Youtube वर व्हिडिओ केव्हा करावा पोस्ट? कधी पडेल लाईक आणि व्ह्यूजचा पाऊस

Youtube Videos | युट्यूबवर व्हिडिओ नियमीतपणे टाकता, पण त्याला व्ह्यूज आणि लाईक मिळत नाही, तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे. तुम्ही हे तंत्र आत्मसात केले आणि योग्य विषयावर चांगले व्हिडिओ पोस्ट केले तर तुमच्या व्हिडिओवर व्ह्यूज आणि लाईकचा पाऊस पडेल. तुमचे व्हिडिओ व्हायरल झाल्याशिवाय राहणार नाहीत.

Youtube वर व्हिडिओ केव्हा करावा पोस्ट? कधी पडेल लाईक आणि व्ह्यूजचा पाऊस
Follow us
| Updated on: Feb 23, 2024 | 2:14 PM

नवी दिल्ली | 23 February 2024 : जर तुम्हाला सोशल मीडियावर व्हायरल व्हायचे असेल तर ही माहिती तुमच्या उपयोगी पडू शकते. सध्या अनेक जण युट्यूबवर त्यांचे व्हिडिओ पोस्ट करतात. काही जण तर नियमीत व्हिडिओ पोस्ट करतात. पण त्यांना हवा तसे व्ह्यूज आणि लाईक मिळत नाही. तुमचा कंटेट दमदार असेल. व्हिडिओ पण कमाल एडीट केला असेल तर सर्वात महत्वाचे असते टायमिंग! युट्यूबवर योग्य वेळी व्हिडिओ अपलोड केला तर तुम्हाला भरपूर व्ह्यूज आणि लाईक मिळतील.

युट्यूबवर कसे वाढतील व्ह्यूज

युट्यूबवर व्ह्यूज आणि लाईक प्रत्येकाला हव्या आहेत. कामाची दाद मिळायला हवी, अशी प्रत्येकाची इच्छा असते. युट्यूबवर व्ह्यूज आणि लाईक मिळवण्यासाठी अनेक जण सूचनांचे पालन करतात. तरीही लाईकचा पाऊस पडत नसतील तर या काही टिप्स तुमच्यासाठी महत्वाच्या ठरतील. व्हिडिओ कंटेंट क्वालिटी, ट्रेंड फॉलोसह व्हिडिओ अपलोड करण्याची योग्य वेळ महत्वाची आहे. मग आता व्हिडिओ अपलोड करण्याची योग्य वेळ कोणती असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर चला जाणून घेऊयात..

हे सुद्धा वाचा

यावेळेला करा व्हिडिओ पोस्ट

युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करण्यासाठी योग्य वेळी ती असते ज्यावेळी युझर्स सर्वाधिक सक्रीय असतोत. म्हणजे ते युट्यूबवर व्हिडिओ पाहण्यासाठीची वेळ ही महत्वाची असते. सकाळी 6 वाजता, 9 वाजता आणि 12 वाजता, यावेळी जास्तकरुन युझर्स एक्टिव्ह असतात. तर दुपारी 3 वाजता, संध्याकाळी 6 वाजता आणि रात्री 9 आणि 11 वाजता व्हिडिओ अपलोड करता येऊ शकते. आठवड्याच्या शेवटी या वेळेत थोडाफार बदल असतो. या वेळेत मोठ्या प्रमाणात युझर्स हे त्यांच्या सोशल मीडियावर असतात. या काळात ते व्हिडिओ स्क्रोलिंग करत असतात.

व्हिडिओत या गोष्टींचे ठेवा भान

कंटेंट क्रिएटर्सला नियमीत व्हिडिओ पोस्ट करणे आवश्यक आहे. वेगवेगळे कंटेंट आणि विषय ट्रेंडिंग असावेत. तसेच वेळोवेळी लाईव्ह करणे पण आवश्यक आहे. नाहक ओढताण केलेले व्हिडिओ युझर्सला आवडत नाही. योग्य माहिती आणि योग्य वेळ अत्यंत महत्वाची आहे. कम्युनिटी गाईलाईन्सचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. या टिप्स फॉलो केल्या तर व्हिडिओवर लाईक आणि व्ह्यूजचा पाऊस पडेल.

Non Stop LIVE Update
तावडेंना तीन तास घेरलं, विवांत हॉटेल रुम नंबर 404 मध्ये 9 लाखांचे बंडल
तावडेंना तीन तास घेरलं, विवांत हॉटेल रुम नंबर 404 मध्ये 9 लाखांचे बंडल.
तावडेंकडून कोट्यावधींचं वाटप? ठाकूरांनी दाखवलेल्या 'त्या' डायरीत काय?
तावडेंकडून कोट्यावधींचं वाटप? ठाकूरांनी दाखवलेल्या 'त्या' डायरीत काय?.
तावडेंना घेरलं, पैशांचं वाटप, भाजप-बविआमध्ये निवडणुकीपूर्वी तुफान राडा
तावडेंना घेरलं, पैशांचं वाटप, भाजप-बविआमध्ये निवडणुकीपूर्वी तुफान राडा.
कालीचरण महाराजांची सभा? जरांग पाटलांवर जहरी टीका; संजय शिरसाट म्हणले..
कालीचरण महाराजांची सभा? जरांग पाटलांवर जहरी टीका; संजय शिरसाट म्हणले...
'टिकल्या, बुचड्या...', कालिचरण महाराजांची नक्कल करत जरांगेंचा पलटवार
'टिकल्या, बुचड्या...', कालिचरण महाराजांची नक्कल करत जरांगेंचा पलटवार.
अनिल देशमुखांवर नागपुरात हल्ला, गाडीवर दगडफेक अन डोक्याला गंभीर दुखापत
अनिल देशमुखांवर नागपुरात हल्ला, गाडीवर दगडफेक अन डोक्याला गंभीर दुखापत.
बारामतीचा दादा कोण? अजित पवार की युगेंद्र? लढाई पुतण्यावरून तापली
बारामतीचा दादा कोण? अजित पवार की युगेंद्र? लढाई पुतण्यावरून तापली.
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ठाकरे बंधू भिडले, कोणाची तोफ कोणावर धडाडली?
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ठाकरे बंधू भिडले, कोणाची तोफ कोणावर धडाडली?.
'थडग्यावर चादर चढवणारा, हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला जरांगे राक्षस'
'थडग्यावर चादर चढवणारा, हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला जरांगे राक्षस'.
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ.