iPhone SE vs iPhone 15 Pro Max: सर्वात स्वस्त आणि महाग आयफोनमध्ये किती फरक? जाणून घ्या

Cheapest to Most Expensive iPhone: आयफोन 15 सीरिज नुकतीच लाँच झाली आहे. कंपनीने एसई मॉडेलपासून प्रो मॅक्स पर्यंतचे मॉडेल लाँच केले आहेत. चला जाणून घेऊयात स्वस्त आणि महाग फोनमध्ये किती फरक आहे ते...

iPhone SE vs iPhone 15 Pro Max: सर्वात स्वस्त आणि महाग आयफोनमध्ये किती फरक? जाणून घ्या
iPhone SE vs iPhone 15 Pro Max या दोन फोनच्या किमतीत नेमका किती फरक आहे? समजून घ्या
Follow us
| Updated on: Sep 13, 2023 | 11:00 PM

मुंबई : ॲपल कंपनीने आयफोन 15 सीरिज नुकतीच लाँच केली आहे. या फोनची गेल्या कित्येक दिवसांपासून उत्सुकता होती. अखेर उत्सुकता संपली असून नव्या फीचर्ससह आयफोन लाँच करण्यात आला आहे. आयफोनच्या वेगवेगळ्या मॉडेल्सची किंमत वेगवेगळी आहे. पण हा फोन घेणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. भारतात सुद्धा आयफोन घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. गेल्या काही वर्षात आयफोनची क्रेझ वाढतच असल्याचं दिसून येत आहे. जर तुम्ही आयफोन घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. तुमचं किती बजेट आहे आणि आवाक्यात बसतो का? याबाबत माहिती घेणं गरजेचं आहे. आयफोन 15 सीरिजचा सर्वात महागडा फोन 1.50 लाखांहून अधिक किमतीचा आहे. कंपनीचा सर्वात स्वस्त आयफोन एसई हे मॉडेल आहे.

सर्वात स्वस्त आणि महागडा आयफोन

आज आपण आयफोनच्या स्वस्त आणि महाग मॉडेलच्या किमतीत किती फरक आहे ते जाणून घेऊयात. आयफोन सीरिजमधील प्रो मॅक्स सर्वात महागडा फोन आहे. या फोनची सुरुवातीची किंमत 1,59,900 रुपये इतकी आहे. दुसरीकडे, कंपनीच्या सर्वात स्वस्त आयफोन एसईची किंमत 49,900 रुपये इतकी आहे.

आयफोन एसई आणि 15 प्रो मॅक्सच्या किंमतीत फरक

नवीन आयफोन तुम्हाला 50 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळेल. म्हणजेच हा फोन तुमच्या बजेटमध्ये बसेल. आयफोन 15 प्रो मॅक्स आणि आयफोन एसईच्या किमतीत 1,10,000 रुपयांचा फरक आहे.

चांगल्या फीचर्ससह महागड्या फोनमध्ये किती फरक

आयफोनच्या महागड्या फोनचा विचार केला तर, एसई मॉडेल 256 जीबी व्हेरियंटची किंमत 64,900 रुपये इतकी आहे. यात 4.7 इंच रेटिना एचडी डिस्प्ले दिला आहे. तर आयफोन 15 प्रो मॅक्स 1 टीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत 1,99,900 रुपये आहे. या आयफोनमध्ये 6.7 इंच सुपर रेटिना एक्सडीआर ओएलईडी डिस्प्ले आहे. म्हणजेच आयफोनच्या महागड्या एसई आणि प्रो मॅक्सची तुलना केली तर यात 1,35,000 रुपयांचं अंतर आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.