व्हॉट्सअॅपचं नवं फीचर, मेसेज आपोआप टाईप होणार
मुंबई : व्हॉट्सअॅप युझर्सना आता प्रत्येकवेळी मेसेज टाईप करायची गरज पडणार नाही, कारण आता व्हॉट्सअॅपचं नवं फीचर हे काम करणार आहे. व्हॉट्सअॅपचं नवं अपडेट आलं आहे, या अपडेटमध्ये काही नवे फीचर्स तुम्हाला मिळणार आहेत. ज्यापैकी एक फीचर माईकचे असणार आहे. हा माईक तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअॅप किबोर्डवर दिसेल. हा माईक मेसेज टाईप करण्यासाठी आहे. या फीचरचा […]
मुंबई : व्हॉट्सअॅप युझर्सना आता प्रत्येकवेळी मेसेज टाईप करायची गरज पडणार नाही, कारण आता व्हॉट्सअॅपचं नवं फीचर हे काम करणार आहे. व्हॉट्सअॅपचं नवं अपडेट आलं आहे, या अपडेटमध्ये काही नवे फीचर्स तुम्हाला मिळणार आहेत. ज्यापैकी एक फीचर माईकचे असणार आहे. हा माईक तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअॅप किबोर्डवर दिसेल.
हा माईक मेसेज टाईप करण्यासाठी आहे. या फीचरचा वापर तुम्ही मेसेज टाईप करण्यासाठी करु शकता. तुम्हाला फक्त बोलायचं आहे आणि मेसेज टाईप होईल. हे ऑटो टायपिंग सारखं आहे. सध्या गुगल असिस्टंट आणि व्हॉईस सर्चचा जमाना आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅपनेही आता आपले व्हॉईस टायपिंग फीचर आणले आहे. हे फीचर व्हॉट्सअॅपमध्ये इनबिल्ट देण्यात आले आहेत.
अँड्रॉइडमध्ये व्हॉट्सअॅप व्हर्जन 2.19.11 मध्ये हे फीचर देण्यात आले आहे. हा माईक आयकॉन व्हॉट्सअॅपच्या किबोर्ड अॅपमध्ये आहे. या आयकॉनवर टॅप करुन तुम्हाला बोलायचं आहे, त्यानंतर मेसेज आपोआप टाईप होऊन जाईल. तसे तर हे गुगल किबोर्डच्या माध्यमातूनही करता येते. पण, व्हॉट्सअॅपमध्येच हे फीचर असल्याने ते अधिक सोयीचं ठरेल.
iOS मध्ये हे फीचर किबोर्डच्या उजव्या बाजूने असेल तर अँड्रॉइडमध्ये हे किबोर्डच्या वरच्या बाजूला असेल. इंग्रजीत टाईप करण्यासाठी हे फीचर तुमच्या खूप कामी येऊ शकतं, मात्र याच्या मदतीने तुम्ही हिंदी किंवा मराठीत टाईप करु शकत नाही. तरी मेसेज हाताने लिहण्यापेक्षा व्हॉईस टाईपिंग अधिक सोयीस्कर आहे.
त्यासोबतच व्हॉट्सअॅपमध्ये आणखी काही फीचर्सही समाविष्ट करण्यात आले आहेत. iOS युझरसाठी ग्रुपमध्ये प्रायव्हेट रिप्लाय देण्याचं फीचर आधीच देण्यात आलं आहे. यामध्ये ग्रूपमध्ये पाठवलेल्या मेसेजवर टॅप केल्यावर तुम्हाला रिप्लाय प्रायव्हेटलीचं ऑप्शन येईल, या ऑप्शनचा वापर करत तुम्ही त्या मेसेजरला डायरेक्ट रिप्लाय करु शकता.
तसेच व्हॉट्सअॅपमध्ये फिंगरप्रिंट आणि फेस आयडी सपोर्ट सारखे फीचर येणार असल्याचेही बोललं जात आहे. म्हणजे आता व्हॉट्सअॅपलाही फिंगरप्रिंट सेंसरच्या मदतीने सुरक्षित ठेवले जाऊ शकते आणि iPhone X युझर्स फेस आयडीचा वापर करत व्हॉट्सअॅपला लॉक करु शकतील. सध्या यासाठी थर्ड पार्टी अॅपचा वापर करावा लागत आहे.