Whatsapp New Feature : मोबाईल नंबर शिवाय देखील व्हॉट्सअप वापरता येईल, काय आहे नवीन फिचर पाहा

व्हॉट्सअप वापरणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता व्हॉट्सअप वापरण्यासाठी आपला मोबाईल क्रमांक लागेलच असे काही बंधन राहणार नाही. या नवीन फिचरमुळे गैरवापर होणार नाही.

Whatsapp New Feature : मोबाईल नंबर शिवाय देखील व्हॉट्सअप वापरता येईल, काय आहे नवीन फिचर पाहा
WhatsApp Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Sep 04, 2023 | 10:05 PM

नवी दिल्ली | 4 सप्टेंबर 2023 : व्हॉट्सअप आपल्या युजर्सच्या प्रायव्हसीसाठी नवनवीन फिचरवर काम करीत आहे. कंपनीने अनेक फिचर त्यासाठी सातत्याने आणले आहेत. तुम्हाला माहीतीच असेल की व्हॉट्सअपवर नवीन अकाऊंट तयार करण्यासाठी किंवा नवीन डीव्हाईसमध्ये व्हॉट्सअप लॉगईन करण्यासाठी आता मोबाईल क्रमांकाची कोणतीही आवश्यकता राहणार नाही. WhatsApp Verification Feature WABetaInfo च्या अहवालानूसार लवकरच हे नवे फिचर लागू होणार आहे.

व्हॉट्सअप वापरण्यासाठी मोबाईल क्रमांकाची काही गरज लागणार नाही असे नवे फिचर येणार आहे, ईमेल व्हेरीफिकेशमध्ये मोबाईल कॉन्टॅक्ट दिसणार नाही. हे फिचर ऑप्शनल असणार आहे. तुमच्या गरजेनूसार ते तुम्हाला वापरता येईल. नव्या फिचरमुळे व्हॉट्सअपचा गैरवापर करणे शक्य होणार नाही. सध्या कंपनी या फिचरवर काम करीत आहे.

अनेक वेळा आपण अशा ठिकाणी असतो जेथे मोबाईल नेटवर्क येत नाही परंतू इंटरनेट नेटवर्क असते अशावेळी आपण चॅटींग करु शकतो. जर अशा जागी जर तुम्हाला नव्या मोबाईल डीव्हाईसवर व्हॉट्सअप लॉगईन करावे लागले तर या नव्या सुविधेमुळे करु शकता. तेव्हा आपण ईमेल व्हेरीफीकेशनद्वारे लॉगइन करु शकता. कंपनी याच फिचरवर काम करीत आहे. या फिचरला लेटेस्ट अपडेट व्हर्जन 2.23.18.19 बीटा प्रोग्रामवर पाहीले गेले आहे. ईमेल व्हेरीफिकेशनमुळे तुम्हाला व्हॉट्सअप लॉगिनसाठी मोबाईल क्रमांकाची गरज लागणार नाही. WABetaInfo च्या मते लवकरच हे फिचर येईल.

या फिचरवरही काम सुरु

व्हॉट्सअप युजर इंटरफेस डीझाईनला बदलण्यात येणार आहे. त्यानंतर एकदम नवा लूक पाहायला मिळणार आहे. मेटाच्या मॅसेजिंग एपचे लेटेस्ट बिटा व्हर्जनने या गोष्टीचे संकेत दिले आहेत. यावेळी व्हॉट्सअपचा हिरवा रंग देखील बदलला जाण्याचे संकेत आहेत. तसेच कंपनी एपमध्येही बदल करू शकते. कंपनी नेव्हीगेशन बार उदा. स्टेटस, चॅट आणि अन्य टॅबना व्हॉट्सअपवर खालच्या बाजूला ट्रान्सफर करु शकते.

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.