मुंबई : संपूर्ण जगात चॅटिंगसाठी प्रसिद्ध असलेला व्हॉट्सअप अॅप (WhatsApp) नेहमी आपल्या युजर्ससाठी नव-नवीन फीचर लाँच करत असतो. त्यामुळे जगभरात व्हॉट्सअॅपचे 1.5 बिलियन आणि भारतात 400 मिलियन युजर्स आहेत. नुकतेच व्हॉट्सअॅपने (WhatsApp) नवीन फीचर लाँच केले आहेत.
व्हॉट्सअॅपने लाँच केलेले हे नवीन फीचर युजर्सची प्रायव्हेसी आणि स्पॅमिंग कन्ट्रोल करण्यासाठी तयार करण्यात आले आहेत. व्हॉट्सअॅपच्या बीटा व्हर्जनमध्ये या फीचरची टेस्टिंग करण्यात येत होती आणि हे फीचर सर्व युजर्ससाठी उपलब्ध आहे. तसेच आयओएस 13 आणि अँड्रॉईड Q अपडेट झाल्यानंतर हा फीचर उपलब्ध होईल.
व्हॉट्सअॅपचे नवीन पाच फीचर
फिंगरप्रिंट अनलॉक
WhatsApp चा हा फीचर अँड्रॉईड युजर्ससाठी उपलब्ध आहे. हा फीचर अॅपच्या प्रायव्हसी सेक्शनमध्ये उपलब्ध आहे. फिंगरप्रिंट अनलॉक फीचर इनेबल केल्यावर युजर्स WhatsApp ला फिंगरप्रिंटच्या माध्यमातून लॉक-अनलॉक करु शकतात. त्यासोबतच युजरकडे WhatsApp नोटिफिकेशनचा कंटेंन्ट लपवण्याचाही पर्याय उपलब्ध करुन दिला आहे.
WhatsApp बोट
व्हॉट्सअॅप बोट फीचर अॅक्टिव्हेट करुन सर्च इंजिन प्रमाणे त्याचा वापर करु शकता. युजर्स व्हॉट्सअॅपवर विकीपीडिया डिटेल्स, न्यूज, डिक्शनरी वैगरे सर्च करु शकतात. याशिवाय व्हॉट्सअॅप बोट फीचरचा वापर व्हॉट्सअॅप ग्रुपमध्येही करु शकता. व्हॉट्सअॅप तुम्हाला आता तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणार आहे.
फ्रीक्वेंटली फॉरवर्डेड
हा फीचर तुम्हाला कोणता मेसेज किती वेळा फॉरवर्ड केला आहे त्याची माहिती देणार आहे. याशिवाय हे पण समजणार की, मिळालेला मेसेज पहिलेच फॉरवर्ड केलेला आहे की नुकतेच तयार करण्यात आला आहे. त्यामुळे फेक न्यूज पसरण्यावर आळा बसू शकतो.
Consecutive voice मेसेज
व्हॉट्सअॅप वर जे लोक सर्वाधिक व्हॉईस मेसेजचा वापर करतात त्यांच्यासाठी हा फीचर फायदेशीर आहे. पहिले व्हॉईस मेसेज ऐकण्यासाठी प्रत्येक मेसेजवर इंडिव्हिज्युअल क्लिक करावे लागत होते. पण नवीन फीचरमध्ये तुम्ही एकदा व्हॉईस मेसेज प्ले केला की त्यानंतरचे सर्व मेसेज ऑटोमॅटिकली प्ले होणार.
ग्रुप इन्विटेशन
जे युजर्स फॅमिली ग्रुप आणि फ्रेन्डस ग्रुमध्ये येणाऱ्या गुड मॉर्निंग आणि इतर जोक्सला कंटाळले असतील किंवा कोणत्याही ग्रुपमध्ये अॅड तसेच विनाकारण नोटिफिकेशनने त्रास होत असेल तर त्यांच्यासाठी हा फीचर फायदेशीर आहे. फीचरनुसार ग्रुप इनव्हाईट फीचर इनेबल केल्यावर तुमच्या परवानगीशिवाय तुम्हाला कोणत्याही व्हॉट्सअॅप ग्रुप अॅड केले जाऊ शकत नाही.