आता ‘या’ Iphone मध्ये WhatsApp चालणार नाही? कंपनीकडून सेवा बंद

Whatsapp अँड्रॉयड आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्म्सवर चांगलं चालतं. परंतु आता काही आयफोन युजर्सना व्हॉट्सॲपचा वापर करता येणार नाही.

आता 'या' Iphone मध्ये WhatsApp चालणार नाही? कंपनीकडून सेवा बंद
Follow us
| Updated on: Mar 21, 2021 | 7:06 AM

मुंबई : इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप Whatsapp हे जगभरात सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग अ‍ॅप आहे. भारतात खूपच कमी स्मार्टफोनधारक असतील ज्यांच्या मोबाईलमध्ये Whatsapp नसेल. Whatsapp हे अ‍ॅप अँड्रॉयड आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्म्सवर चांगलं चालतं. परंतु आता काही आयफोन युजर्सना व्हॉट्सॲपचा वापर करता येणार नाही. कारण काही ठराविक फोनमध्ये WhatsApp ची सेवा बंद होणार आहे. त्यामुळे त्या युजर्सना त्यांचे फोन अपग्रेड करावे लागणार आहेत. (WhatsApp Has Ended Support for Iphone 4 and 4S)

फेसबुक आधारित मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपने काही आयफोन युजर्सचा सपोर्ट बंद केला आहे. ज्यांचा फोन आयओएस 9 वर चालतो अशा युजर्सना आता व्हॉट्सॲपचा वापर करता येणार नाही. कारण या स्मार्टफोन्समध्ये व्हॉट्सॲप सपोर्ट नसेल. त्यामुळे आयफोन युजर्सकडे आता आयओएस 10 किंवा त्यापुढचं व्हर्जन असेल तरच ते व्हॉट्सॲपचा वापर करु शकतात. आयफोन 5 किंवा त्यापुढील सर्व वापरकर्ते व्हॉट्सअ‍ॅप वापरू शकतात तर आयफोन 4 आणि 4 एस वापरकर्त्यांना व्हॉट्सॲप सपोर्ट मिळणार नाही. आयफोन 5 iOS 10.3 पर्यंतचे अपडेट केला गेला आहे.

अँड्रॉयडची स्थिती काय?

अँड्रॉयडबद्दल बोलायचे झाल्यास व्हॉट्सॲप सपोर्ट Android 4.0.3 किंवा त्यापेक्षा पुढील व्हर्जन्ससाठी उपलब्ध आहे. आयओएस आणि अँड्रॉइड व्यतिरिक्त व्हॉट्सअॅप KaiOS वर काम करतं. त्याच वेळी व्हॉट्सॲप Jio फोन आणि JioPhone 2 लादेखी सपोर्ट करतं. परंतु आपल्याकडे असा कोणताही फोन आहे ज्याची आवृत्ती जुनी आहे, तर व्हॉट्सअॅप त्याचा सपोर्ट बंद करणार आहे.

दरम्यान, Samsung Galaxy S2 सारख्या स्मार्टफोन्ससाठीचा व्हॉट्सअॅप सपोर्ट या वर्षीच्या सुरुवातीलाच बंद करण्यात आला आहे. मिळालेल्या रिपोर्टनुसार, Android 4.0.3 किंवा यापेक्षा कमी Version वर चालणाऱ्या अँड्राईड स्मार्टफोनवरील WhatsApp बंद करण्यात आलं आहे. म्हणजेच जर तुमच्याकडे या Version वर चालणारे अँड्राईड फोन असतील, तर तुम्हाला व्हॉट्सॲप वापरण्यासाठी ते अपग्रेड करावे लागणार आहेत. त्यामुळे आता युजर्सना WhatsApp वापरण्यासाठी Android 4.0.3 च्या पुढचं व्हर्जन असलेले अंड्रॉयड फोन्स वापरावे लागणार आहेत.

2010 पूर्वी लाँच झालेल्या स्मार्टफोन्समध्ये WhatsApp बंद

WhatsApp ने 2020 च्या डिसेंबर महिन्यात जाहीर केले होते की, 2010 पूर्वी लाँच झालेल्या कोणत्याही अँड्रॉयड फोनमध्ये व्हॉट्सअॅप चालणार नाही. इतके जुने स्मार्टफोन्स लोकांकडे असण्याची शक्यता तशी कमीच आहे. परंतु जर कोणाकडे 2010 पूर्वी लाँच झालेले स्मार्टफोन्स असतील तर त्यांना आता व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही. त्यासोबतच जर तुम्ही आयफोन युजर्स असाल आणि तुमच्याकडे iOS 9 किंवा यापेक्षा जुन्या वर्जनचे सॉफ्टवेअर असेल, तर ते तुम्हाला अपडेट करावा लागेल. त्याशिवाय जर तुमचा फोन फार जुना झाला असेल किंवा तो अपडेट होऊ शकत नसेल, तर मात्र तुम्हाला नवा फोन खरेदी करावा लागेल.

Google Nexus S, HTC Desire S आणि Sony Ericsson Xperia Arc यासारखे स्मार्टफोन काही वर्षांपूर्वी फार प्रसिद्ध होते. मात्र कंपनीने या फोनमध्ये नवीन अपडेट देण्यात आलेले नाही. त्यामुळे 1 जानेवारी 2021 पासून या स्मार्टफोनमध्ये WhatsApp ची सेवा बंद करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

whatsapp down | जगभरात व्हॉट्सअ‌ॅप, इन्स्टाग्राम, मेसेंजर डाऊन; 45 मिनिटानंतर सेवा पूर्ववत

मोदी सरकारचा WhatsApp च्या New Privacy Policy ला विरोध, दिल्ली उच्च न्यायालयात ‘ही’ मागणी

WhatsApp का Down होतं? कंपनीकडून पहिल्यांदाच स्पष्टीकरण, म्हणते ‘ती’ 45 मिनिटं आमच्यासाठी दीर्घकाळ

(WhatsApp Has Ended Support for Iphone 4 and 4S)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.