व्हॉट्सअॅपच्या नवीन बगमुळे फोटो गायब
मुंबई : व्हॉट्सअॅपमध्ये रोजच नवनवीन फिचर्स अॅड होत असतात. पण, त्यासोबतच बग देखील येत असतात. हे बग तुमच्या फोनला नुकसान पोहोचवू शकतात. एक असाच बग आहे, जो युझर्सचे फोटो डिलीट करतो आहे. हे बग व्हॉट्सअॅपच्या 2.19.66 व्हर्जनमध्ये आहे. ज्या व्हॉट्सअॅप बीटा युझर्सने 2.19.66 हे व्हर्जन अपडेट केलं आहे, त्यांच्या फोनमध्ये ही समस्या येत आहे. हे […]
मुंबई : व्हॉट्सअॅपमध्ये रोजच नवनवीन फिचर्स अॅड होत असतात. पण, त्यासोबतच बग देखील येत असतात. हे बग तुमच्या फोनला नुकसान पोहोचवू शकतात. एक असाच बग आहे, जो युझर्सचे फोटो डिलीट करतो आहे. हे बग व्हॉट्सअॅपच्या 2.19.66 व्हर्जनमध्ये आहे. ज्या व्हॉट्सअॅप बीटा युझर्सने 2.19.66 हे व्हर्जन अपडेट केलं आहे, त्यांच्या फोनमध्ये ही समस्या येत आहे.
हे व्हर्जन अपडेट केल्याने व्हॉट्सअॅपवरील काही चॅट डिलीट होऊ शकतात. पण ही समस्या फक्त व्हॉट्सअॅपमध्ये येत आहे, फोनमध्ये नाही. म्हणजे जर तुमचे काही फोटो डिलीट झाले असतील तर ते तुमच्या गॅलरीमध्ये तुम्हाला दिसतील. याबाबत युझर्स आता सोशल मीडियावर तक्रार करत आहेत.
तुम्हीही व्हॉट्सअॅप बीटा युझर्सपैकी एक असाल तर लगेच तुमचं व्हर्जन चेक करा. या बगला ठीक करण्यासाठी व्हॉट्सअॅप काम करत आहे. तर दुसरीकडे थर्ड पार्टी व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांचे अकाउंट बंद करण्याचा निर्णय व्हॉट्सअॅपने घेतला आहे. व्हॉट्सअॅप प्लस आणि जीबी व्हॉट्सअॅप नावाचे हे दोन थर्ड पार्टी अॅप आहेत. हे अॅप्लिकेशन अनधिकृत आहेत. कंपनीने हे अॅप्लिकेशन काढून टाकण्यास सांगितले आहे. जो युझर हे अॅप्लिकेशन वापरत राहिल त्याचं अकाउंट बंद करण्यात येईल असेही व्हॉट्सअॅपने सांगितले.
व्हॉट्सअॅप प्लस आणि जीबी व्हॉट्सअॅप हे व्हॉट्सअॅप सारखे दिसणारे अॅप्लिकेशन आहे. मात्र ते व्हॉट्सअॅपने बनवले नाही. युझरला आकर्शित करण्यासाठी या अॅप्लिकेशनमध्ये जास्तीच्या सेवा पुरवण्याचा दावा केला जातो, मल्टीपल अकाउंट हे यापैकी एक आहे, यामध्ये तुम्ही एकाहुन अधिक व्हॉट्सअॅप एकाच मोबाईलमध्ये वापरु शकता.