Steave Jobs Movies (PC : Wikipedia)
मुंबई : ॲपल (Apple) या टेक कंपनीचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स (Steve Jobs) यांची आज 67 वी जयंती (Steve Jobs Birth Anniversary) आहे. त्यांचा जीवनप्रवास सर्वांसाठी प्रेरणादायक आहे. जॉब्स यांनी आपल्या आयुष्यात अनेक अडथळे पार करत यशाचे नवे कीर्तिमान रचले आहेत. त्यांची एकवेळच्या जेवणाची भ्रांत होती. त्यांना अनेकदा मित्रांच्या घरी रात्री काढाव्या लागत होत्या. पुढे ॲपलसारखी कंपनी उभी केल्यानंतरदेखील त्यांना अनेकदा मोठमोठी आव्हानं पार करावी लागली. एक वेळ अशी देखील आली की, त्यांना त्यांच्याच ॲपल कंपनीतून बाहेर पडावे लागले. पण या आव्हानांचा सामना करत असताना त्यांनी कधी माघार घेतली नाही. त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास लोकांसाठी प्रेरणादायक असल्याने अनेक लेखकांनी त्यांच्यावर शेकडो पुस्तकं लिहिली आहेत. अनेक दिग्दर्शक निर्मात्यांना त्यांच्यावर चित्रपट, मालिका, माहितीपट बनवावेसे वाटले. स्टीव्ह जॉब्स यांचे बायोपिकदेखील प्रदर्शित करण्यात आले आहेत. त्यांच्यावर शेकडो पुस्तकंदेखील लिहिली गेली आहेत. मात्र आज आम्ही तुम्हाला जॉब्स यांच्यावर आधारित असलेल्या चित्रपट आणि माहितीपटांबाबत माहिती देणार आहोत.
स्टीव्ह जॉब्स यांच्यावरील माहितीपट (डॉक्यूमेंटरीज)
- 1992: The Machine That Changed the World: Part 3 : द पेपरबॅक कॉम्प्युटर नावाच्या या पाच भागांच्या माहितीपटाचा तिसरा भाग, ॲपलच्या सुरुवातीच्या काळात जॉब्स आणि त्यांची भूमिका ठळकपणे दर्शविली होती.
- 1996: Triumph of the Nerds: पॉल सेन दिग्दर्शित, रॉबर्ट एक्स क्रिंजली यांनी लिहिलेला हा माहितीपट आहे. या चित्रपटात 1995 मध्ये क्रिंजली यांनी घेतलेल्या जॉब्स यांच्या मुलाखतीच्या क्लिप आहेत.
- 2011: iGenius: How Steve Jobs Changed the World: अॅडम सॅवेज आणि जेमी हायनेमन यांनी होस्ट केलेली डिस्कव्हरी चॅनलची डॉक्युमेंटरी.
- 2011: Steve Jobs: Billion Dollar Hippy : बीबीसीने निर्मिती केलेली टीव्ही फिल्म (माहितीपट)
- 2015: Steve Jobs: The Man in the Machine : अॅलेक्स गिबनी दिग्दर्शित माहितीपट
- 2015: Steve Jobs vs. Bill Gates: The Competition to Control the Personal Computer, 1974–1999: अमेरिकन जीनियस सिरीजसाठी नॅशनल जिओग्राफिक चॅनेलचा चित्रपट
स्टीव्ह जॉब्स यांच्यावरील चित्रपट (Feature films)
- 1999: Pirates of Silicon Valley: मार्टिन बर्क दिग्दर्शित चित्रपट. Noah Wyle ने यात जॉब्सची भूमिका केली आहे.
- 2013: iSteve: रायन पेरेझ दिग्दर्शित चित्रपट (satirical film), ज्यामध्ये जस्टिन लाँगने जॉब्सची भूमिका केली आहे.
- 2013: Jobs: जोशुआ मायकेल स्टर्न दिग्दर्शित चित्रपट. यात जॉब्सची भूमिका अॅश्टन कुचरने केली आहे.
- 2015: Steve Jobs: अॅरॉन सोर्किनच्या पटकथेवर आधारित डॅनी बॉयल दिग्दर्शित चित्रपट, यात मायकेल फासबेंडरने जॉब्स यांची भूमिका साकारली होती. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
लघूपट
- 2001: Golden Dreams (short film): डिस्ने कॅलिफोर्निया अॅडव्हेंचर पार्कमध्ये कॅलिफोर्नियाच्या इतिहासाविषयीचा एक लघुपट बनवला आहे. यात मार्क नेव्हल्डाइनने जॉब्स यांची भूमिका साकारली होती.
इतर बातम्या
Smartphones Under 6000k: किंमत कमी, फीचर्स दमदार, पाहा टॉप 4 स्मार्टफोन्स
Apple M2 चिपसह नवीन MacBook लाँच करणार! जाणून घ्या काय असेल खास
WhatsApp चं नवीन फीचर, डॉक्यूमेंट्स पाठवताना महत्त्वाचे दस्तऐवज सेफ राहणार