WhatsApp चॅटमध्ये बदल, iPhone च्या iMessage सारखा घेता येणार अनुभव

आता आयफोनचा आयमेसेज येईल जर तुम्हीही व्हॉट्सॲप वापरत असाल तर कंपनीने तुमच्यासाठी काहीतरी नवीन आणले आहे. आता ॲपवर तुम्हाला आयफोनच्या आयमेसेजची अनुभूती मिळेल.

WhatsApp चॅटमध्ये बदल, iPhone च्या iMessage सारखा घेता येणार अनुभव
Follow us
| Updated on: Nov 29, 2024 | 7:45 AM

आज भारतासह जगभरातील कोट्यवधी लोक व्हॉट्सॲपचा वापर करतात. युजर्सचा अनुभव सुधारण्यासाठी कंपनी नवनवीन फीचर्स ही सादर करत असते. नुकतेच व्हॉट्सॲप कंपनीने व्हॉइस नोटसाठी एक खास ट्रान्सक्राइब फीचर आणले आहे, जिथून तुम्ही कोणताही व्हॉईस मेसेज एका क्लिकवर ऐकण्याऐवजी वाचू शकता. दरम्यान, कंपनीने आता ॲपच्या चॅट सेक्शनमध्ये मोठा बदल केला आहे. वास्तविक कंपनीने एक नवीन टायपिंग इंडिकेटर सादर केला आहे. चला जाणून घेऊया त्याविषयी सविस्तर

अँड्रॉइड युजर्सला आयफोनचा आयमेसेज सारखा येणार फिल

व्हॉट्सॲपने त्यांच्या युजर्ससाठी ॲपमध्ये एक नवीन टायपिंग इंडिकेटर रोलआउट केले आहे, ज्याचे युजर्सने आयफोनच्या आयमेसेज ॲपसारखेच असल्याचं दिसणार आहे. या नवीन फीचर्समध्ये तीन बिंदूंचा ॲनिमेटेड चॅट बबल टायपिंग इंडिकेटर म्हणून दिसणार आहे. हे इंडिकेटर चॅट स्क्रीनच्या खालच्या बाजूला दिसणार आहे. हा बदल काही आठवड्यांपूर्वी अँड्रॉइड युजर्सच्या लक्षात आला होता आणि आता तो आयफोनवरही रोलआउट करण्यात आला आहे.

युजर्सनी दिली अशी प्रतिक्रिया

अनेक युजर्सनी या वीन फीचर्सला डिसलाइक करत त्रासदायक असल्याचं म्हटलं आहे. तर एका युजरने म्हटले आहे की, “हे सारखं वर-खाली होत राहत आणि खूप त्रासदायक आहे. तसेच एका दुसऱ्या यूजर्सने ”व्हॉट्सॲप आधीच खराब होते आणि हे अपडेट देखील काही कामाचं नाहीये,” असे सांगितले.

तर एका युजरने या अपडेटनंतर सकारात्मक प्रतिक्रिया देत ‘टायपिंग इंडिकेटर खाली आणल्याचं कमी हे योग्य केलं’ असे सांगितले.

यापुढे काय टाईप करताना दिसणार नाही?

व्हॉट्सॲपने या नव्या फीचरबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. त्यामुळे युजर्सच्या फीडबॅकनंतर कंपनी हे फीचर कायम ठेवते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याआधी कंपनीने ॲपच्या स्टेटस सेक्शनलाही रिडिझाइन केले होते. ज्याला लाखो युजर्सनी लाइक केले होते.

'जिसका EVM उसकी...', संजय राऊत यांचं सूचक ट्वीट, नेमकं काय म्हटलं?
'जिसका EVM उसकी...', संजय राऊत यांचं सूचक ट्वीट, नेमकं काय म्हटलं?.
'दादा मुख्यमंत्री झाले तर मी स्वतः त्यांचं अभिनंदन करेन' - रोहित पवार
'दादा मुख्यमंत्री झाले तर मी स्वतः त्यांचं अभिनंदन करेन' - रोहित पवार.
एक दिवस असा येईल की ठाकरे रात्री २..., शिवसेनेच्या नेत्याची भविष्यवाणी
एक दिवस असा येईल की ठाकरे रात्री २..., शिवसेनेच्या नेत्याची भविष्यवाणी.
दादा मुख्यमंत्री झाले तर चांगलं..भुजबळांचा CM म्हणून फडणवीसांना विरोध?
दादा मुख्यमंत्री झाले तर चांगलं..भुजबळांचा CM म्हणून फडणवीसांना विरोध?.
'...म्हणून फडणवीसांना टार्गेट केलं जातंय', भुजबळांचा जरांगेंवर निशाणा
'...म्हणून फडणवीसांना टार्गेट केलं जातंय', भुजबळांचा जरांगेंवर निशाणा.
'... तर राजकीय संन्यास घेईल', शहाजी बापू पाटील नेमकं काय म्हणाले?
'... तर राजकीय संन्यास घेईल', शहाजी बापू पाटील नेमकं काय म्हणाले?.
कडूंनी काढली राणा दाम्पत्यांची औकात; म्हणाले, मला पाडण्याची त्यांची...
कडूंनी काढली राणा दाम्पत्यांची औकात; म्हणाले, मला पाडण्याची त्यांची....
'..यापुढे त्यांनी बाळासाहेबांचं नाव घेऊ नये', राऊतांचा शिंदेंवर घणाघात
'..यापुढे त्यांनी बाळासाहेबांचं नाव घेऊ नये', राऊतांचा शिंदेंवर घणाघात.
मुंबईकरांनो काळजी घ्या, हवेची गुणवत्ता खालावली, बघा कितीवर पोहोचला AQI
मुंबईकरांनो काळजी घ्या, हवेची गुणवत्ता खालावली, बघा कितीवर पोहोचला AQI.
हे अत्यंत दुर्देवी.., दादांच्या मुलानं राष्ट्रवादीच्या आमदाराला सुनावल
हे अत्यंत दुर्देवी.., दादांच्या मुलानं राष्ट्रवादीच्या आमदाराला सुनावल.