Instagram Tips and Tricks: आजकाल प्रत्येक जण सोशल मीडियाचा वापार करताना आपल्याला दिसतो. आजकालची युवा पिढचा कल सोशल मीडियातील इंस्टाग्राम हे अॅप वापरण्याकडे जास्त आहे. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणूकीला पाहता या अॅप्सनी आपल्या युजर्सवर काही बंधने टाकली आहेत. सोशल मीडियावर अनेक जण आपल्या भावना व्यक्त करता असतात. अशातच बऱ्याच वेळा आपल्यासा न आवडणारा कंटेंट समोर येतो.
पण जर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कंटेंट इन्स्टाग्रामवर पाहायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला काही सोप्या गोष्टी कराव्या लागतील. वापरकर्त्यांना एक्सप्लोर पेजला एक्सप्लोर किंवा कस्टमाइझ करावे लागेल. तुम्हाला तुमचा आवडीचा कंटेंट पाहायाचा असेल तर पुढील सोप्या स्टेप्स करा.
– Android किंवा iOS वर जा आणि स्मार्टफोनवरील तुमची हिस्ट्री क्लिअर करा
– त्यानंतर Instagram वर एक नवीन विन्डो दिसेल.
– त्यावर यूजर्स त्यांची आवडती सामग्री सेट करू शकतात.
– नंतर प्रोफाइल विभागात जा आणि उजवीकडे हॅम्बर्गर मेनूवर क्लिक करा.
– यानंतर, सेटिंग्जमधील सुरक्षा पर्यायांवर क्लिक करा.
– यामध्ये तुम्हाला डेटा आणि हिस्ट्री लिस्टमध्ये सर्च हिस्ट्री चा पर्याय मिळेल.
– त्यावर क्लिक केल्यानंतर Clear All चा पर्याय दिसेल.
– त्यावर क्लिक करा आणि नंतर पॉप-अप क्लिअर ऑल वर क्लिक करा.
– त्यानंतर सर्च हिस्ट्री क्लिअर होईल आणि इन्स्टाग्रामवरील कंटेंट रिसेट होईल.
– त्यानंतर युजरला त्याला हवा असलेला कंटेंट बघायला मिळेल.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामने आणखी एक नवीन फीचर जाहीर केले होते. Instagram Tiktok Inspired फीचर टेक्स्ट-टू-स्पीच आणि व्हॉइस इफेक्ट जोडेल. इंस्टाग्रामचे टेक्स्ट-टू-स्पीच वैशिष्ट्य वापरकर्त्यांना व्हिडिओमध्ये त्यांचा आवाज वापरण्याची परवानगी देते.
व्हॉईस इफेक्ट फीचर
इंस्टाग्रामने व्हॉईस इफेक्ट फीचर देखील जोडले आहे, या नवीन फीचरमुळे विविध आवाजांसह व्हिडिओ बनवणे अधिक मनोरंजक होणार आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, रील बनवण्यासाठी व्हॉइस आणि ऑडिओचा वापर आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन इंस्टाग्राम नवीन ऑडिओ व्हॉईस इफेक्ट आणि टेक्स्ट-टू-स्पीच टूल्स लॉन्च करणार आहे. हे नवीन फीचर iOS आणि Android वापरकर्त्यांसाठी Instagram वर आणले जाईल. (Want to see your favorite content on Instagram, Then do this simple trick)
इतर बातम्या
50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरीसह Samsung चा परवडणारा 5G स्मार्टफोन बाजारात, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत