एखाद्या व्यक्तीला कळू न देता पहा त्याची इन्स्टाग्राम स्टोरी, वापरा ही सोपी ट्रीक

कुणाची इन्स्टाग्राम स्टोरी पहायची आणि त्याला कळायलाही नको? हे शक्य आहे. त्यासाठी एक ट्रिक्स आहे. तुम्हाला ज्या व्यक्तीची स्टोरी बघायची आहे, त्याचं प्रोफाईल ओपन करावं लागेल. प्रोफाईल उघडल्यानंतर स्टोरी पाहू नका, पेज रिफ्रेश करा. पुढे काय करायचं, यासाठी संपूर्ण बातमी वाचा.

एखाद्या व्यक्तीला कळू न देता पहा त्याची इन्स्टाग्राम स्टोरी, वापरा ही सोपी ट्रीक
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 15, 2024 | 7:34 PM

तुम्हाला कुणाची इन्स्टाग्राम स्टोरी त्याला न समजता बघायची असेल तर आम्ही एक ट्रिक्स सांगणार आहोत. आता यासाठी फेक अकाऊंट तयार न करता कोणाचीही इन्स्टाग्राम स्टोरी पाहण्यासाठी फक्त एक छोटंसं काम करावं लागेल, त्यानंतर तुमचं काम होईल.

कुणाची इन्स्टाग्राम स्टोरी बघायला आणि त्याला समजले नाही पाहिजे, यासाठी तुम्ही फार तर फार फेक अकाऊंट तयार कराल. ही देखील चांगली कल्पना आहे. पण, हे अकाऊंट पकडले जाऊ शकते. तुम्ही हा प्रयत्न केला असेल आणि थकला असाल तर आमची ट्रिक फॉलो करा. तुम्ही अशा प्रकारे कोणाचीही इन्स्टाग्राम स्टोरी पाहू शकता, तुमचे नाव त्यांच्या व्ह्यूअर लिस्टमध्ये दाखवले जाणार नाही. हे मात्र नक्की. त्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

‘या’ सोप्या स्टेप्स फॉलो करा

इन्स्टाग्राम स्टोरी लपून पाहण्यासाठी तुम्हाला फार काही करावे लागत नाही. यासाठी तुम्हाला ज्या व्यक्तीची स्टोरी बघायची आहे, त्याचं प्रोफाईल ओपन करावं लागेल.

प्रोफाईल उघडल्यानंतर स्टोरी पाहू नका, पेज रिफ्रेश करा. यानंतर प्रोफाईल ओपन ठेवून डायरेक्ट मेन्यूवर जा आणि एअरप्लेन मोड ऑन करा.

एअरप्लेन मोडनंतर त्या व्यक्तीच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवर परत येऊन इन्स्टाग्राम स्टोरीवर क्लिक करा. स्टोरी तुमच्यासमोर दिसेल.

स्टोरी पाहिल्यानंतर बॅकग्राऊंडमधून ते अ‍ॅप काढून फोन रिफ्रेश करा. असे केल्यानंतर फोन एअरप्लेन मोडवरून काढून टाका.

हे ट्रिक्स यासाठी महत्त्वाची आहे कारण, आयुष्यात असे काही लोक असतात ज्यांना प्रत्येक अपडेटवर लक्ष ठेवायचे असते, पण जर ते त्यांची इन्स्टाग्राम स्टोरी बघायला गेले तर कळू शकते. अशा वेळी पुन्हा पुन्हा बनावट अकाऊंट तयार करावे लागतात. त्यासाठी आम्ही वर दिलेली ट्रिक्स तुम्हाला उपयोगी पडू शकते.

आता तुमचं काम होईल. तुमचं स्टोरी व्ह्यू समोरच्याला दाखवलं जाणार नाही. याशिवाय जर तुम्हाला तुमची स्टोरी अधिक लाईव्ह लपवायची असेल तर तुम्ही हे देखील करू शकता.

‘ही’ ट्रिक्स पण जाणून घ्या

एखाद्या विशिष्ट व्यक्तीने आपली स्टोरी आणि लाईव्ह व्हिडिओ शो करावा असे आपल्याला वाटत नसेल तर आपण त्यांना लपवू शकता. यासाठी फोनमधील इन्स्टाग्राम सेटिंग्जमध्ये जाऊन तुमचा कंटेंट सेक्शन कोण पाहू शकतो हे ओपन करा. त्यानंतर हायड स्टोरी आणि लाईव्ह ऑप्शनवर क्लिक करा. येथे तुम्हाला यादी दिसेल, तुम्ही ज्या व्यक्तीला स्टोरी नाही दिसली पाहिजे त्याचं नाव काढू शकता.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.