मुंबई : व्हॉट्सअॅपने आपल्या युझर्ससाठी नवीन फिचर लाँच केलं आहे. या फिचरच्या माध्यमातून युझर्स आता एकत्र आठ लोकांना घेऊन व्हॉट्सअॅपवर व्हिडीओ कॉल (Whatsapp new feature) करु शकतो. हे फीचर लाँच होण्यापूर्वी व्हॉट्सअॅपवर फक्त चार लोक एकत्र व्हिडीओ कॉल करु शकत होते. ही माहिती लोकप्रिय चीनी वेबसाईट वेब बीटा इन्फोने ट्विटरवरुन (Whatsapp new feature) दिली आहे.
“व्हॉट्सअॅप आयओएस आणि अँड्रॉईड बीटा युझर्ससाठी ग्रुप कॉलमध्ये युझर्सच्या लिमिटमध्ये वाढ करत आहे. व्हॉट्सअॅपच्या नवीन अपडेटमध्ये युझर्स एकत्र आठ लोकांसोबत व्हिडीओ कॉल करु शकतो”, असं वेब बीटा इन्फोने ट्वीट करत सांगितले.
? WhatsApp is rolling out the new limit of participants in groups calls, for iOS and Android beta users!https://t.co/bKmyR7HQg1
The new limit is: 8 participants in group calls!
— WABetaInfo (@WABetaInfo) April 21, 2020
“कंपनी लवकरच आपल्या दोन अरब युझर्ससाठी ऑडीओ आणि व्हिडीओ ग्रुप कॉलमध्ये युझर्सच्या लिमिटमध्ये वाढ करण्याच्या तयारीत आहे. ज्यामध्ये भारतातील 40 कोटींपेक्षा अधिकांचा समावेश असेल”, अशी माहिती व्हॉट्सअॅप बीटा अपडेटने दिली.
या नव्या अपडेटसाठी टेस्पफ्लाइट 2.20.50.25 आयओएस बीटा अपडेट करण्याची गरज आहे. तर गुगल प्ले स्टोरमधून 2.20.133 बीटा इंस्टॉल करण्याची गरज आहे.
4 पेक्षा अधिक युझर्स ग्रुप कॉलवर कनेक्ट करण्यासाठी फोनमध्ये व्हॉट्सअॅपचे बीटा अपडेट व्हर्जन इंस्टॉल करणे गरजेचे आहे. इंस्टॉल न करता ग्रुप कॉलमध्ये आठ युझर्स जोडता येऊ शकत नाही. याचा अर्थ ग्रुप व्हिडीओ कॉलमध्ये आठ युझर्स जोडण्यासाठी लेटेस्ट बीटा अपडेट, इंस्टॉल करणे गरजेचे आहे.
दरम्यान, अॅपलच्या फेसटाइम व्हिडीओ कॉलिंगमध्ये एकत्र 32 लोक एकत्र व्हिडीओ कॉल करु शकतात. तर फेसबुक मेसेंजरवर एकत्र 50 लोक व्हिडीओ कॉलकरु शकतात.
संबंधित बातम्या :
‘झूम’ व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अॅप सुरक्षित नाही, केंद्रीय गृह मंत्रालयाकडून धोक्याचा इशारा
कोरोनाविषयीच्या ‘फेक न्यूज’ला आळा घालण्यासाठी व्हॉट्सअॅपकडून मोठा निर्णय