व्हॉट्सअॅपच्या या नव्या फीचरने अनेकांची डोकेदुखी वाढणार
मुंबई : इंस्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप हे तर आजकाल सर्वच वापरतात. याचे अनेक फीचर्स आपल्यासाठी फायद्याचे ठरले. म्हणून अगदी काही दिवसांतच हे अॅप लोकप्रिय झालं. पण आता कदाचित व्हॉट्सअॅप आपल्यासाठी त्रासदायक ठरू शकतं आणि याचं कारण म्हणजे व्हॉट्सअॅपचं नवं फीचर. आता व्हॉट्सअॅपचं एक नवीन फीचर येत आहे. यामध्ये नोटिफिकेशन पॅनलमध्ये व्हॉट्सअॅपवर आलेल्या व्हिडीओचा प्रिव्ह्यू बघायला मिळणार […]
मुंबई : इंस्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप हे तर आजकाल सर्वच वापरतात. याचे अनेक फीचर्स आपल्यासाठी फायद्याचे ठरले. म्हणून अगदी काही दिवसांतच हे अॅप लोकप्रिय झालं. पण आता कदाचित व्हॉट्सअॅप आपल्यासाठी त्रासदायक ठरू शकतं आणि याचं कारण म्हणजे व्हॉट्सअॅपचं नवं फीचर.
आता व्हॉट्सअॅपचं एक नवीन फीचर येत आहे. यामध्ये नोटिफिकेशन पॅनलमध्ये व्हॉट्सअॅपवर आलेल्या व्हिडीओचा प्रिव्ह्यू बघायला मिळणार आहे. जेव्हा आपल्याला कुठला व्हिडीओ येतो, तेव्हा नोटिफिकेशनमध्ये त्याचा स्नॅपशॉट दिसतो.
WAbetainfo च्या एका रिपोर्टनुसार, सध्या हे फीचर iOS यूझर्ससाठी आहे. ज्यांच्याकडे 2.18.102.5 वर्जन इंस्टॉल्ड आहे, तेच हे फीचर वापरू शकतात. हे फीचर बीटा टेस्टिंगमध्ये असल्याने अद्याप सर्वांपर्यंत पोहोचलेलं नाही. लवकरच अपडेट केल्यानंतर हे फीचर सर्व iOS यूझर वापरू शकणार आहेत.
व्हॉट्सअॅपचं हे नवं फीचर अनेकांसाठी डोकेदुखी ठरू शकतं. कारण आपल्याला अनेकदा खसगी किंवा संवेदनशील व्हिडीओ कंटेंट पाठवला जातो, जो आपण कुणाशी शेअर करू इच्छित नाही. पण या फीचरनंतर नोटिफिकेशन पॅनलवर काही वेळासाठी व्हिडीओचा प्रिव्ह्यू दिसेल. जर तुम्ही नोटिफिकेशन ऑन ठेवलं असेल तर लॉक स्क्रीनवरही व्हिडीओचा प्रिव्ह्यू दिसू शकतो.
हवं असल्यास सेटिंग्जमध्ये जाऊन या फीचरला रिस्ट्रिक्ट करू शकता. जेणेकरुन नोटिफिकेशनमध्ये व्हिडीओ प्रिव्ह्यू दिसणार नाही. याशिवाय व्हॉट्सअॅपमधील ऑटो डाऊनलोड डिसेबल करायच ऑप्शनही वापरू शकता.
व्हॉट्सअॅपने नुकतंच ऑफिशियल iOS बीटा प्रोग्रामची सुरवात केली, याआधी पर्यंत हे ऑप्शन अँड्रॉईडसाठी होते.