काय आहे iPhone चे ते फिचर, जे सांगते सरकार तुमची हेरगिरी करतंय..
देशातील विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांनी त्यांच्या फोनमध्ये सरकारने हेरगिरी केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात सूत्रांनी दिलेल्या माहीतीनूसार एल्गोरिदम मालफंक्शनच्या कारणाने हे झाल्याचे म्हटले आहे.
नवी दिल्ली | 31 ऑक्टोबर 2023 : विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांनी मंगळवारी सरकारने आपल्या फोनमध्ये हॅकींग करीत असल्याचा आरोप करीत खळबळ उडवून दिली आहे. एप्पलने पाठविलेल्या या नोटीफिकेशनने युजरला केंद्र सरकारच्यावतीने हॅकींग झाल्याचा अलर्ट गेल्याने त्याचा स्क्रीनशॉट अनेक नेत्यांनी शेअर केला आहे. यात सध्या लाच प्रकरणाचा आरोप असलेल्या तृणमुल कॉंग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा, शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी आणि कॉंग्रेस नेता पवन खेडा यांचा समावेश आहे.
देशातील विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांनी त्यांच्या फोनमध्ये सरकारने हेरगिरी केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात सूत्रांनी दिलेल्या माहीतीनूसार एल्गोरिदम मालफंक्शनच्या कारणाने हे झाल्याचे म्हटले आहे. सरकारी सूत्रांनी म्हटले आहे की कंपनी लवकरच यावर खुलासा करू शकते. परंतू अधिकृतरित्या अजूनही कंपनीने काही खुलासा केलेला नाही. त्यामुळे एप्पल फोनवरुन आलेल्या या नोटिफीकेशनमागे सरकार पुरस्कृत हॅकींग झाल्याचा दावा कदाचित सरकार खोडूनही काढू शकते. परंतू तरीही सर्वसामान्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. एप्पलमध्ये अशी काय सुविधा आहे ज्यामुळे अशा प्रकारचे नोटिफिकेशन मिळतात.
एप्पलचे खास फिचर कोणते ?
विरोधी पक्षांच्या नेत्यांना एप्पलचे अशा प्रकारचे नोटीफीकेशन आल्याने आता सर्वाच्या मनात हे फिचर काय आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. खरच एप्पल सरकार पुरस्कृत हेरगिरीचा अलर्ट आपल्या ग्राहकांना पाठवू शकते का असा प्रश्न निर्माण झाला आहे. एप्पलने गेल्यावर्षी या फिचरचा समावेश आपल्या फोनमध्ये केला आहे. एप्पल फोन आपल्या ग्राहकांना सर्वोच्चा सुरक्षा आणि प्रायव्हसी देण्यासाठी ओळखला जातो. कंपनी आपल्या युजरचा डाटा सुरक्षित रहाण्यासाठी अनेक पावले उचलत असते. त्यातील हे एक फिचर आहे. त्यामुळे हे नोटिफीकेशन आले आहे.
कॉन्टक्ट की व्हेरीफीकेशन नावाच्या या फिचरचा समावेश अलिकडेच कंपनीने केला आहे. हे कंपनीचे नवे सिक्युरिटी फिचर आहे. ज्याला iMessage आणि iCloud साठी आहे. कंपनीने या नव्या फिचर्सला आणताना म्हटले होते की या सिक्युरिटी लेअरला अशा प्रकारे डिझाईन केले गेले आहे की iMessage ला कोणत्याही हल्ल्या पासून वाचविता येऊ शकेल. यात युजरला तो व्यक्तीशी बोलायचे आहे त्याच व्यक्तीशी बोलतोय का हे व्हेरीफाय करण्याचे देखील ऑप्शन आहे. हे फिचर एका मॅकेनिझमचा वापर करते ज्याला Key Transparency म्हटले जाते. या फिचरला ऑन ठेवताच कोणत्याही अनोळखी iMessage अकाऊंटशी जोडले गेल्यास ऑटोमेटिक अलर्ट मिळतो. युजर मॅन्युअली कोणत्याही कॉन्टॅक्टच्या व्हेरीफिकेशन कोडला कंपेअर कर सकते हे. या फिचरला युजरच्या प्रायव्हसीसाठी आणले आहे.
एप्पलच्या थ्रेटची माहिती कशी मिळते
जशी कंपनीला सरकार पुरस्कृत घुसखोरीची माहीती मिळते. तर कंपनी दोन प्रकारे युजरला अलर्ट करते. पहिला थ्रेट नोटिफीकेशन iMessage द्वारे युजरच्या एप्पल आयडीवर रजिस्टरनंबरला पाठवला जातो. तसेच रजिस्टर ईमेलवरही एक थ्रेट अलर्ट मॅसेज येतो. याशिवाय appleid.apple.com वर देखील युजरना एक थ्रेट नोटिफिकेशन मिळतो. परंतू येथे युजरला साईन-इन करावे लागते. त्याच बरोबर कंपनी युजरला एडीशनल स्टेप्स देखील सांगते ज्यामुळे अकाऊंट सुरक्षित ठेवले जाऊ शकते. कंपनीने काही थ्रेट नोटिफिकेशन चुकीचे देखील असू शकतात असे कंपनीने म्हटले आहे. कोणत्या कारणाने हा थ्रेट नोटीफिकेशन पाठविला आहे याचे कारण कंपनी सांगू शकत नाही. कारण तसे केल्याने भविष्यात युजर्सवर अटॅक सोपा होऊ शकतो.