मनातील प्रश्नाला WhatsApp वर उत्तर! या युझर्ससाठी झाले सुरु AI फीचर, चॅटिंगचा दुप्पट आनंद

WhatsApp AI ! व्हॉट्सअपवर AI हे नवीन फीचर दाखल झाले आहे. त्यामुळे तुमच्या मनातील प्रश्नाला झटपट उत्तरे मिळतील. चॅटिंगसाठी तर हे तंत्रज्ञान वरदान ठरेल. ज्यांना टायपिंगचा कंटाळा आहे अथवा टायपिंग झटपट जमत नाही. त्यांना आता चॅटिंग करणे सोपे होणार आहे.सध्या या युझर्ससाठी हे तंत्रज्ञान आले आहे.

मनातील प्रश्नाला WhatsApp वर उत्तर! या युझर्ससाठी झाले सुरु AI फीचर, चॅटिंगचा दुप्पट आनंद
Follow us
| Updated on: Nov 21, 2023 | 11:02 AM

नवी दिल्ली | 21 नोव्हेंबर 2023 : WhatsApp, मॅसेंजर आणि इन्स्टाग्रामसाठी सप्टेंबर महिन्यात ‘मेटा एआय’ असिस्टेंटची सुरुवात झाली. त्यामुळे युझर्सला एक खास वरदानच मिळाले आहे. व्हॉट्सअपवर त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. तुमच्या प्रश्नांना धडाधड उत्तरे मिळतील. तर चॅटिंगसाठी पण हे फीचर जबरदस्त ठरेल. चॅटिंग करताना अनेकदा की-बोर्ड आणि टायपिंगची काहींना समस्या येते. काहींना टायपिंगचा कंटाळा येतो. मग व्हाईस मॅसेजिंगचा खेळ खेळावा लागतो. त्यात वेळ जातो. आता AI फीचरमुळे WhatsApp हाताळणे सोपे होणार आहे. सध्या हे फीचर बीटा टेस्टर्ससाठी उपलब्ध आहे. हे फीचर अमेरिकेतील वापरकर्त्यांपुरते मर्यादीत आहे. पण लवकरच हे फीचर जगभरातील युझर्ससाठी उपलब्ध होईल.

WhatsApp AI असिस्टंट बीटामध्ये

  • AI असिस्टंट हे स्नॅपचॅटच्या ‘माय एआय’ सारखे आहे. हे तुमच्यासोबत बॉटच्या मदतीने बोलते. WhatsApp वर हे फीचर पण त्याचप्रमाणे काम करेल. हे फीचर तुम्हाला ग्रुप चॅटसाठी उपयोगी पडले. तसेच काही प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पण मदतीला येईल. या फीचरची गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरु होती. सध्या अमेरिकेत त्याचा प्रयोग सुरु आहे.
  • WABetainfo च्या माहितीनुसार, हे नवीन फीचर अँड्रॉईड 2.23.24.26 अपडेटसाठी WhatsApp बीटासह उपलब्ध असेल. हे नवीन फीचर वापरकर्त्यांना Google Play Store वरुन डाऊनलोड करता येईल.
  • WhatsApp ने ‘नवीन चॅट’ बटणसाठी सर्वात वरील बाजूला एक शॉर्टकट बटण दिले आहे. त्यामुळे एक निळे गुलाबी वर्तूळ असेल जे एआय असिस्टंटला दाखवेल. यावर टॅप करताच एआई असिस्टटसाठी चॅट ओपन होईल.
  • त्यामुळे कुठे पण न शोधता, तुम्ही AI चॅट सहज मिळवाल आणि त्याचा वापर करु शकाल. याचा वापर करुन चॅटिंग करणे सोपे होईल. तुमच्या मनातील प्रश्नांची झटपट उत्तरे मिळतील.
  • हे फीचर सध्या बीटा युझर्ससाठी उपलब्ध आहे. सध्या प्रत्येकाच्या व्हॉट्सअपवर हे फीचर उपलब्ध नाही. जर तुमच्याकडे Whatsapp Beta असेल तर तुम्ही हे लेटेस्ट व्हर्जन डाऊनलोड करु शकता. तुम्ही व्हॉट्सअपवर जाऊन लेटेस्ट फीचर तपासू शकता. वापरकर्त्यांना हे फीचर लवकरच उपलब्ध होईल.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.