भारतात UPI Transactions मध्ये WhatsApp पेमेंट पिछाडीवर, PhonePe, Google Pay ची बाजी
नवीन प्रायव्हसी पॉलिसीच्या वादात अडकल्यानंतर WhatsApp ला अनेक प्रकारे तोटा सहन करावा लागत आहे.
नवी दिल्ली : नवीन प्रायव्हसी पॉलिसीच्या वादात अडकल्यानंतर व्हॉट्सअॅपला अनेक प्रकारे तोटा सहन करावा लागत आहे. जानेवारीत नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) जाहीर केलेल्या युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) च्या आकडेवारीनुसार, यूपीआय व्यवहारांच्या बाबतीत व्हॉट्सअॅप फिछाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. व्हॉट्सअॅप त्यांच्या वापरकर्त्यांना (युजर्सना) त्यांची पेमेंट सर्व्हिस वापरण्यास युजर्सच मन वळवू शकलेलं नाही. तथापि, NPCI (National Payments Corporation of India) जारी केलेल्या रिपोर्टनुसार देशातील सर्व 56 यूपीआय अॅप्समध्ये सुरु असलेल्या स्पर्धेत PhonePe ने बाजी मारली आहे. NPCI च्या रिपोर्टनुसार देशातील एकूण यूपीआय व्यवहारांमध्ये PhonePe ची हिस्सेदारी तब्बल 41.21 टक्के इतकी आहे. PhonePe देशातील यूपीआय अॅप्सचं नेतृत्व करत आहे. (WhatsApp UPI Transaction Volume Declined PhonePe Continues to Lead; according NPCI Data)
वॉलमार्टच्या मालकीच्या PhonePe अॅपच्या मजबूत स्थितीमुळे गूगल पे अॅपला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. PhonePe च्या जबरदस्त परफॉर्मन्समुळे गुगलला देशातील मार्केटमध्ये शीर्षस्थानी परत येणे कठीण झाले आहे. एनपीसीआयने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर पोस्ट केलेल्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, व्हॉट्सअॅपवरील यूपीआय व्यवहार डिसेंबर 2020 च्या तुलनेत जानेवारी 2021 मध्ये तब्बल 31 टक्क्यांनी घटले आहेत. भारतीय मार्केटमध्ये यूपीआय व्यवहारांच्या बाबतीत व्हॉट्सअॅपची हिस्सेदारी केवळ 0.02 टक्के इतकी आहे. व्हॉट्सअॅपच्या या खराब कामगिरीचे मुख्य कारण व्हॉट्सअॅपचे नवीन गोपनीयता धोरण (प्रायव्हसी पॉलिसी) असल्याचे मानले जात आहे, कारण बहुतेक यूजर्स कंपनीच्या या निर्णयाच्या विरोधात आहेत.
Transactions च्या बाबतीत PhonePe सर्वात पुढे
PhonePe द्वारे जानेवारी 2021 मध्ये 968.72 मिलियन ट्रान्झॅक्शन करण्यात आले. याची एकूण किंमत 1,91,973.77 कोटी रुपये इतकी आहे. डिसेंबर 2020 च्या तुलनेत त्यात 7.39 टक्क्यांची वाढ झाली आहे.
GPay दुसऱ्या स्थानी
भारतातील युपीआय ट्रान्झॅक्शनच्या बाबतीत GPay चा दुसरा नंबर लागतो. 853.53 मिलियन व्यवहारांसह गुगले ने त्यांचं दुसरं स्थान कायम ठेवलं आहे. जानेवारी 2021 मध्ये या अॅपद्वारे 1,77,791.47 कोटी रुपयांचे ट्रान्झॅक्शन करण्यात आले आहेत. डिसेंबर 2020 च्या तुलनेत यात 0.1 टक्क्यांची वाढ झाली आहे. युपीआय व्यवहारांच्या बाबतीत भारतीय बाजारात गुगल पे ची 36.31 टक्के हिस्सेदारी आहे.
पेटीएम पेमेंट्स बँकही नफ्यात
पेटीएम पेमेंट्स बँकद्वारे 281.18 मिलियन ट्रान्झॅक्शन झाले आहेत. जानेवारी 2021 मध्ये पेटीएमवरुन 33,909.50 कोटी रुपयांचे आदान-प्रदान करण्यात आले आहे. डिसेंबर 2020 च्या तुलनेत पेटीएमवरील व्यवहारांमध्ये 9.6 टक्क्यांची वृद्धी झाली आहे. युपीआय व्यवहरांच्या बाबतीत पेटीएम देशात तिसऱ्या स्थानी आहे. भारतीय बाजारात पेटीएमची हिस्सेदारी 1.97 टक्के इतकी आहे.
BHIM अॅप कोलमडलं
NPCI च्या BHIM अॅपने जानेवारी 2021 मध्ये 23.38 मिलियन म्हणजेच 7,462.94 कोटी रुपयांचे व्यवहार प्राप्त केले. डिसेंबर 2020 च्या तुलनेत यामध्ये 5.72 टक्क्यांची घसरण झाली आहे. युपीआय व्यवहारांच्या बाबतीत BHIM अॅपची भारतीय बाजारात केवळ 0.99 टक्के इतकी हिस्सेदारी आहे.
हेही वाचा
भारतात आता मेड इन इंडिया Appsचा बोलबाला, चिनी कंपन्यांची सद्दी संपली
भारतातून बाजार उठला तरीही कमाईत अव्वल, PUBG Mobile चा जलवा कायम
सरकारी अधिकाऱ्यांसाठी व्हॉट्स अॅपचे देशी व्हर्जन, जाणून घ्या काय आहे खास?
(WhatsApp UPI Transaction Volume Declined PhonePe Continues to Lead; according NPCI Data)