आता WhatsApp वर UPI पेमेंट ऑप्शनही मिळणार!

इन्स्टंट मेसेज अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपवरुन (Whatsapp) येत्या काही दिवसांत UPI (Unified Payments Interface) पेमेंटही करता येईल.

आता WhatsApp वर UPI पेमेंट ऑप्शनही मिळणार!
WhatsApp payments
Follow us
| Updated on: May 15, 2021 | 8:12 PM

नवी दिल्ली : इन्स्टंट मेसेज अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपवरुन (Whatsapp) येत्या काही दिवसांत UPI (Unified Payments Interface) पेमेंटही करता येईल. व्हॉट्सएप अपडेट्सचा मागोवा घेणाऱ्या WABetaInfo च्या ताज्या अहवालात ही बाब उघड झाली आहे. WABetaInfo च्या मते फेसबुकच्या मालकीची कंपनी व्हॉट्सअ‍ॅप यूपीआय पेमेंट पर्यायावर काम करत आहे. (WhatsApp working on updating UPI payments feature)

व्हॉट्सअ‍ॅपने (Whatsapp) गेल्या वर्षी आपल्या युजर्ससाठी पेमेंट प्लॅटफॉर्म लाँच केला होता. आता कंपनी त्यात काही बदल करीत आहे. WABetaInfo च्या अहवालानुसार हे फीचर सुरू झाल्यावर भारतीय व्हॉट्सअ‍ॅप युजर्स कोणत्याही पेमेंट विनंतीशिवाय थेट यूपीआय पेमेंट करू शकतील. सध्या व्हॉट्सअ‍ॅप वापरणारे युजर्स यूपीआय पेमेंटद्वारे त्यांच्या मित्रांना आणि संपर्कांतील लोकांना पैसे पाठवू शकतात. याशिवाय, युजर कॉन्टॅक्ट्सना पेमेंट रिक्वेस्ट्सदेखील पाठवू शकतात. त्याऐवजी, नवं फीचर कोणत्याही कॉन्टॅक्टसाठी हे पेमेंटचा पर्याय इनेबल करुन देईल.

ताज्या अहवालानुसार आता कंपनीने सर्व वापरकर्त्यांना यूपीआय पेमेंट सर्व्हिस देण्यासाठीची तयारी सुरु केली आहे. जेणेकरुन पेमेंट रिक्वेस्टवरील युजर्सचे अवलंबन दूर होईल. हे फीचर जाहीर झाल्यानंतर, युजर्सना यूपीआय पेमेंट सहजतेने कॉन्फिगर केले जाईल आणि बँक अकाऊंट लिंक केल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून कोणत्याही कॉन्टॅक्टशी आर्थिक व्यवहार (पैशांची देवाण-घेवाण) करता येणार आहे. तथापि, कंपनी हे फीचर कधी रोलआऊट करेल, याबद्दल कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.

Whatsapp वर पेमेंट फीचर सुरु कसे कराल?

Step 1 Whatsapp सुरु केल्यानंतर वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात असलेल्या 3 डॉट्स वर क्लिक करा. Step 2 : Settings ओपन केल्यावर Payments चा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा Step 3 : Whatsapp तुम्हाला Bank Account link करण्यास सांगेल. (त्या बँक अकाऊंटशी लिंक्ड असलेलं सिमकार्ड तुमच्या मोबाईलमध्ये अ‍ॅक्टिव्हेट असेल, आणि व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट त्याच नंबरशी लिंक्ड असेल, याची खात्री करा) Step 4 : Bank Account link करताना Whatsapp तुम्हाला काही नियम आणि अटींवर (Terms & Conditions) Agree करण्यास सांगेल. तुम्ही I agree बटणावर क्लिक करु शकता अथवा मागच्या मेनू मध्ये जाऊ शकता. Step 5 : Terms & Conditions स्वीकारल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर Verify करावा लागेल. इथून पुढे यूपीआय (UPI) व्हेरिफिकेशनला सुरुवात होईल. Step 6 : मोबाईल नंबर व्हेरिफाय केल्यानंतर तुमच्या मोबाईल स्क्रीनवर तुम्हाला विविध बँकांच्या नावांची यादी दिसेल. त्यापैकी तुम्हाला तुमची बँक निवडायची आहे. Step 7. त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप तुम्हाला VPA म्हणजेच Virtual Payee Address बनवण्यास सांगेल, तुम्ही त्यावर क्लिक करा, VPA तयार होईल. (Whatsapp Payment process how to transfer money by whatsapp know all the necessary information) Step 8. व्हॉट्सअ‍ॅप तुम्हाला तुमच्या डेबिट कार्डवरील शेवटचे सहा अंक विचारेल. तसेच इतरही काही माहितीची मागणी केली जाईल (डेबिट कार्डवरील एक्सपयरी डेट, तुमची जन्मतारीख इत्यादी) Step 9. त्यानंतर तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवरील मनी ट्रान्सफर हे फिचर वापरु शकता.

Whatsapp वरुन पैसे ट्रान्सफर कसे कराल?

  • तुमचे बँक अकाऊंट डिटेल अपडेट झाल्यानंतर तुम्ही पैसे ट्रान्सफर किंवा रिसीव्ह करु शकाल.
  • तुमच्या काँटॅक्ट लिस्टमधील ज्या व्यक्तीला तुम्हाला पैसे पाठवायचे आहेत, त्याचे चॅट ओपन करुन पेमेंट ऑप्शनवर जा.
  • ज्या बँक अकाऊंटमधून पैसे ट्रान्सफर करायचे आहेत, ते सिलेक्ट करा
  • आता रक्कम टाकून ट्रांझॅक्शन पूर्ण करण्यासाठी तुमचा UPI पिन टाका.
  • पिन टाकल्यावर कन्फर्मेशन मेसेजसोबतच तुमचे ट्रांझॅक्शन सक्सेसफुल होईल.

संबंधित बातम्या

Whatsapp वरुन पैसे ट्रान्सफर कसे कराल? जाणून घ्या नव्या फिचरची स्टेप बाय स्टेप माहिती

Whatsapp पेमेंट्सचा वापर करणार आहात? त्याआधी ‘या’ सहा गोष्टी लक्षात ठेवा

(WhatsApp working on updating UPI payments feature)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.