Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WhatsApp च्या ‘या’ फीचर्सची एकच चर्चा, तुम्ही पण पटकन अपडेट करा

व्हॉट्सअ‍ॅप आल्यापासून आतापर्यंत अनेकदा कात टाकली आहे. आता यात युजर्सच्या दृष्टीने आणखी काही बदल करण्यात आले आहेत. व्हॉट्सअ‍ॅप आता फक्त संवादाचं साधन राहिलं नसून चालती फिरती डायरी आहे असंच म्हणावं लागेल.

WhatsApp च्या 'या' फीचर्सची एकच चर्चा, तुम्ही पण पटकन अपडेट करा
Follow us
| Updated on: Feb 21, 2023 | 7:18 PM

मुंबई : व्हॉट्सअ‍ॅप हे सर्वात लोकप्रिय अ‍ॅप असून स्मार्टफोन असलेल्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये पाहायला मिळतं. मेटाच्या मालकीचं असलेलं व्हॉट्सअ‍ॅप ग्राहकांची गरज ओळखून वेळोवेळी अपडेट करत असतं. व्हॉट्सअ‍ॅप आल्यापासून आतापर्यंत अनेकदा कात टाकली आहे. आता यात युजर्सच्या दृष्टीने आणखी काही बदल करण्यात आले आहेत. व्हॉट्सअ‍ॅप आता फक्त संवादाचं साधन राहिलं नसून चालती फिरती डायरी आहे असंच म्हणावं लागेल. या अ‍ॅपच्या माध्यमातून झटपट फोटो आणि व्हिडीओ पाठवणं असो की काही तासांसाठी लाईव्ह लोकेशन शेअर करणं असो, सहज शक्य आहे. आता व्हॉट्सअ‍ॅपने तीन फीचर्स अपडेट केले आहेत यात डॉक्युमेंट कॅप्शन, लाँगर ग्रुप सबजेक्ट आणि डिस्क्रिप्शन आणि 100 हून अधिक मीडिया फाईल्स शेअरिंग यांचा समावेश आहे.

Group Subject : व्हॉट्सअ‍ॅपच्या लेटेस्ट अपडेटमध्ये हे नवं फीचर आहे. या अपडेटमध्ये आता तु्म्ही ग्रुपसाठी मोठं नाव आणि डिस्क्रिप्शन लिहू शकता.यापूर्वी युजर्साठी 2048 कॅरेक्टर्सची लिमिट देण्यात आली आहे. यापूर्वी ही लिमिट 512 कॅरेक्टर्सपर्यंत मर्यादित होती.

100 Photo Sharing : व्हॉट्सअ‍ॅप युजर्स आता एकाचवेळी 100 फोटो आणि व्हिडीओ शेअर करू शकणार आहेत. त्यामुळे पूर्ण अल्बम शेअर करणं सोपं होणार आहे. यापूर्वी ही लिमिट 30 फोटो सेंड करण्याची होती.

Document Caption : व्हॉट्सअ‍ॅपवर यापूर्वी युजर्स डॉक्युमेंट शेअर करताना कॅप्शन ऑप्शन मिळत नव्हतं. मात्र आता तुम्ही कॅप्शन देऊ शकता. डॉक्युमेंट सेंड करताना युजर्सच्या स्क्रिनवर कॅप्शन बार पॉप अप होईल.

कोणतं फीचर्स येणार आहे

व्हॉट्सअ‍ॅप सध्याच्या स्थितीला 32 जणांना ग्रुप कॉल करण्याची परवानगी देते. पण हा ग्रुप कॉल तुम्ही तुमच्या वेळेनुसार शेड्युल करू शकत नाहीत. व्हॉट्सअ‍ॅप बेटा इन्फोच्या मते, कंपनीने यावर काम करण्यास सुरुवात केली आहे. या नव्या फीचरमुळे तुम्ही तुमचा ग्रुप वेळेनुसार शेड्युल करू शकता. व्हॉट्सअ‍ॅप बेटा इन्फोच्या अहवालानुसार, “व्हॉट्सअ‍ॅप आता नव्या फीचरवर काम करत आहे.या फीचरच्या माध्यमातून तुम्ही तुमचा ग्रुप कॉल शेड्युल करू शकता. यामुळे ग्रुप कॉल किंवा मिटींगची वेळ पाळणं सोपं होणार आहे. तसेच संवाद करणंही सोपं होईल.”

व्हॉट्सअ‍ॅप युजर्स

व्हॉट्सअ‍ॅप हे 100 हून अधिक देशांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय मेसेंजिंग अ‍ॅप आहे. जगभरात व्हॉट्सअ‍ॅपचे 2.24 बिलियन अ‍ॅक्टिव्ह युजर्स आहेत. व्हॉट्सअ‍ॅपवर 2016 ते 2020 या कालावधीत 1 बिलियन युजर्स जॉईन झाले. 100 बिलियन मेसेज दिवसाला फॉरवर्ड आणि रिसिव्ह केले जातात. जगभराच्या आकडेवारीनुसार भारतात व्हॉट्सअ‍ॅपचे सर्वाधिक युजर्स आहेत. भारतात 487.5 मिलियन व्हॉट्सअ‍ॅप युजर्स आहेत.

आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?
आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?.
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला.
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार.
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं.
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट.
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक.
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?.
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?.
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत.