फोन चार्ज करण्याची योग्य पद्धत कोणती? याबाबत अनेक लोक करतात चुका
फोन चार्ज करण्याची एक योग्य पद्धत आहे, जर आपण त्या पद्धतीने फोन नेहमीच चार्ज केला तर आपल्या फोनची बॅटरी लाईफ चांगली असेल. (What's the best way to charge a phone, Many people make mistakes in this regard)
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या संकटामुळे देशातील अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन आहे. बरेच लोक घरात आहेत आणि यावेळी त्यांच्या टाईमपासचे एकमेव साधन म्हणजे स्मार्टफोन आणि स्मार्टफोनचा खूप वापर केला जात आहे. या परिस्थितीत आपण आपल्या स्मार्टफोनच्या लाईफबद्दल देखील विचार केला पाहिजे आणि त्याच्या बॅटरी चार्जिंगमध्ये योग्य पद्धत वापरली पाहिजे. सध्या लोक स्मार्टफोनचा जास्त वापर करत आहेत, यामुळे स्मार्टफोनची बॅटरीही खूप खर्च होत आहे. म्हणूनच आपल्याला आता अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे, कारण दिवसभर घरी राहिल्यामुळे लोक वेगवेगळ्या प्रकारे बॅटरी चार्ज करीत आहेत, जे बर्याच प्रकारे चुकीचे आहे. आपण दिवसभर फोन वापरत असाल तर फोनही आपण लगातार चार्जिंगला ठेवाल. फोन चार्ज करण्याची एक योग्य पद्धत आहे, जर आपण त्या पद्धतीने फोन नेहमीच चार्ज केला तर आपल्या फोनची बॅटरी लाईफ चांगली असेल. (What’s the best way to charge a phone, Many people make mistakes in this regard)
फोन 100% चार्ज करावा?
बर्याच लोकांना असे वाटते की, फोन 100 टक्के चार्ज केल्यानंतर चार्जिंगचा काही प्रॉब्लेम येणार नाही. बहुतेकदा लोक कोठेही किंवा घरी जाण्यापूर्वी फोन 100% चार्ज करतात. तथापि, बर्याच तज्ज्ञांचे मत आहे की असे करणे फोनच्या बॅटरीसाठी चांगले नाही. म्हणून जेव्हा आपण फोन चार्ज करता तेव्हा लक्षात ठेवा की तो पूर्णपणे 100 टक्के चार्ज करायचा नाही. फोन नेहमी 100 टक्केपेक्षा कमी चार्ज करण्याचा प्रयत्न करा. आपण केवळ 80-90 टक्के फोन चार्ज करावा. याचा तुमच्या बॅटरीच्या लाईफवर बराच परिणाम होतो.
रात्री चार्जिंग करणे किती योग्य?
बर्याचदा लोक दिवसा व्यस्त राहतात आणि रात्री फोन चार्जिंगला ठेवून झोपी जातात, जेणेकरून सकाळी उठेपर्यंत फोन पूर्ण चार्ज होईल आणि त्यांचे फोन चार्ज करण्याचे टेन्शन संपेल. तसे, आजकाल जे स्मार्टफोन येत आहेत, त्यांना पूर्णपणे चार्ज होण्यासाठी अधिक वेळ लागत नाही आणि आपण त्यास थोड्या वेळात चार्ज करु शकता. बॅटरीसाठी फोन बर्याच काळासाठी चार्ज ठेवणे चांगले नाही. म्हणूनच आपण जागे असताना फोनवर चार्ज करा. आवश्यकतेपेक्षा अधिक कधीही फोन चार्ज करु नका, अन्यथा आपणास समस्या येऊ शकतात. यामुळे दुर्घटनाही घडू शकतात.
पूर्ण डिस्चार्ज झाल्यावर बॅटरी चार्ज करावी?
बऱ्याच लोकांना असे वाटते की फोन पूर्णपणे डिस्चार्ज झाल्यावर फोन चार्जिंगला लावायचा आणि 100% चार्ज होईपर्यंत चार्ज करायचा. पण, हे देखील योग्य नाही. आपल्याकडे चार्जिंग सिस्टम उपलब्ध असल्यास, आपली 20 टक्के बॅटरी शिल्लक असतानाच आपण फोन चार्जिंग केला पाहिजे. असे म्हणतात की 20 ते 80 टक्के बॅटरी ठेवणे आपल्या फोनसाठी चांगले आहे. सॅमसंगच्या म्हणण्यानुसार, आजकाल बर्याच फोनमध्ये लिथियम बॅटरी असते आणि ही लगातार चार्ज केल्याने दीर्घकाळ टिकते. पूर्वीच्या फोनमध्ये वेगळ्या बॅटरी येत असत आणि त्यांची कार्य करण्याची पद्धत वेगळी असते. यासाठी बॅटरी 50 टक्क्यांहून अधिक चार्ज ठेवा आणि पुन्हा पुन्हा डिस्चार्ज होण्यापासून वाचवा. (What’s the best way to charge a phone, Many people make mistakes in this regard)
Chandra Grahan 2021 | चंद्रग्रहणादरम्यान या गोष्टी दान करा, नोकरी, संतान प्राप्ती आणि आर्थिक समस्या होईल दूरhttps://t.co/UjixhdHhTT#ChandraGrahan2021
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 26, 2021
इतर बातम्या
अमेरिकेत बसून पतीने भारतातील बायकोला संपवलं, दुचाकी अपघातात मृत्यूचा बनाव
भाजपने पनवती म्हणून राणेंना अडगळीत टाकलं; विनायक राऊतांचा जहरी वार