Vodafone-Idea ची ढासू ऑफर, 50 रुपयांच्या डिस्काऊंटसह दररोज 1.5GB डेटा मिळणार

गेल्या काही महिन्यांपासून टेलिकॉम कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.

Vodafone-Idea ची ढासू ऑफर, 50 रुपयांच्या डिस्काऊंटसह दररोज 1.5GB डेटा मिळणार
Follow us
| Updated on: Feb 03, 2021 | 2:59 PM

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून टेलिकॉम कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता वोडाफोन-आयडिया (Vodafone-Idea), रिलायन्स जियो आणि एयरटेलसारख्या कंपन्या त्यांचे रिचार्ज प्लॅन अधिक स्वस्त करत आहेत. तसेच काही कंपन्या रिचार्ज प्लॅनसोबत ऑफर्स, डिस्काऊंट, एक्स्ट्रा बेनिफिट्सही देत आहेत. अशातच आता वोडाफोन-आयडियाने (VI) जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवीन ऑफर सादर केली आहे. (Vodafone-Idea discount offer get discount of 50 rupees on rs 249 recharge plan)

VI ने त्यांच्या 249 रुपयांच्या प्रिपेड प्लॅनवर 50 रुपयांचा डिस्काऊंट देण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच युजर्स हा रिचार्ज प्लॅन आता केवळ 199 रुपयांमध्ये खरेदी करु शकतील. युजर्सना या प्लॅनमध्ये दररोज 1.5 जीबी डेटा, अनलिमिटेड कॉल्स आणि दररोज 100 SMS मिळतील. तसेच या प्लॅनसोबत युजर्सना वीकेंड डेटा रोल-ओवरचा पर्यायदेखील मिळेल. या सुविधेमुळे युजर्स त्यांचा दररोजच्या 1.5 जीबी पैकी उरलेले डेटा आठवड्याच्या शेवटी (विकेंड) वापरू शकतात. सोबतच कंपनीने या रिचार्ज प्लॅनसोबत Vi मुव्हिज आणि टीवीचा अॅक्सेसही दिला आहे.

दरम्यान, कंपनीने असेही सांगितले आहे की, काही ठराविक ग्राहकांनाच या 249 रुपयांच्या प्लॅनवर 50 रुपयांचा डिस्काऊंट मिळेल. ज्या ग्राहकांनी मागील 90 दिवसात कोणताही अनलिमिटेड रिचार्ज प्लॅन वापरला नसेल केवळ तेच युजर्स या डिस्काऊंट ऑफरसाठी पात्र ठरतील. ही ऑफर क्लेम करण्यासाठी (मिळवण्यासाठी) ग्राहक Vi App किंवा MyVi.in ही वेबसाईट वापरु शकतात. या अॅप किंवा वेबसाईटवर तुम्हाला ‘For You’ किंवा ‘Recommended’ सेक्शनमध्ये जावे लागेल, तिथे जर ही ऑफर कंपनीने तुम्हाला दिली असेल तर तुम्ही ही ऑफर क्लेम करु शकता.

Vi च्या ग्राहकांना मिळणार 50 जीबी एक्स्ट्रा डेटा

व्होडाफोन कंपनीने नव्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक नवा प्लॅन आणला आहे. या प्लॅननुसार व्होडाफोन (Vodafone) कंपनीकडून आपल्या 2,595 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये बोनस डेटा दिला जाणार आहे. व्होडाफोन-आयडियाच्या मोबाईल अ‍ॅपवरुन तुम्ही या प्लॅनचा रिचार्ज करु शकता. व्होडाफोन-आयडियाच्या मोबाईल अ‍ॅपवरुन रिचार्ज केल्यास ग्राहकांना बोनस डेटा मिळणार आहे. कंपनीच्या संकेतस्थळावरुन रिचार्ज करणाऱ्यांसाठी ही ऑफर उपलब्ध नाही. 2,595 रुपयांच्या या प्रीपेड प्लॅनची वैधता एका वर्षाची आहे. त्यामध्ये आता ग्राहकांना 50 जीबी इतका बोनस डेटा मिळेल.

बोनस डेटा एक वर्ष मिळणार का?

व्होडाफोन-आयडियाच्या मोबाईल अ‍ॅपवर 50 जीबी एक्स्ट्रा डेटाची ऑफर दिसत आहे. मात्र, हा एक्स्ट्रा डेटा कधीपर्यंत मिळणार, याविषयी कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे हा 50 जीबी एक्स्ट्रा डेटा काही दिवसांपुरताच मर्यादित असेल, असा अंदाज आहे. सध्या 2,595 रुपयांच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये 2 जीबी डेटा एफयूपी लिमिटसह मिळतो. या प्लॅनमध्ये देशभरात कुठेही अनलिमिटेड व्हॉईस कॉलची सुविधा आहे. तसेच प्रत्येक दिवसाला 100 एसएमएस मोफत आहेत. याशिवाय, हा प्लॅन घेणाऱ्यांना ZEE 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मचे एका वर्षाचे सबस्क्रिप्शनही मोफत मिळते.

ग्राहकांना मिळणार एकूण 780 जीबी डेटा

सध्या 2,595 रुपयांच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना 730 जीबी डेटा दिला जातो. मात्र, बोनस डेटाचा विचार केल्यास एकूण 780 जीबी डेटा ग्राहकांना मिळेल. व्होडाफोन-आयडियाच्या मोबाईल अ‍ॅपवरून रिचार्ज मारल्यावरच ग्राहकांना एक्स्ट्रा 50 जीबी डेटा मिळेल. या प्लॅनमध्ये वीकेंड रोलओव्हर डेटा ही ऑफरही आहे. त्यामुळे तुम्ही आठवडाभरात वाचवलेला डेटा वीकेंड म्हणजे शनिवारी आणि रविवारी वापरु शकता.

हे वाचा

25 लाख एअरटेल ग्राहकांचा डेटा लीक; आधार कार्ड क्रमांक आणि गोपनीय माहिती हॅकर्सच्या हाती?

केवळ 129 रुपयांमध्ये BSNL कडून Zee5, SonyLIV आणि Voot चं सब्सक्रिप्शन

(Vodafone-Idea discount offer get discount of 50 rupees on rs 249 recharge plan)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.