Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘व्हॉट्सअ‍ॅप’ मध्ये येत आहे नवीन अपडेट्स; ‘युजर्स’ ला लपवता येणार निवडक लोकांपासून आपले ‘लास्ट सिन’

‘व्हॉट्सअ‍ॅप’ काही नवीन अपडेट आणत असून, ‘युजर्स’ ला आता निवडक लोकांपासून आपले ‘लास्ट सिन’ लपविता येणार आहे. सध्या फक्त WhatsApp बीटा iOS आवृत्ती 22.9.0.70 वर उपलब्ध आहे. या अपडेटपूर्वी यूजर्सना फक्त तीन पर्याय मिळत होते. युजर्सला एव्हरीवन, माय कॉन्टॅक्ट आणि नोबडी हे पर्याय मिळायचे.

‘व्हॉट्सअ‍ॅप’ मध्ये येत आहे नवीन अपडेट्स; ‘युजर्स’ ला लपवता येणार निवडक लोकांपासून आपले ‘लास्ट सिन’
Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 7:34 PM

मुंबई : ‘व्हॉट्सअ‍ॅप’ आता आपल्या प्लॅटफॉर्ममध्ये आणखी एक नवीन फीचर (New feature) समाविष्ट करणार आहे. या फीचरच्या मदतीने ‘युजर्स’ ना त्यांची प्रायव्हसी जपता येणार आहे. WhatsApp आपल्या प्लॅटफॉर्ममध्ये एक नवीन फीचर समाविष्ट करणार असून, ज्याच्या मदतीने युजर्सना निवडक लोकांपासून (From select people) त्यांचे लास्ट सीन लपविता येईल. व्हॉट्सअ‍ॅपच्या आगामी फीचर्सचा मागोवा घेणाऱ्या WABetaInfo या वेबसाइटने ही माहिती दिली आहे. हे कार्य सध्या फक्त WhatsApp बीटा iOS आवृत्ती 22.9.0.70 वर उपलब्ध आहे. या अपडेटपूर्वी यूजर्सना फक्त तीन पर्याय मिळत होते. युजर एव्हरीवन, माय कॉन्टॅक्ट आणि नोबडी हे पर्याय मिळायचे. अशा परिस्थितीत, जर युजर्सला त्यांचा लास्ट सीन, प्रोफाइल फोटो आणि संपर्काविषयीची माहिती (Contact information) लपवायची असेल, तर त्या संपर्काला ब्लॉक करणे हा एकमेव पर्याय होता. पण आता व्हॉट्सअ‍ॅप युजर्सला ‘Accept My Contacts’ (माय कॉन्टॅक्ट्स सोडून) हा पर्यायही ऑफर करणार आहे.

नवीन बीटा फीचर ‘प्रायव्हसी सेक्शन’ मध्ये मिळेल

व्हॉट्सअ‍ॅप इन्फॉर्मेशन पोर्टलवरील स्क्रीनशॉट्स दाखवतात की वापरकर्ते नवीन बीटा अपडेट फीचर कसे वापरू शकतात. युजर्संना सेटिंग्ज > अंकाऊंट > प्रायव्हसी वर जावे लागेल. प्रायव्हसी विभागात, युजर्संना लास्ट सीन, प्रोफाईल फोटो आणि अबाउट इन्फोशी संबंधित नवीन वैशिष्ट्ये मिळतील. यापूर्वी, मेटा-मालकीची मेसेंजर सेवा व्हाट्सएपने सर्वांना जाहीर केली होती. वापरकर्त्यांसाठी ‘लिंक्ड डिव्हाईस’ हे फीचर सादर करण्यात आले होते. या फीचरच्या मदतीने युजर्स त्यांचे व्हॉट्सअ‍ॅप पाच वेगवेगळ्या डिव्हाईसवर शेअर करू शकतात. या फीचरच्या मदतीने यूजर्स त्यांचे व्हॉट्सअ‍ॅप पाच वेगवेगळ्या उपकरणांवर चालवू शकतात. आता वापरकर्ते ‘लिंक केलेले डिव्हाइस’ वैशिष्ट्याद्वारे ऑनलाइन असतानाही कोणतेही डिव्हाइस प्राथमिक डिव्हाइस म्हणून सेट न करता पाच वेगवेगळ्या डिव्हाइसवर चॅटचा आनंद घेऊ शकतात.

लवकरच येणार ‘कम्युनिटी’ फीचर

व्हॉट्सअ‍ॅप लवकरच कम्युनिटी फीचर आणणार आहे व्हॉट्सअ‍ॅप आपली सेवा सुधारण्यासाठी अनेक नवीन फीचर्सवर सतत काम करत आहे. यूजर्सची गरज लक्षात घेऊन 15 एप्रिल रोजी व्हॉट्सअ‍ॅपने कम्युनिटी फीचर आणण्याची घोषणा केली होती. हे नवीन फीचर ग्रुपशी संबंधित गोष्टी चांगल्या प्रकारे व्यवस्थापित आणि व्यवस्थित करण्यात मदत करेल. इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅपच्या प्रवक्त्यानुसार, व्हॉट्सअ‍ॅपवरील कम्युनिटी ‘ग्रुप डिरेक्टरी’ सारखी असेल. या वैशिष्ट्यासह, कोणताही युजर्स समान संबंधांच्या आधारावर विविध गटांना एकत्र आणून समुदाय चालवू शकतो. कोणताही युजर्स व्हॉट्सअ‍ॅपवर ग्रुप तयार करू शकेल आणि अनेक गटांना आमंत्रित देखील करू शकेल.

इतर बातम्या :

Samsung चा नवीन 5G फोन लाँचिंगसाठी सज्ज, बाजारात दाखल होण्यापूर्वीच किंमत आणि फीचर्स लीक

जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात रहा…iPhone 14 ला ‘अशी’ मिळेल कनेक्टिव्हिटी

आता डिलिट नाही भाऊ एडीट कर… ट्वीटर ‘हे’ नवीन फिचर आणण्याच्या तयारीत

ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राऊत स्पष्टच बोलले
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राऊत स्पष्टच बोलले.
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची बॅनरबाजी
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची बॅनरबाजी.
हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट
हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट.
मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा
मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा.
'तो करंटेपणा आमच्याकडून नाही',राज यांच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत
'तो करंटेपणा आमच्याकडून नाही',राज यांच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत.
....म्हणून माझं सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंनी सारंकाही सांगितलं अन्
....म्हणून माझं सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंनी सारंकाही सांगितलं अन्.
तो जय महाराष्ट्र बोलना होगा, सुपारी घेणारं सरकार म्हणत ठाकरेंची टीका
तो जय महाराष्ट्र बोलना होगा, सुपारी घेणारं सरकार म्हणत ठाकरेंची टीका.
उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना एकच अट; म्हणाले, 'मी सुद्धा तयार, पण...'
उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना एकच अट; म्हणाले, 'मी सुद्धा तयार, पण...'.
युती, शिवसेनेच्या फुटीवर राज ठाकरे म्हणाले, मी आयत्या पिठावर रेघोट्या.
युती, शिवसेनेच्या फुटीवर राज ठाकरे म्हणाले, मी आयत्या पिठावर रेघोट्या..
मुंबईकरांनो... 'ते' 18 दिवस चिंतेचे... हवामान खात्याकडून मोठी माहिती
मुंबईकरांनो... 'ते' 18 दिवस चिंतेचे... हवामान खात्याकडून मोठी माहिती.