व्हॉट्सअपने नवे फिचर्स आणले, जुना मॅसेज असा शोधता येणार

व्हॉट्सअपने युजरच्या भेटीला नवीन फिचर आणले आहे. या नव्या फिचरमुळे तुम्हाला तुमचे जुने मॅसेज शोधणे सोपे होणार आहे. हा फिचर्सचा वावर करुन तुम्हाला तुमचे मॅसेज तारखेप्रमाणे शोधता येतील.

व्हॉट्सअपने नवे फिचर्स आणले, जुना मॅसेज असा शोधता येणार
whatsapp new featuresImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Feb 29, 2024 | 7:50 PM

नवी दिल्ली | 29 फेब्रुवारी 2024 : मेटा ( Meta ) चा मॅसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअप ( WhatsApp ) युजरच्या सुविधेसाठी एक नवीन फिचर आणले आहे. या नव्या फिचरमुळे सर्चिंग अनुभव चांगला होणार आहे. सर्चिंगची क्षमता आता आणखी वाढणार आहे. लेटेस्ट फिचर युजर्सना त्यांच्या चॅट हीस्ट्रीतील टेक्स्ट आदी शोधायला मदत करणार आहे. आता विशिष्ट तारखेचा मॅसेज शोधू शकणार आहेत.

मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी आपल्या व्हॉटस्अप ( WhatsApp ) चॅनलवर या नव्या फिचरची घोषणा केली आहे. असे म्हटले जात आहे की सर्च बाय डेट हे फिचर्स ग्लोबल लेव्हलला Android, iOS, Mac, Windows आणि Web वर सर्व युजर्ससाठी उपलब्ध आहे. या नव्या फिचरला नोव्हेंबर 2023 बीटा टेस्टींगमध्ये पाहीले गेले होते.

व्हॉट्सअपवर सर्च बाय डेट फिचरचा वापर करण्यासाठी युजर्सला व्यक्तीगत किंवा ग्रुप चॅटला उघडून त्यात मॅसेज शोधता येणार आहे. त्यानंतर Android फोनवर वरती वरच्या डाव्या बाजूला तीन पॉईंटवर ( तीन बिंदूंवर ) टॅप करावे लागेल. जर एपचे लेटेस्ट व्हर्जन असेल तर रेग्यूलर सर्च ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आयकॉनसोबत एक छोटे कॅलेंडर दिसेल, त्यानंतर पॉप अप कॅलेंडर युजर्सना त्यांच्या इच्छेप्रमाणे तारीख निवडता येईल. त्यात त्या तारखेला केलेला मॅसेज दिसेल.’

असा शोधा मॅसेज

जर तुम्हाला 20 ऑक्टोबर 2023 चा मॅसेज सर्च करायचा असेल तर पॉप-अप कॅलेंडर वर तारीख, महिना आणि वर्षानुसार त्याची निवड करु शकता. एकदा तारीख निवडल्यानंतर चॅट किंवा ग्रुप थेट त्या दिवसाचा मॅसेज तुम्हाला दाखवेल. जेथुन युजर हा मॅसेज वर किंवा खाली स्क्रोल करु शकतील. या आधी युजर जुने मॅसेज सर्च करण्यासाठी चॅटींग मागे मागे नेत शोधावे लागायचे. व्हॉट्सॲपने अलीकडे जागतिक स्तरावर चार नवीन टेक्स्ट फॉर्मेटिंग ऑप्शन देखील आणले आहेत. त्यात बुलेटेड पॉइंट्स, नंबर लिस्ट्स, ब्लॉक कोट्स आणि इनलाइन कोट्स यांचा समावेश आहे. नवा फॉर्मेट्स आता सध्याच्या बोल्ड, इटॅलिक, स्ट्राइकथ्रू आणि मोनोस्पेस फॉर्मेटिंग ऑप्शनमध्ये सामील होतील

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.