास ऑफर आणली आहे. वीवो V11, वीवो V11 प्रो आणि वीवो Y95 यासह अनेक फोन फक्त 101 रुपयांच्या डाऊन पेमेंटवर खरेदी करता येणार आहेत. न्यू इयर, न्यू यू असं या ऑफरचं नाव आहे. ज्यात सहा महिन्यांचा ईएमआय आणि 101 रुपयांच्या […]
मुंबई : नव्या वर्षात नवा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर VIVO ने तुमच्यासाठी खास ऑफर आणली आहे. वीवो V11, वीवो V11 प्रो आणि वीवो Y95 यासह अनेक फोन फक्त 101 रुपयांच्या डाऊन पेमेंटवर खरेदी करता येणार आहेत. न्यू इयर, न्यू यू असं या ऑफरचं नाव आहे. ज्यात सहा महिन्यांचा ईएमआय आणि 101 रुपयांच्या डाऊनपेमेंटमध्ये फोन खरेदी करता येईल.
ऑफलाईन स्टोअरमध्ये खरेदी केलेल्या फोनवरच ही ऑफर मिळले. 20 डिसेंबर ते 31 जानेवारी या काळात ऑफरचा लाभ घेता येईल. या 41 दिवसांमध्ये 10 हजार रुपये आणि त्यापेक्षा जास्त किंमत असलेल्या फोनसाठी ही ऑफर लागू असेल.
ऑफर कशी मिळवाल?
फोन घेण्यासाठी कोणत्याही वीवो-बीएफएल पार्टनर स्टोअरमध्ये जा. पॅन कार्ड, आधार कार्ड किंवा इतर कोणतंही ओळखपत्र सोबत ठेवा, जे ईकेवायसीसाठी कामी येईल. वीवो NEX, V11, V11 प्रो, वीवो Y95, वीवो Y83 प्रो आणि Y81-4G यापैकी कोणताही स्मार्टफोन निवडा, जो तुम्हाला खरेदी करायचाय.
फोन खरेदी करण्यासाठी 101 रुपयांचं डाऊनपेमेंट करा आणि रिटेलरकडे केवायसी कागदपत्र जमा करा. ऑफरनुसार, मोबाईलची एकूण किंमत सहा हफ्त्यांमध्ये विभागून दिली जाईल, ज्यामुळे तुम्हाला एकदाच पैसे न भरता सहा महिन्यांमध्ये फोनची रक्कम फेडता येईल.