Free Netflix : असे कामी येईल Jio चे जुगाड, नेटफ्लिक्सचा मोफत लुटा आनंद

| Updated on: Jul 23, 2023 | 10:16 AM

Free Netflix : जिओच्या या जुगाडामुळे तुम्हाला मोफत नेटफ्लिक्स पाहाता येईल. त्यासाठी जादा खर्च करण्याची गरज नाही. काय आहे जिओचा जुगाड, नेटफ्लिक्स पाहता येईल मोफत..

Free Netflix : असे कामी येईल Jio चे जुगाड, नेटफ्लिक्सचा मोफत लुटा आनंद
Follow us on

नवी दिल्ली | 23 जुलै 2023 : Netflix ने पासवर्ड शेअरिंग पूर्णपणे बंद केले. त्यामुळे युझर्सची गोची झाली आहे. एका मोठा वर्ग नेटफ्लिक्स खाते शेअरिंग करत होते. कुटुंबातील सदस्य, मित्रांची अतरंगी गँग एकमेकांना पासवर्ड शेअर करत नेटफ्लिक्सवर त्यांचे आवडते शो, वेबसिरीज बघत होते. पासवर्ड शेअरिंगमुळे OTT कन्टेंट सहज एक्सेस करता येत होता. पण आता नेटफ्लिक्सने ही सोय हिरावली. युझर्सला नेटफ्लिक्स बघायचे तर पैसा खर्च करण्याशिवाय पर्याय उरला नाही. त्यामुळे ते खट्टू झाले आहेत. पण सर्वच मार्ग बंद झाले असे नाही बरं मित्रांनो, फ्रीमध्ये नेटफ्लिक्सचा (Free Netflix Content) आनंद लुटण्यासाठी हा एक दमदार मार्ग आहे. जिओच्या जुगाडामुळे (Jio Jugad) हे शक्य झालं आहे.

Jio च्या प्लॅनमध्ये ऑफर

फ्रीमध्ये नेटफ्लिक्स पाहण्यासाठी Jio ने तगडा प्लॅन आणला आहे. या खास प्लॅनची ऑफर 699 रुपये आहे. या प्लॅनमध्ये फ्री OTT फायदा मिळतो. युझर्सला अनेक जोरदार फायदे मिळतात. त्यामुळे हा प्लॅन युझर्सला फायदेशीर ठरेल.

हे सुद्धा वाचा

अनलिमिटेड कॉलिंग

या प्लॅनमध्ये युझर्सला देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. देशातील कानाकोपऱ्यात तुम्हाला कॉलिंगची सुविधा मिळते. युझर्सला 100 GB डाटा ऑफर करण्यात येतो. हा डेटा तुम्हाला इंटरनेटसाठी सुद्धा वापरता येईल. या रिचार्ज प्लॅनसोबत ग्राहकांना 3 सिम देण्यात येतात. कुटुंबातील सदस्यांना त्याचा वापर करता येईल.

हा मोठा फायदा

आता तुम्ही म्हणाल हे तर जिओचे फायदे सांगितले. यात तर नेटफ्लिक्सचा तर साधा उल्लेख पण नाही. सर्वच फायदे जिओचेच आहे. नेटफ्लिक आहे तरी कुठे? तर या पोस्टपेड प्लॅनसोबत Netflix आणि Amazon Prime चे सब्सक्रिप्शन अगदी मोफत मिळेल.

एकाच प्लॅनमध्ये अनेक सुविधा

तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग, 100 GB डाटा ऑफर, Netflix आणि Amazon Prime चे मोफत सब्सक्रिप्शन असे अनेक फायदे मिळतात. घरातील सदस्यांना इंटरनेट आणि कॉलिंगचा फायदा होतो. कुटुंबाला मिळून नेटफ्लिक्स पाहाता येईल. म्हणजे एकाच प्लॅनमध्ये युझर्सला अनेक फायदे मिळतील.

6G चा असा असेल स्पीड

  1. 6G चा इंटरनेट स्पीड 5G पेक्षा 100 पटीने अधिक असेल
  2. हा स्पीड जवळपास 100 गीगाबाईट प्रति सेकंद असेल
  3. 142 तासांचे कंटेट अवघ्या 1 सेकंदात डाऊनलोड होईल
  4. सध्या 5G चा उच्चतम स्पीड प्रति सेकंद 10 गीगाबाईट आहे
  5. तर 6G चा इंटरनेट स्पीड उच्च पातळीवर 1 टेरा बाईट असेल