Whatsapp Update: व्हॉट्सॲप आणतोय ‘Call Links’ फिचर, गुगल मीट, झूम मिटिंगला देणार टक्कर!
Call Links या नव्या फिचरमुळे व्हॉट्सॲपच्या युजर्सला मोठा फायदा होणार आहे. या फिचरची यूजर्सकडून मोठ्याप्रमाणात मागणी होत होती.
मुंबई, व्हॉट्सॲपने (Whatsapp) ॲपवर कॉल लिंक्स (Call Links) नावाचे फीचर आणण्याची घोषणा केली आहे. या फिचरद्वारे, यूजर्स कॉल सुरू करू शकतील किंवा आधीपासून सुरू असलेल्या कॉलमध्ये सामील होऊ शकतील. इन्स्टंट मेसेजिंग ॲपने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. ॲपच्या कॉल टॅबमध्ये ‘कॉल लिंक’ पर्याय जोडला जाईल आणि वापरकर्ते व्हिडिओ कॉलसाठी ऑडिओची लिंक तयार करू शकतील, जी इतर प्लॅटफॉर्मवर सहजपणे शेअर केली जाईल. याआधी गुगल मीट आणि झूम या ॲपचा जसा वापर करता येत होता तसाच आता व्हॉट्सॲपचा देखील करता येईल.
कंपनीने सांगितले आहे की, हे फीचर या आठवड्याच्या अखेरीस सादर केले जाईल. यासाठी, युजर्सला ॲप अपडेट करावे लागेल. मार्क झुकरबर्गच्या फेसबुक पोस्टनुसार, व्हॉट्सॲप कॉल लिंक्स हे फिचर उजासरसाठी फार महत्त्वाचे ठरणार आहे. यूजर एक लिंक तयार करू शकतील आणि आपल्या मित्रांना पाठवून आधीच सुरु असलेल्या कॉलला कनेक्ट करू शकतील.
Google Meet प्रमाणे शेअर करता येणार लिंक
यूजर Google Meet प्रमाणेच लिंकवर क्लिक करू शकतात आणि लिंकद्वारे एका टॅपने कॉलमध्ये सामील होऊ शकतात. कॉल लिंक तयार करण्यासाठी, वापरकर्ते कॉल टॅब अंतर्गत कॉल लिंक तयार करू शकतील. पर्यायावर टॅप करून आणि ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉलसाठी एक लिंक तयार करू शकतील व कुटुंब आणि मित्रांना शेअर करू शकतील.
अपरिचित युजरला देखील करता येणार समाविष्ट
विशेष म्हणजे जे लोक तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये सेव्ह नाहीत तेही या लिंकद्वारे कनेक्ट होऊ शकतात. याशिवाय मेटा-मालकीच्या व्हॉट्सॲपनेही दिलेल्या माहितीनुसार तूर्तास 32 मेंबरपर्यंत ग्रुप व्हिडिओ कॉलची चाचणी सुरू करण्यात आली आहे.