ऑक्सिजन सिलेंडर्स गोल का असतात? हे आहे मुख्य कारण, जाणून घ्या
गोल किंवा दंडगोलाकार असण्याचा फायदा असा आहे की संपूर्ण सिलिंडरवर समान दबाव राहतो. काही ठिकाणी कमी-जास्त दबाव असल्यास ते धोकादायक ठरू शकते. (Why are oxygen cylinders round, This is the main reason, know it)
नवी दिल्ली : गॅस सिलेंडर असो किंवा गॅस टँकर असो एक गोष्ट आपल्या लक्षात आलीच असेल, ती म्हणजे गॅसचे सिलेंडर्स एकसारखेच असतात. सिलेंडर किंवा टँकमध्ये कोणत्याही प्रकारचे गॅस असो, ते सिलेंडर छोटे असो की मोठे, प्रत्येक सिलिंडर एकाच आकाराचा असतो. आपण पाहिले असेल की सिलेंडर नेहमी दंडगोलाकार आकाराचा असतो. हे कधीही चौरस किंवा गोलाकार नसते, मात्र असे का याबद्दल आपण कधी विचार केला आहे का?. यामागे एक महत्त्वाचे कारण आहे. खास वैज्ञानिक कारणांमुळे गॅस सिलेंडर्सना दंडगोलाकार आकार देण्यात आला आहे. सध्या सुरु असलेल्या कोरोना महामारीमध्येही आपणास लक्षात आले असेल की हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन नेणारे ट्रकही दंडगोलाकार असतात. (Why are oxygen cylinders round, This is the main reason, know it)
गॅस सिलेंडर का असतात दंडगोलाकार?
वास्तविक, जेव्हा जेव्हा एखाद्या पात्रात द्रव किंवा गॅस ठेवला जातो तेव्हा ते त्या पात्रातील कोप-यात सर्वात जास्त दबाव निर्माण करते. यामुळे गॅसचे चौरस टँकर बनविले जात नाहीत, कारण यामुळे चारही कोपऱ्यांवर अधिक दबाव येतो आणि कोपऱ्यातून गळती उद्भवण्याची किंवा पात्र फुटण्याचा धोका आहे. यामुळे ते चौरस बनवले जात नाहीत. गोल किंवा दंडगोलाकार असण्याचा फायदा असा आहे की संपूर्ण सिलिंडरवर समान दबाव राहतो. काही ठिकाणी कमी-जास्त दबाव असल्यास ते धोकादायक ठरू शकते.
अशा परिस्थितीत कॉर्नर्स नसलेल्या पात्रात कोणताही प्रेशरयुक्त गॅस वाहून नेणे सोपे आहे. याशिवाय, अनेक अहवालांमध्ये असे म्हटले आहे की जेव्हा टँकर दंडगोलाकार असतात आणि ट्रक किंवा वाहनावर लोड केले जाते तेव्हा ग्रेव्हिटी प्रेशर मेंटेन ठेवले जाते. यामुळे सेंटर ऑफ ग्रेव्हिटी कमी होते आणि ट्रक स्थिर राहतात आणि अपघात होण्याचा धोका नसतो. या कारणामुळे टँकर दंडगोलाकार आणि विना कॉर्नर्स असतात. हे केवळ भारतातच नाही परंतु सर्वत्र हा नियम पाळला जातो आणि सर्वत्र टँकर नेहमीच दंडगोलाकारच असतात.
गोल विहिरी अधिक मजबूत
गोल विहिरी इतर विहिरींपेक्षा जास्त मजबूत असतात. तसे फारच कमी चौकोनी विहिरी बांधल्या जातात, परंतु जरी त्या बांधल्या गेल्या तरी गोल विहिरी त्यांच्यापेक्षा अधिक मजबूत असतात. वास्तविक, गोल विहिरीला कोपरा नसतो आणि सर्व बाजूंनी गोल झाल्यामुळे पाण्याचा दाबही प्रत्येक बाजूवर समान राहतो. जर विहिर चौकोनी बनविली गेली तर केवळ चार कोपऱ्यात जास्त दबाव येईल. यामुळे, विहीर जास्त काळ टिकू शकणार नाही आणि त्याच्या कोसळण्याचा धोका देखील खूप जास्त असतो. (Why are oxygen cylinders round, This is the main reason, know it)
तुम्हाला आपल्या विशाल आकाशगंगेची गुपितं माहितेय? वाचा अचंबित करणारी 10 रहस्यhttps://t.co/fVXeGtQV6l#MikyWay #Akashganga #Space #Galaxy
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 27, 2021
इतर बातम्या
आपले पैसे असलेलं बँक खाते बंद झालंय, मग अशी काढा शिल्लक रक्कम
‘बीडमधील 22 मृतदेहांची अवहेलना संतापजनक’, पंकजा मुंडेंकडून नाव न घेता धनंजय मुंडेंवरही निशाणा