टेलिकॉम युजर्ससाठी महत्त्वाची बातमी, प्रीपेड प्लॅन्स पुन्हा महागणार
स्मार्टफोन युजर्सना पुन्हा एकदा महागाईचा सामना करावा लागणार आहे. दोन महिन्यांपूर्वी सर्व टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या प्रीपेड आणि पोस्ट पेड प्लॅन्सच्या किंमती 15 ते 25 टक्क्यांनी वाढवले होते. आता पुन्हा एकदा टेलिकॉम युजर्सना दरवाढीचा सामना करावा लागणार आहे.
1 / 5
स्मार्टफोन युजर्सना पुन्हा एकदा महागाईचा सामना करावा लागणार आहे. दोन महिन्यांपूर्वी सर्व टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या प्रीपेड आणि पोस्ट पेड प्लॅन्सच्या किंमती 15 ते 25 टक्क्यांनी वाढवले होते. आता पुन्हा एकदा टेलिकॉम युजर्सना दरवाढीचा सामना करावा लागणार आहे. Vodafone-Idea कंपनी आपले रिचार्ज प्लॅन पुन्हा एकदा महाग करू शकते.
2 / 5
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, कंपनीच्या एका टॉप-लेव्हल अधिकाऱ्याने सांगितले की, या वर्षी पुन्हा एकदा दर (टॅरिफ) सुधारित केले जाऊ शकतात, परंतु नवे दर गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये करण्यात आलेली दरवाढ आणि बाजाराच्या प्रतिक्रियेवर आधारित असतील.
3 / 5
Vodafone Idea चे MD आणि CEO रविंदर ठक्कर म्हणाले की, कंपनीने 4G सेवा वापरणार्या युजर्सनुसार एक महिन्याची सर्व्हिस व्हॅलिडिटी देणार्या सर्वात किफायतशीर प्लॅनची किंमत 99 रुपये निश्चित केली आहे, जी फार महाग नाही. यासोबतच या वर्षीही प्लॅन महाग होऊ शकतात, अशी माहितीही त्यांनी दिली.
4 / 5
व्होडाफोन आयडियाला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे, कारण त्यांची ग्राहक संख्या खूपच कमी असल्याचे सांगितले जात आहे.
5 / 5
गेल्या आठवड्यात, कंपनीने सांगितले की डिसेंबर 2021 मध्ये संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत, कंपनीचा एकूण तोटा वाढून 7,230.9 कोटी रुपये झाला आहे, जो एका वर्षापूर्वी याच तिमाहीत 4,532.1 कोटी रुपये होता.