Holes : विमानाच्या खिडकीवर या छिद्राचं काम तरी काय? या प्रश्नाचं उत्तर शोधलं का?
Holes : विमान प्रवास करताना तुम्हाला काचेच्या खिडकीवर एक छोटुलं छिद्र असतं, ते कशासाठी असेल बरं?
नवी दिल्ली : विमान प्रवासात (Air Travel) पायलट, स्मित हास्य करणारी एअर होस्टेस (Air Hostage) यांनी तर लक्ष्य वेधलेच असेल. पण खिडकीतील काचेवरील इटूकल्या पिटुकल्या छिद्रानं (Have tiny holes) ही तुमचं लक्ष्य वेधले असेल. तु्म्हाला प्रश्न पडला असेल की हे छिद्र या ठिकाणी असण्याचं कारण तरी काय?
तर मित्रांनो हे छिद्र एका खास कामासाठी तयार करण्यात आले आहे. अर्थात त्यामागे विज्ञान आहे. हे विज्ञान तुम्हाला कळालं तर तुम्ही ही म्हणाल, मान गये उस्ताद! विमानाच्या खिडकीवरील काचेच्या तावदानावरील या छिद्राला ब्लीड होल असे म्हणतात.
या ब्लीड होलचा वापर नेमका कशासाठी करण्यात येतो हे ही आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हे छिद्र तुम्हाला दिसते. पण त्याला तुम्हाला हात लावता येत नाही. ते अशा मध्यवर्ती ठिकाणी असते की त्याला तुम्हाला हात लावता येत नाही. सुरक्षेसाठी हे छिद्र ठेवण्यात येते.
शेकडो फूट उंचीवरुन उडणारे विमान तयार करताना अनेक सुरक्षेच्या गोष्टी लक्ष्यात ठेवाव्या लागतात. आकाशात ऑक्सीजन आणि हवेचा दबाव खूप कमी असतो. त्यामुळे विमानात विंडो फीट करताना त्याला सुरक्षेचे नियम लागू असतात.
या छोट्या छिद्रापासून विमानाला कुठलाही धोका पोहचत नाही. पण प्रवाशांची आणि विमानाची सुरक्षा मात्र होते. तसेच या छिटुल्या छिद्राने खिडकीच्या बाहेरील भागाला हवेच्या दबावापासून सुरक्षा देते.
मध्य हिस्सा हा ब्लीड होल असतो. तो हवेचा दाब नियंत्रीत करतो. तर आतील भागी असतो. त्याला प्रवाशांकडून होणाऱ्या नुकसानीपासून वाचवितो. या तीनही भागात थोडा थोडा गॅप असतो.
प्रवासा दरम्यान Air Pressure फार कमिी असते. अशावेळी विमानातील प्रवाशांसाठी हवेचा मोठा दाब तयार ठेवणे आवश्यक असते. ज्यामुळे ते सहज प्रवासादरम्यान श्वास घेऊ शकतात. बाहेरील आणि आतील खिडकीवर दोन्ही बाजूच्या हवेचा दाब असतो. तो सुरक्षित राहतो.
ब्लीड बेल हे मधल्या भागात असते. हे छिद्र बाहेरील आणि आतील काचेवरील हवेचा दबाव एकसारखा ठेवते. या छिद्रामुळे बाहेरील हवेचा दबाव तयार होत नाही तर आतील भागातून