‘विवो Y95’ भारतात लाँच, तब्बल 20 मेगापिक्सेल कॅमेरा
मुंबई :चायनीज मोबाईल कंपनी विवोने नवीन स्मार्टफोन ‘VIVO Y95’ लाँच केला आहे. या नवीन स्मार्टफोनमध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इनबिल्ड स्टोरेज आहे. विवोच्या या मोबाईलचे खास वैशिष्ट्य म्हणजे 20 मेगापिक्सेलचा एआय कॅमेरा आणि फूल व्ह्यू डिस्प्ले दिला आहे. लाँच करण्यात आलेल्या नवीन VIVO Y95 फोनची किंमत 16,990 रुपये आहे. फोन ऑफलाईन स्टोअर आणि विवो […]
मुंबई :चायनीज मोबाईल कंपनी विवोने नवीन स्मार्टफोन ‘VIVO Y95’ लाँच केला आहे. या नवीन स्मार्टफोनमध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इनबिल्ड स्टोरेज आहे. विवोच्या या मोबाईलचे खास वैशिष्ट्य म्हणजे 20 मेगापिक्सेलचा एआय कॅमेरा आणि फूल व्ह्यू डिस्प्ले दिला आहे.
लाँच करण्यात आलेल्या नवीन VIVO Y95 फोनची किंमत 16,990 रुपये आहे. फोन ऑफलाईन स्टोअर आणि विवो इंडिया स्टोअरवर उपलब्ध असून फ्लिपकार्ट, अमेझॉन आणि पेटीएमवर 26 नोव्हेंबर (सोमवारी) पासून ऑनलाईन खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. मोबाईल स्टार ब्लॅक आणि पर्पल रंगात मिळणार आहे.
VIVO Y95 चे स्पेसिफिकेशन
- 6.22 इंचाचा डिस्प्ले
- क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 439 प्रोसेसर
- रॅम 4 जीबी, इनबिल्ड स्टोरेज 64 जीबी
- मायक्रो एसडीकार्डच्या मदतीने 256 जीबीपर्यंत वाढवू शकतो.
- ड्यूअल कॅमेरा सेटअप आणि फ्लॅश
- रिअर कॅमेरा प्रायमरी13, सेकंडरी 2 मेगापिक्सल
- फ्रंट कॅमेरा (सेल्फि) 20 मेगापिक्सल
- फेस ब्यूटी, पॅनारोमा, एआई स्टिकर्स आणि पोर्टेट मोड
- 4030mAh बॅटरी क्षमता
- अॅड्राईड 8.1 ऑरियो बेस फनटच सिस्टम
- VIVO Y95 वज़न 163.5 ग्राम आहे