तुमचा डेटा फेसबुकसोबत शेअर केला जात नाही, नव्या Privacy policy बाबत Whatsapp चं स्पष्टीकरण

युजर्ससाठी नवनवीन फिचर्स लाँच करणाऱ्या WhatsApp ने या वर्षांच्या सुरुवातीला नवीन फिचर आणण्याऐवजी नव्या अटी आणि शर्ती आणल्या आहेत.

तुमचा डेटा फेसबुकसोबत शेअर केला जात नाही, नव्या Privacy policy बाबत Whatsapp चं स्पष्टीकरण
Follow us
| Updated on: Jan 12, 2021 | 1:06 PM

मुंबई : नेहमी युजर्ससाठी नवनवीन फिचर्स लाँच करणाऱ्या WhatsApp ने या वर्षांच्या सुरुवातीला नवीन फिचर आणण्याऐवजी नव्या अटी आणि शर्ती आणल्या आहेत. जर तुम्ही या अटी-शर्ती अमान्य केल्या तर तुमचं अकाऊंट डिलीट केलं जाईल. या अटी मान्य करण्यासाठी कंपनीने युजर्सना 8 फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिली आहे. दरम्यान, WhatsApp च्या या नव्या धोरणामुळे अनेक युजर्स नाराज आहेत. त्यामुळे अनेकांनी WhatsApp च्या या अटी मान्य करण्याऐवजी WhatsApp वापरणं बंद करण्यास प्राधान्य देण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे अशा युजर्सनी अन्य इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप्सकडे मोर्चा वळवला आहे. अनेक युजर्स आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी WhatsApp वर टीका करु लागले आहे. त्यामुळे याप्रकरणी WhatsApp ने आता त्यांची भूमिका मांडली आहे. तसेच कंपनीने म्हटलं आहे की, तुमचा डेटा पूर्णपणे सुरक्षित आहे. (Whatsapp clarification on privacy Policy, chatting is safe with your friends and family)

गेल्या काही दिवसांपासून WhatsApp च्या नवीन गोपनीयता धोरणाबाबत अनेक बातम्या प्रसिद्ध होत आहेत. त्यामध्ये म्हटले आहे की, “WhatsApp च्या नवीन गोपनीयता धोरणात फेसबुक आणि इंस्टाग्रामचे इंटिग्रेशन जास्त आहे. आता युजर्सचा आधीच्या तुलनेत जास्त डेटा फेसबुक आणि इन्स्टाग्रामसोबत शेअर केला जाईल”. व्हॉट्सअॅपवरील डेटा आधीच फेसबुकसोबत शेयर केला जात होता. परंतु, कंपनीने आता स्पष्ट केले आहे की, फेसबुकसोबत व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामचे इंटिग्रेशन जास्त राहील. असं म्हटलं जातंय की, “आपली WhatsApp वरील जवळपास सर्वच माहिती फेसबुक आणि इंस्टाग्रामसोबत शेअर केली जाईल.” याबाबत आता फेसबुकने त्यांची बाजू मांडली आहे.

व्हॉट्सअ‍ॅपने 8 फेब्रुवारीपासून त्यांच्या गोपनीयता धोरणात (Privacy policy) बदल केले आहेत. याबाबत कंपनीने म्हटलं आहे की, “तुम्ही आमच्या अॅपद्वारे तुमच्या मित्रांसह कुटूंबाशी गप्पा मारता, तुमचं हे चॅटिंग पूर्णपणे सुरक्षित आहे. तुमच्या गोपनीयतेस (प्रायव्हसीला) कोणताही धोका नाही”. व्हॉट्सअॅपने त्यांच्या नवीन निवेदनात म्हटले आहे की, “कंपनी तुमच्या खासगी संदेशांचे संरक्षण करते. कंपनी तुमचे कॉल्स ऐकत नाही किंवा फेसबुकसोबत शेअर करत नाही. तुमच्या गप्पा, ग्रुप्स आणि कॉल्स एंड टू एंड एनक्रिप्टेड आहेत. आम्ही कोणत्याही युजरचे लॉग्स (कॉल लॉग्स, चॅट डिटेल्स) सेव्ह करत नाही. तुम्ही कधी आणि कोणाशी बोलत आहात, याबाबतची माहिती आमच्याकडे साठवून ठेवली जात नाही.”

व्हॉट्सअ‍ॅपने ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, तुम्ही शेअर केलेले लोकेशन्स प्रायव्हेट असतात. तुमची कॉन्टॅक्ट लिस्ट आमच्या सर्व्हरमध्ये अपलोड केलेली असते परंतु आम्ही ती कधीही फेसबुकसोबत शेअर करत नाही. क्रॉस मेसेजिंग प्लॅटफॉर्म आणि व्हॉईस ओव्हर आयपी सर्व्हिस प्रोव्हायडर असलेल्या या कंपनीने पुन्हा एकदा नव्या गोपनियता धोरणाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. यापूर्वीदेखील कंपनीने याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं, त्यात त्यांनी म्हटलं होतं की, नव्या गोपनीयता धोरणाचा केवळ बिझनेस अकाऊंट्सवर परिणाम होईल.

युजर्सचा डेचा खरंच सुरक्षित आहे का?

युजर्सची प्रायव्हसी कायम राहणार असल्याचा दावा WhatsApp ने केला असला तरी दुसऱ्या बाजूला तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी म्हणतात की, WhatsApp च्या नव्या गोपनीयता धोरणांमुळे युजर्सची प्रायव्हसी कायम राहणार नाही. WhatsApp आता युजर्सची इत्यंभूत माहिती साठवून ठेवणार आहे. प्रामुख्याने आपला आर्थिक डेटा साठवून ठेवला जाणार आहे. म्हणजेच आपल्या आर्थिक व्यावहारांवरुन आपण गरीब आहोत, श्रीमंत आहोत की मध्यमवर्गीय आहोत याची वर्गवारी केली जाणार आहे. त्यानुसारच आपल्याला सोशल मीडियावर जाहिराती दिसतील. (उदा. श्रीमंत युजर्सना त्यांच्या सोशल मीडिया पेजेसवर महागड्या गाड्या, गॅजेट्सच्या जाहिराती दिसतील). कंपनी आपल्या डेटाचा वापर करुन अधिक पैसे कमावणार आहे.

संबंधित बातम्या

WhatsApp, Signal की Telegram, कोणतं अ‍ॅप आहे बेस्ट आणि सुरक्षित?

व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेस ग्रुप लिंक Goggle Search वर लीक, WhatsApp कडून भूमिका जाहीर

तुमचा WhatsApp वरील डेटा अन्य प्लॅटफॉर्म्सवर शेअर होणार, संमती न दिल्यास अकाऊंट बंद केलं जाईल

WhatsApp ऐवजी Telegram निवडणाऱ्या युजर्ससाठी वाईट बातमी, अ‍ॅप सुरक्षित नसल्याचा दावा

(Whatsapp clarification on privacy Policy, chatting is safe with your friends and family)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.