मेड इन इंडिया MRI मशीन तयार, टेस्टची किंमत होणार कमी; पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा
भारताने स्वदेशी तंत्रज्ञानाने बनवलेली पहिली MRI मशीन विकसित केली आहे. ही मशीन दिल्लीच्या एम्स मध्ये चाचणीसाठी लवकरच बसवली जाईल. यामुळे आरोग्य सेवा अधिक परवडणाऱ्या होतील आणि आयातीवरचे अवलंबित्व कमी होईल. पंतप्रधान मोदींनी या यशाचा उल्लेख केला आहे.

भारताने हेल्थ सेक्टरमध्ये एक मोठं पाऊल टाकलं आहे. भारताने अस्सल स्वदेशी बनावटीची पहिली MRI मशीन विकसित केली आहे. ही मशीन ऑक्टोबरपर्यंत दिल्लीच्या एम्स रुग्णालयात टेस्टिंगसाठी इंस्टॉल केली जाईल. या मोठ्या कामगिरीचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीवी9 नेटवर्कच्या व्हाट इंडिया थिंक्स टुडे (WITT) समिटमध्ये केला. त्याचसोबत पंतप्रधान मोदींनी मेड इन इंडियाचा उल्लेख केला.
आज आपण भारताच्या मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्सीचं एक नवीन रूप पाहत आहोत. भारताने आपली पहिली MRI मशीन तयार केल्याची माहिती तीन चार दिवसांपूर्वीच मिळाली आहे. इतक्या दिवसांपासून आपल्याकडे परदेशी MRI मशीन होती, पण आता मेड इन इंडिया MRI मशीन असणार आहे. ज्यामुळे तपासणीच्या किमतीतही मोठ्या प्रमाणात घट होईल. आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया अभियानाने देशाच्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला एक नवीन ऊर्जा दिली आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
जग भारताला मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून पाहतंय
पूर्वी जग भारताला ग्लोबल मार्केट म्हणत होतं, पण आज तीच दुनिया भारताला मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून पाहत आहे. यशाची ही सर्वात मोठी गोष्ट आहे, हे प्रत्येक सेक्टरमध्ये दिसून येईल, असंही मोदी म्हणाले.
आशय म्हणजे मेड इन इंडिया MRI मशीन भारताला मेडिकल टेक्नोलॉजीमध्ये अधिक आत्मनिर्भर बनवण्यात मदत करेल. या पावलाचा उद्देश उपचाराच्या खर्चात कमी करणे आणि आयात केलेल्या मेडिकल डिव्हायसवर अवलंबित्व कमी करणे आहे. सध्याच्या स्थितीत भारत 80-85% उपकरणे आयात करतो.
MRI मशीन काय करते?
यावेळी दिल्ली एम्सचे डायरेक्टर डॉ. एम. श्रीनिवास यांनी एमआरआय मशीनवर प्रतिक्रिया दिली आहे. भारतामध्ये क्रिटिकल केअर, पोस्ट ऑपरेटिव केअर, ICU, रोबोटिक्स, MRI सह अनेक उपकरणे आयात केली जातात आणि 80 ते 90 टक्के गॅझेट्स महाग असतात आणि अत्यंत आवश्यकही असतात. आपल्या देशात सर्वोत्तम टॅलेंट आहे. आपल्याजवळ एक्झॅक्टली सर्वोत्तम उपकरणे असावीत. जगात असे सर्वोत्तम उपकरणे असतानाही, आपल्याला वाटते की आपण भारतात असे का करू शकत नाही?, असं दिल्ली एम्सचे डायरेक्टर डॉ. एम. श्रीनिवास यांनी सांगितलं. MRI स्कॅनर हा एक नॉन-इनवेसिव मेडिकल इमेजिंग टेस्ट आहे, जो सॉफ्ट टिश्यू पाहण्यासाठी वापरला जातो.