तुमचे YouTube अकाउंट व्हेरिफाय करायचे आहे? वापरा ‘या’ सोप्या टिप्स
तुमचे YouTube अकाउंट व्हेरिफाय झाले आहे काय? नसेल झाल्यास खाली दिलेल्या सोप्या टिप्स फॉलो करून व्हेरिफाय करू शकता.
मुंबई, YouTube हे मनोरंजनाचे आणि माहिती मिळविण्याचे सर्वेत्त मोठे माध्यम आहे. अनेक जण स्वतःचे YouTube चॅनेल तयार करून त्यावर कंटेन्ट टाकतात. अनेकांसाठी तर हे उत्पन्नाचा मुख्य स्रोत देखील आहे. YouTube चॅनेल सुरु केल्यानंतर त्याला व्हेरिफाय (Verify) करणे अत्यंत आवश्यक आहे. YouTube हे फक्त व्हेरिफाय झालेल्या अकाऊंटलाच 15 मिनिटांपेक्षा मोठे व्हिडिओ अपलोड करण्याची आणि थंमनेल इमेजला कस्टमाइज करण्याची अनुमती देते. कोणतीही व्यक्ती त्याचे YouTube खाते व्हेरिफाय करू शकते. यासाठी तुम्हाला तुमच्या ओळखीचा पुरावा द्यावा लागेल. तुमची ओळख सिद्ध करण्यासाठी तुम्हाला फक्त फोन नंबरची आवश्यकता आहे. तथापि, YouTube वर पडताळणीचा अर्थ असा नाही की तुम्हाला पडताळणी बॅज मिळेल.
कधी मिळतो व्हेरिफिकेशन बॅज
वास्तविक, व्हेरिफिकेशन बॅज 100,000 पेक्षा जास्त सदस्य असलेल्या YouTube वापरकर्त्यांना दिला जातो. तथापि, बॅज तुम्हाला कोणत्याही अतिरिक्त वैशिष्ट्यांमध्ये प्रवेश देत नाही. तुम्ही अजूनही तुमचे खाते अद्याप व्हेरिफाय होणे बाकी असेल तर या सोप्या टिप्स फॉलो करा.
YouTube खाते व्हेरिफाय करण्यासाठी, तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन आणि फोन नंबर असणे आवश्यक आहे, कारण काही देश व्हेरीफिकेशनसाठी मजकूर-संदेश वापरतात आणि फोन नंबरवर OTP पाठवून खाते व्हेरिफाय करतात.
अशा प्रकारे करा YouTube खाते व्हेरिफाय
- सर्वप्रथम तुमच्या डिव्हाइसवरून youtube.com वर जा.
- आता डावीकडील टूलबारमध्ये खाली स्क्रोल करा आणि सेटिंग्जवर क्लिक करा.
- View additional features वर क्लिक करा.
- येथे Verify वर क्लिक करा.
- तुमचा देश निवडा आणि तुम्हाला फोन कॉल किंवा मजकूर संदेश प्राप्त करायचे आहेत की नाही ते निवडा.
- तुम्ही फोन कॉल पर्याय निवडल्यास, पुष्टी करा वर क्लिक करा.
- तुमचा फोन नंबर एंटर करा आणि सबमिट वर क्लिक करा.
- आता तुम्हाला सहा अंकी व्हेरिफिकेशन कोड मिळेल.
- हा कोड टेक्स्ट बॉक्समध्ये टाका आणि सबमिट करा.