…अन्यथा तुम्ही WhatsApp मेसेज, कॉल्स करु शकणार नाही, WhatsApp ची युजर्सना ताकीद

व्हॉट्सअ‍ॅपची प्रायव्हसी पॉलिसी (WhatsApp Privacy Policy) 15 मेपासून लागू होणार आहे. ही पॉलिसी स्वीकारण्यासाठी आता काही महिनेच शिल्लक आहे.

...अन्यथा तुम्ही WhatsApp मेसेज, कॉल्स करु शकणार नाही, WhatsApp ची युजर्सना ताकीद
Follow us
| Updated on: Mar 07, 2021 | 8:23 AM

मुंबई : नेहमी युजर्ससाठी नवनवीन फिचर्स लाँच करणाऱ्या WhatsApp ने या वर्षांच्या सुरुवातीला नवीन फिचर आणण्याऐवजी नव्या अटी आणि शर्तींसह गोपनीयता धोरण (Privacy policy) सादर केलं आहे. जर या गोपनीयता धोरणातील अटी-शर्ती अमान्य केल्या तर तुमचं अकाऊंट डिलीट केलं जाईल, असं WhatsApp कडून सांगण्यात आलं होतं. या नव्या Privacy policy मुळे जगभरातून WhatsApp वर टीका होऊ लागली. त्यामुळे युजर्सच्या संतापापुढे WhatsApp एक पाऊल मागे घेत हे गोपनीयता धोरण स्वीकारण्यासाठीचा कालावधी वाढवला. कंपनीने सांगितले की, 15 मे 2021 पर्यंत हे धोरण स्वीकारणं बंधनकारक असेल. (WhatsApp sending reminder notifications to users for accepting new privacy policy before May 15)

व्हॉट्सअ‍ॅपची प्रायव्हसी पॉलिसी (WhatsApp Privacy Policy) 15 मेपासून लागू होणार आहे. ही पॉलिसी स्वीकारण्यासाठी आता काही महिनेच शिल्लक आहे. त्यामुळे तुम्हीही जर व्हॉट्सअ‍ॅप वापरत असाल तर त्यांचं नवीन धोरण स्वीकारणं अनिवार्य आहे. अन्यथा तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप वापरता येणार नाही. जर 15 मे पर्यंत तुम्ही होणाऱ्या बदलांचा स्वीकार केला नाही तर तुम्हाला WhatsApp Message आणि कॉल करता येणार नाही. व्हॉट्सअ‍ॅपने सर्व माध्यमांमधून यासंबंधी नियम जारी केले आहेत. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, नवीन प्रायव्हसी पॉलिसी स्विकारली नाही तर 15 मेपासून तुम्ही तुमचं अकाऊंट वापरू शकणार नाही.

दरम्यान, आम्ही नव्या अटी (Terms) आणि गोपनीयता धोरण (privacy Policy) आणत असल्याचं नोटिफिकेशन व्हॉट्स‌अ‌ॅपने आपल्या युझर्सना पाठवण्यास सुरुवात केली आहे. तसंच युझर्सना नवीन धोरणाला सहमती देण्यासही सांगितलं आहे. WhatsApp सातत्याने युजर्सना त्यांच्या Privacy Policy ची आठवण करुन देण्यासाठी नोटिफिकेशन पाठवत आहे. युजर्सनी ही पॉलिसी अॅक्सेप्ट केल्यानंतरच हे नोटिफिकेशन येणं बंद होईल, असं बोललं जात आहे.

व्हॉट्स‌अ‌ॅपच्या नव्या अटी आणि शर्थी…

– व्हॉट्सअ‌ॅपद्वारे डेटा कसा वापरला जातो यावरील अधिक माहिती

– व्हॉट्सअ‌ॅप अकाउंटशी चॅट करण्यात बदल

– व्हॉट्सअप डेटा फेसबुकसह अन्य कंपनीला कसा शेअर करतं

व्हॉट्सअ‌ॅपचे नवे अपडेट….

– व्हॉट्सॲप वेब आणि डेस्कटॉप ॲपवरुन कॉलिंगची सुविधा

– व्हिडीओ म्यूट

– Read later

– मिस्ड कॉल्स कधीही जॉईन करता येणार

तुमचा डेटा फेसबुकसोबत शेअर केला जात नाही : व्हॉट्सअ‍ॅप

व्हॉट्सअ‍ॅपने त्यांच्या गोपनीयता धोरणात (Privacy policy) बदल केले आहेत. याबाबत कंपनीने म्हटलं आहे की, “तुम्ही आमच्या अॅपद्वारे तुमच्या मित्रांसह कुटूंबाशी गप्पा मारता, तुमचं हे चॅटिंग पूर्णपणे सुरक्षित आहे. तुमच्या गोपनीयतेस (प्रायव्हसीला) कोणताही धोका नाही”. व्हॉट्सअॅपने त्यांच्या नवीन निवेदनात म्हटले आहे की, “कंपनी तुमच्या खासगी संदेशांचे संरक्षण करते. कंपनी तुमचे कॉल्स ऐकत नाही किंवा फेसबुकसोबत शेअर करत नाही. तुमच्या गप्पा, ग्रुप्स आणि कॉल्स एंड टू एंड एनक्रिप्टेड आहेत. आम्ही कोणत्याही युजरचे लॉग्स (कॉल लॉग्स, चॅट डिटेल्स) सेव्ह करत नाही. तुम्ही कधी आणि कोणाशी बोलत आहात, याबाबतची माहिती आमच्याकडे साठवून ठेवली जात नाही.”

व्हॉट्सअ‍ॅपने ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, तुम्ही शेअर केलेले लोकेशन्स प्रायव्हेट असतात. तुमची कॉन्टॅक्ट लिस्ट आमच्या सर्व्हरमध्ये अपलोड केलेली असते परंतु आम्ही ती कधीही फेसबुकसोबत शेअर करत नाही. क्रॉस मेसेजिंग प्लॅटफॉर्म आणि व्हॉईस ओव्हर आयपी सर्व्हिस प्रोव्हायडर असलेल्या या कंपनीने पुन्हा एकदा नव्या गोपनियता धोरणाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. यापूर्वीदेखील कंपनीने याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं, त्यात त्यांनी म्हटलं होतं की, नव्या गोपनीयता धोरणाचा केवळ बिझनेस अकाऊंट्सवर परिणाम होईल.

इतर बातम्या

15 वर्षापूर्वीचं ट्विट विक्रीला; 2 कोटी रुपये किंमत; वाचा नेमकं प्रकरण काय?

भारतीय महिला कोणत्या विषयांवर सर्वाधिक चर्चा करतात? ट्विटरने केले उघड

WhatsApp वरील फोटोज आपोआप डिलीट करणारं नवं फीचर येतंय, जाणून घ्या कसं असेल फीचर

(WhatsApp sending reminder notifications to users for accepting new privacy policy before May 15)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.