व्हॉट्सअॅपच्या पिक्चर-इन-पिक्चरमध्ये नवीन अपडेट, आता बॅकग्राऊंडमध्येही व्हिडीओ दिसणार
सर्वात लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपने पिक्चर-इन-पिक्चर (PiP) फीचरमध्ये एक नवं अपडेट दिलं आहे. हे अपडेट अँड्रॉईड यूझर्ससाठी उपलब्ध करण्यात आलं आहे. यामध्ये यूझर्स एका चॅटमधून दूसऱ्या चॅटमध्ये मूव्ह करताना पॉप-अप विंडोमध्ये व्हिडीओ पाहू शकणार आहेत.
मुंबई : सर्वात लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपने पिक्चर-इन-पिक्चर (PiP) फीचरमध्ये एक नवं अपडेट दिलं आहे. हे अपडेट अँड्रॉईड यूझर्ससाठी उपलब्ध करण्यात आलं आहे. यामध्ये यूझर्स एका चॅटमधून दूसऱ्या चॅटमध्ये मूव्ह करताना पॉप-अप विंडोमध्ये व्हिडीओ पाहू शकणार आहेत.
इतकंच नाही तर, तुमचं व्हॉट्सअॅप बॅकग्राऊंडमध्ये सुरु असेल तरीही तुम्हाला व्हिडीओ दिसणार आहे. iOS यूझर्सना ही सुविधी आधीच देण्यात आली आहे. iOS यूझर्स चॅटिंगच्या मध्ये स्वीच करताना व्हिडीओ पाहू शकतात.
व्हॉट्सअॅपच्या या नव्या अपडेटमध्ये नवीन बॅकग्राऊंड प्लेबॅक फंक्शनॅलिटी सपोर्टही देण्यात आलं आहे. जे अजूनपर्यंत आयफोनमध्येही देण्यात आलेलं नाही. सध्या हे अपडेट टेस्टिंग मोडवर आहे. लवकरच हे सर्व यूझर्ससाठी जारी करण्यात येईल. Wabetainfo च्या रिपोर्टनुसार, सध्या हे अपडेटेड पीआईपी फीचर अँड्रॉईड यूजर्सच्या व्हॉट्सअॅप बीटा व्हर्जन 2.19.177 वर उपलब्ध आहे.
पिक्चर-इन-पिक्चर (PiP) मोड
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात व्हॉट्सअॅपने हे फीचर अँड्रॉईड यूझर्ससाठी सुरु केलं होतं. या वर्षी जानेवारीमध्ये हे फीचर व्हॉट्सअॅप वेबसाठीही उपलब्ध करण्यात आलं. या फीचरद्वारे व्हॉट्सअॅप यूझर्स चॅट विंडोमध्येच व्हिडीओ प्ले करु शकतात. म्हणजे जर तुम्ही व्हॉट्सअॅपवर कुणाशी बोलत आहात आणि तुम्हाला व्हिडीओही पाहायचा असेल. तर तुम्हाला चॅट विंडोतून बाहेर यायची गरज नाही.
हे फीचर येण्यापूर्वीपर्यंत व्हिडीओवर क्लिक केल्यानंतर मोठ्या विंडोमध्ये व्हिडीओ प्ले होत होता. मात्र, हे फीचर आल्यानंतर व्हॉट्सअॅपवर येणारा व्हिडीओ वेगळ्या बॉक्समध्ये ओपन होतो. यामुळे तुम्ही व्हिडीओ पाहाता पाहाता चॅटिंगही करु शकता.
संबंधित बातम्या :
Realme चा 64MP क्वॉड कॅमेरा स्मार्टफोन, सर्वातआधी भारतात लाँच होणार!
पासवर्ड न सांगता तुमचे वायफाय कसं शेअर कराल?
13 मिनिटांत 4,000mAh ची बॅटरी फूल चार्ज होणार, Vivo ची नवी टेक्नॉलॉजी
VIDEO : खिळ्याने ठोकलं, लायटरने पेटवलं, सर्व परिक्षेत Asus 6Z पास