व्हीआयचा सुपर हिरो प्लॅन, ३६५ दिवसांसाठी अनलिमिटेड डेटा आणि ॲमेझॉन प्राईम सब्सक्रिप्शन
तुम्ही जर व्हीआय युजर असाल तर हा रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी चांगला ठरू शकतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला एकापेक्षा एक फायदे मिळत आहेत. प्लॅनमध्ये अनलिमिटेड डेटा घेऊन ओटीटी प्लॅटफॉर्मचे सब्सक्रिप्शनही मोफत मिळते. व्हीआयच्या 365 दिवसांच्या प्लॅनबद्दल संपूर्ण तपशील येथे वाचा.
टेलिकॉम कंपन्यांमधील व्हीआय ही भारतातील तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. व्हीआय ही त्यांच्या ग्राहकांसाठी नवनवीन प्लॅन लाँच करत असते. अशातच तुम्ही जर व्होडाफोन युजर असाल तर या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या एकापेक्षा एक जास्त फायदा घेता येणार आहे. या प्लॅनमध्ये युजरने मनोरंजनाचा पुरेपूर वापर करावा यासाठी कंपनीने या प्लॅनमध्ये तुम्हाला ३६५ दिवसांचा वैधतेत अनलिमिटेड देता आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग देतात आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे व्होडाफोनच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला एका वर्षासाठी ॲमेझॉन प्राईमचे सब्सक्रिप्शन मिळू शकते.
व्हीआयचा 3799 रुपयांचा प्लॅन
व्हीआयच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला एक वर्षासाठी ॲमेझॉन प्राइम लाइटचे सब्सक्रिप्शन मिळते. 365 दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2 जीबी डेटा आणि 90 दिवसांसाठी अतिरिक्त 50 जीबी डेटाचा फायदा मिळू शकतो. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएस मोफत मिळतात. तसेच तुम्हाला हायस्पीड डेटा मिळू शकतो.
जर तुम्हाला वार्षिक प्लॅनऐवजी 84 दिवसांची वैधता असलेला प्लॅन घ्यायचा असेल तर तुम्ही तो देखील घेऊ शकता. या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड डेटाचा ही फायदा मिळतो.
859 रुपयांचा प्लॅन
व्होडाफोन आयडिया यांच्या ८४ दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये दररोज १.५ जीबी डेटा मिळतो. याशिवाय तुम्हाला दररोज १०० एसएमएस मोफत वापरता येतील. डेटाशिवायही तुम्ही ऑफलाइन मेसेजचा आनंद घेऊ शकता. या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगदेखील मिळते.
९७९ रुपयांच्या प्लॅनमध्ये १५ हून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्म
व्हीआयच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला ८४ दिवसांची वैधता मिळत आहे. तसेच तुम्हाला 15 पेक्षा जास्त ओटीटी प्लॅटफॉर्मचे सब्सक्रिप्शन मिळू शकते. या प्लॅनमध्ये तुम्ही दररोज २ जीबी डेटासह दररोज १०० एसएमएस मोफत मिळू शकतात. तसेच तुम्ही व्हीआय सिनेमांचा ही आनंद घेऊ शकता. यावर तुम्हाला अनेक सिनेमे मोफत पाहायला मिळतील.