WhatsApp मध्ये मोठी अपडेट! आता नाही गरज गुगल प्ले स्टोअरची

WhatsApp Update | हे सोशल मीडिया ॲप सातत्याने काही ना काही अपडेट करत असते. नवनवीन फीचरमुळे युझर्सला सुविधा मिळते. व्हॉट्सॲपला अपडेट करण्यासाठी आता मेटाने एक जबरदस्त फीचर आणले आहे. या फीचरमुळे युझर्सला गुगल प्ले स्टोअरचा विसर पडणार आहे. कोणते आहे हे फीचर, कसा होईल फायदा...

WhatsApp मध्ये मोठी अपडेट! आता नाही गरज गुगल प्ले स्टोअरची
Follow us
| Updated on: Jan 14, 2024 | 3:58 PM

नवी दिल्ली | 14 जानेवारी 2024 : व्हॉट्सॲप नेहमी कोणते ना कोणते नवीन फीचर आणते. Meta जगतातील सर्वात लोकप्रिय मॅसेजिंग प्लॅटफॉर्मसाठी काही ना काही अपडेट समोर आणते. त्यामुळे युझर्सला सुविधा तर मिळतेच. पण तितकाच युझर या ॲपशी खिळून राहतो. पण युझर्सला व्हॉट्सॲपवरील अपडेटची माहिती मिळत नाही आणि ते जुनेच व्हर्जन वापरतात. त्यामुळे मेटाने व्हॉट्सॲपसाठी अजून एक भन्नाट प्रयोग केला आहे. कंपनीने अशा विसरभोळ्या युझरसह सर्वांनाच नवीन अपडेट फीचरची ओळख करुन दिली आहे. काय आहे हे फीचर?

आले नवीन फीचर

आतापर्यंत युझर्सला व्हॉट्सॲपचे लेटेस्ट अपडेटची माहिती करुन घेण्यासाठी नेहमी गुगल प्ले स्टोअरवर धडक मारावी लागत होती. त्यासाठी या ॲपचे स्टेट्स तपासावे लागत होते. पण आता त्याची गरज पडणार नाही. आता युझर्सला व्हॉट्सॲपमध्येच त्याचे व्हर्जन अपडेट करण्याची सुविधा मिळणार आहे. सध्याच्या सेटिंग्जमध्येच व्हॉट्सॲप अपडेट करण्याची सुविधा मिळेल. WABetainfo च्या नवीन अपडेट नुसार, व्हॉट्सॲपने गुगल प्ले बिटा प्रोगाम तयार केला आहे. त्यामुळे अँड्राईड युझर्ससाठी नवीन बिटा व्हर्जन 2.24.2.13 रोलआऊट झाले आहे. नवीन बिटा व्हर्जन अपडेटमध्ये ऑटो-ॲप अपडेट फीचर मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा

व्हॉट्सॲपचे आले नवीन फीचर

या रिपोर्टनुसार, व्हॉट्सॲपसाठी नवीन फीचर लवकरच सुरु होणार आहे. हे फीचर यावेळी रोलिंगसाठी तयार आहे. या फीचरमुळे युझर आता त्यांच्या व्हॉट्सॲपच्या सेटिंगमधून ॲप अपडेट करु शकेल. त्याला लेटेस्ट अपडेटचे नोटिफिकेशन आणि ऑटो-अपडेटचा पर्याय मिळेल. त्यामुळे युझरला नवीन व्हॉट्सॲप अपडेट माहिती करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरला जाण्याची गरज उरणार नाही.

आपोआप अपडेट होईल व्हॉट्सॲप

रिपोर्टनुसार, येणाऱ्या काही आठवड्यात जगभरातील व्हॉट्सॲप वापरकर्त्यांना हे नवीन अपडेट मिळणार आहे. ही सुविधा उपलब्ध होणार आहे. WABetainfo च्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सॲपच्या या नवीन अपडेटचा स्क्रीनशॉट पण जोडण्यात आला आहे. त्यामध्ये व्हॉट्सॲपच्या सेटिंगमध्येच App Update Settings हा नवीन पर्याय दिसत आहे. सध्या या नवीन फीचरची चाचणी सुरु आहे. त्रुटी दूर होताच हे लेटेस्ट फीचर युझर्साठी रोल आऊट होईल.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.