आता व्हॉट्सअॅप अकाउंट मल्टी-डिव्हाईसशी लिंक करता येणार
व्हॉट्सअॅपने बऱ्याच वेळा या नवीन स्टोरेज मॅनेजमेंट टूलची चाचणी केली आहे. काही बीटा वापरकर्ते आधीपासूनच या सुविधेचा लाभ घेत होते.
या नव्या स्टोरेज मॅनेजमेन्ट टूलमुळे कोणती फाईल जास्त स्टोरेज घेणारी आहे हे सहज वापरकर्त्यांना ओळखता येईल. इतकंच नाही तर डिलीट केलेल्या फाईल्ससुद्धा प्रीव्ह्यू करण्याचा पर्याय यामध्ये देण्यात आला आहे.
व्हॉट्सअॅपचं हे नवीन फीचर 'स्टोरेज अँड डेटा' च्या या पर्यायाच्या खाली 'स्टोरेज मॅनेज' अशा पर्यायामध्ये उपलब्ध असणार आहे. यासाठी एक नवीन स्टोरेज बार तयार करण्यात आला आहे.
व्हॉट्सअॅप बर्याच वेळा तुम्हाला फॉर्वर्ड केलेले व्हिडिओ आणि फोटो दाखवेल. जेणेकरून तुम्ही ते रिव्ह्यू करून डिलीट करू शकता.
या फीचरमध्ये सर्व ग्रुप चॅट्स आणि फॉरवर्ड केलेल्या मेसेजमुळे व्हॉट्सअॅप स्टोरेज अनेकदा फूल होतो. त्यामुळे हे नवीन फीचर वापरकर्त्यांसाठी तयार करण्यात आलं आहे. यामुळे मोबाइलमधील जागा मोकळी होण्यास मदत होईल.