मुंबई : लवकरच व्हॉट्सअॅपवर एकाचवेळी 50 जणांना व्हिडीओ कॉल करता येणार आहे (Whatsapp new features). पुढील काही दिवसात व्हॉट्सअॅपकडून हे फिचर लाँच केले जाणार आहे. याशिवाय व्हॉट्सअॅपकडून आणखी काही इतर नवनवीन फिचर लाँच केले जाणार आहेत. सध्या व्हॉट्सअॅप यावर काम करत आहे. नुकतेच व्हॉट्सअॅपने आपल्या युझर्ससाठी डार्क मोड, डिलिट मेसेज फिचर लाँच केले होते (Whatsapp new features).
व्हॉट्सअॅपवर मिळणार रुम सुविधा
फेसबुकने कोरोना काळात व्हिडीओ कॉलिंगचा वाढता वापर लक्षात घेऊन मेसेंजरवर रुम फिचर लाँच केले होते. तसेच कंपनी आता लवकरच व्हॉट्सअॅप युझर्ससाठीही रुम फिचर जारी करणार आहे. रुम फिचरच्या माध्यमातून एकावेळेस जवळपास 50 व्हॉट्सअॅप आणि व्हॉट्सअॅप वेब युझर्स व्हिडीओ कॉल करु शकणार आहेत. त्यामुळे युझर्सला याचा खूप फायदा होईल, असं कंपनीने म्हटले.
व्हॉट्सअॅप मल्टि डिव्हाईस फिचर
व्हॉट्सअॅप आपल्या युझर्ससाठी लवकरच आणखी एक नवीन फिचर लाँच करणार आहे. ज्याचे नाव मल्टि डिव्हाईस फिचर आहे. या फिचरच्या माध्यमातून युझर्स एक अकाऊंट चार वेगवेगळ्या मोबाईलमधून चालवू शकता. डाटा सिंक करण्यासाठी वाय-फायचा वापर करावा लागणार आहे. या फिचरचा खुलासा वेब बीटा इंफोने केला.
व्हॉट्सअॅप इमोजी
व्हॉट्सअॅपने नुकतेच लेटेस्ट अँड्रॉईड बीटा व्हर्जनवर 138 नवीन इमोजी जारी केले आहेत. यामध्ये शेफ, शेतकरी आणि पेंटर अशा इमोजींचा समावेश आहे. कंपनीने आतापर्यंत या इमोजीना स्टेबल व्हर्जनसाठी लाँच केले नाही.
एक्सपायरिंग मेसेज फिचर
व्हॉट्सअॅप आपल्या नवीन फिचर एक्सपायरिंग मेसेजची टेस्टिंग करत आहे. हे फिचर व्हॉट्सअॅप अँड्रॉईड बीटा व्हर्जन 2.20.197.4 वर स्पॉट केले आहे. युझर्स या फिचरच्या माध्यमातून सात दिवसानंतर सेंड केलेले मेसेज ऑटो डिलिट करु शकतात.
व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉल बटन
व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉलिंग आणखी उत्कृष्ट करण्यासाठी एक वेगळे बटन जोडले जाणार आहे. या बटनच्या माध्यमातून युझर्स सहज ग्रुपमध्ये व्हिडीओ कॉल करु शकणार आहे. सध्या कंपनीकडून या फिचरबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.
संबंधित बातम्या :
ना पक्ष पाहतो, ना राजकीय हितसंबंध; भाजपबाबत नरमाईच्या आरोपांवर फेसबुकचे स्पष्टीकरण
Fake App | Tik Tok च्या फेक लिंक व्हायरल, सरकारकडून महत्त्वाचे आवाहन