मुंबई : विवोने नुकतेच आपला नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन (flagship smartphone) विवो एक्स 80 (Vivo X80) लाँच केला होता. आता हा स्मार्टफोन भारतात विक्रीसाठी तयार आहे. नवीन विवो एक्स सिरीज फोन नुकतेच देशात तब्बल 54 हजार 999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतींसह लाँच केले होते. या फोनला घेउ इच्छूक ग्राहक या फोनला एक्सचेंज आणि बँक ऑफर्ससोबत बर्याच कमी किमतीत खरेदी करु शकणार आहेत. हँडसेटमध्ये हुडच्या खाली एक प्रमुख मीडियाटेक चिपसेट (MediaTek chipset) देण्यात आलेला आहे. तसेच कॅमेरात एक चांगला सेटपॅक देण्यात आला आहे. भारतात विवो एक्स 80 ची किंमत 54 हजार 999 असून हा स्मार्टफोन 128 जीबी स्टोरेज आणि 8 जीबी रॅम मॉडेलसह उपलब्ध आहे. जर तुम्ही काही अटी पूर्ण केल्यास हा फोन तुम्हाला 50 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येईल.
एचडीएफसी बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 5 हजार रुपये इंस्टेंट डिस्काउंट ऑफर मिळणार आहे. यामुळे या स्मार्टफोनची किंमत 50 हजार रुपयांपर्यंत येउ शकते. फ्लिपकार्टवर तुम्ही जुन्या फोनला एक्सचेंज करुन या स्मार्टफोनवर 32 हजार रुपयांपर्यंतची सुट मिळवून निवडक मॉडेलवर अतिरिक्त दोन हजार रुपयांचे डिस्काउंट मिळवू शकणार आहात. डिस्काउंट ऑफर ही तुमच्या सध्याच्या मोबाईलच्या स्टेटसच्या आधारावर करण्यात येणार आहे.
विवो एक्स 80 या स्मार्टफोनला नुकतेच भारतात फ्लॅगशिप मीडियाटेक 9000 प्रोसेसरसोबत घोषित करण्यात आले होते. डिव्हाईसमध्ये 4500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ज्या माध्यमातून 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट होतो. सोबत 6.78 इंचाची एचडी प्लस स्क्रीन देण्यात आली आहे. ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला असून त्यात 50 मेगापिक्सलचे प्रायमरी सेंसर, 12 मेगापिक्सलचा केमेरा आणि 12 मेगापिक्सलचे सेंसर समाविष्ट आहे. फ्रंटला 32 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
जर तुम्ही बँक आणि एक्सचेंज ऑफरसह जवळपास 45 हजार रुपयांमध्ये विवो एक्स 80 खरेदी करत असाल तर ही एक चांगली डील आहे. या स्मार्टफोनच्या माध्यमातून ग्राहकांना एक चांगला कॅमेरा एक्सपिरियंस मिळणार आहे. यात क्वालकोमचा स्नॅपड्रॅगन 8 जेन 1 एसओसी नसले तरी मीडियाटेकची फ्लॅगशिप 9000 चिप खूप पॉवरफल आहे. या माध्यमातून एक चांगल गेमिंग एक्सपिरीयंस युजर्सना मिळणार आहे. अनेक ब्रँडमध्ये 80W फास्ट चार्जरला बंडल करणे सुरु करण्यात आले आहे. आणि नवीन विवो एक्स 80 देखील यासह उपलब्ध आहे. या माध्यमातून काहीच मिनिटांमध्ये बॅटरी जलद पध्दतीने चार्ज करण्यास मदत होत असते.