टेलिकॉम इंडस्ट्रीला धोक्याची घंटा! विना इंटरनेट मोबाईलवर पाहता येणार टीव्ही, कसं ते समजून घ्या
मोबाईल आता सर्वस्व झाला आहे. एकाच वेळी अनेक काम करणारा मोबाईल खऱ्या अर्थाने साथीदार झाला आहे. आता मोबाईल टीव्हीचा आनंद लुटता येणार आहे.
मुंबई : तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल मोलाची भूमिका बजावत आहे. प्रत्येक काम चुटकीसरशी पूर्ण होतं. तसेच मनोरंजनाची भूमिकाही योग्यरित्या बजावतो. गेल्या काही वर्षात मोबाईलचा वाढता उपयोग पाहता आता सरकार नव्या प्रयत्नात आहे. डीटूएचच्या माध्यमातून घरात टीव्हीवर चॅनेल्सच प्रसारण होतं. या कल्पना आणखी विस्तारत आता सरकार आता डायरेक्ट टू मोबाईल सेवा सुरु करण्याच्या प्रयत्नात आहे. म्हणजेच तुम्हाला टीव्ही चॅनल थेट मोबाईलवर पाहता येणार आहेत. त्यामुळे टेलिकॉम कंपन्यांना मोठा फटका बसू शकतो. सध्या मोबाईल ग्राहक मनोरंजनात्मक कंटेट पाहण्यासाठी इंटरनेट पॅकेज टाकतात. पण याच ग्राहकांना मोबाईलवर विना इंटरनेट डायरेक्ट टीव्ही सुविधा मिळाली तर कंपनीला नुकसाल होऊ शकतं.
काय आहे सरकारचा डीटूएम प्लान
सरकारने नवं तंत्रज्ञान विकसित करण्याची परवानगी दिली आहे. टीव्हीवर केबल आणि डीटूएचच्या माध्यमातून थेट चॅनेल पाहता येतात.तसंच काहीसं आता मोबाईल स्क्रिनवर पाहता येणार आहे. आयआयटी कानपूर आणि टेलिकॉम विभाग आणि सूचना प्रसारण मंत्रालय या दिशेने काम करत आहे.
देशात 80 कोटी स्मार्टफोन युजर्स
देशात टीव्ही जवळपास 22 कोटी लोकांच्या घरी आहे. दुसरीकडे स्मार्टफोन युजर्सची संख्या 80 कोटींच्या घरात आहे. ही संख्या 2026 पर्यंत 100 कोटीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. मोबाईलवर 80 टक्के इंटरनेट हे व्हिडीओ पाहण्यासाठी होते. त्यामुळे विना इंटरनेट टीव्ही पाहण्याची सुविधा मिळाल्यास मोठा फरक पडेल.
दुसरीकडे, ब्रॉडकास्ट कंपन्यांना ब्रॉडब्रँड सुविधा देण्याचा प्रस्ताव देखील सरकारचा आहे. यामुळे मोबाईल नेटवर्क कॉल किवा इतर माध्यमांसाठी फ्री राहील. त्याचबरोबर कॉल ड्रॉपची समस्या कमी होईल.
टेलिकॉम कंपन्या विरोधात असून पुढच्या आठवड्यात बैठक
टेलिकॉम कंपन्या सरकारच्या या प्रस्तावाविरुधात आहेत. यामुळे डेटा रिवेन्यूवर प्रभाव पडेल. कंपन्यांचा जास्तीत जास्त डेटा हा व्हिडीओ पाहण्यावर खर्च होतो. हा प्रस्ताव कंपन्यांच्या 5जी विस्ताराला स्वप्नांना धक्का देईल. डायरेक्ट टू मोबाईल सर्व्हिस विरोधात पुढच्या आठवड्यात एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या दूरसंचार विभागासह सूचना प्रसारण मंत्रालय आणि आयआयटी कानपूरचे अधिकारी सहभागी होती. त्याचबोरब टेलकॉम आणि ब्रॉडब्रँड इंडस्ट्रीचे प्रतिनिधीही या बैठकीत हजेरी लावतील.