गाडीच्या नव्या टायरला का असतात छोटे-छोटे काटे? हे आहे त्यामागचं खरं कारण, 99 टक्के लोकांना नसेल माहीत

तुम्ही पाहिलं असेल की तुम्ही जेव्हा एखादं नवं वाहन खरेदी करता तेव्हा त्याच्या टायरला छोटे-छोटे स्पाईक जसं स्ट्रक्चर असतं. त्याचा आकार एखाद्या छोट्या काट्यांसारखा दिसतो.

गाडीच्या नव्या टायरला का असतात छोटे-छोटे काटे? हे आहे त्यामागचं खरं कारण, 99 टक्के लोकांना नसेल माहीत
Follow us
| Updated on: Nov 07, 2024 | 6:18 PM

तुम्ही पाहिलं असेल की तुम्ही जेव्हा एखादं नवं वाहन खरेदी करता तेव्हा त्याच्या टायरला छोटे-छोटे स्पाईक जसं स्ट्रक्चर असतं. त्याचा आकार एखाद्या छोट्या काट्यांसारखा दिसतो. आता प्रश्न असा निर्माण होतो की हे काटे या टायरला का असतात त्याचं नेमकं काम काय आहे.अनेकांना या पाठिमागचं खर कारण माहीत नसणार,आज आपण याबाबत माहिती जाणून घेणार आहोत.आपल्या सर्वांना एक गोष्ट ठावूक आहे की, सुरक्षेच्या दृष्टीकोणातून खराब झालेले आणि जास्त घासलेले वाहनांचे टायर बदलले जातात. तुम्ही सर्वांनी पाहीलं असेल की तुम्ही जेव्हा एखादी गाडी खरेदी करता तेव्हा त्या वाहनाच्या चाकांना छोटे- छोटे स्पाईक्स असतात. हे स्पाइक्स कडक नसतात, मऊ असतात मात्र ते वाहनांच्या चाकामध्ये एखादा काटा फसवा असे उभे दिसतात.

चाकांना लावण्यात आलेल्या या स्पाईकला अनेक नावं आहेत. काही ठिकाणी याला निब असं म्हणतात तर काही लोक याला निपर्स किंवा स्पाईक असं म्हणतात. तुम्ही कधी विचार केला आहे का? की हे स्पाईक या चाकांना नेमकं कशासाठी लावण्यात येतात, याचा काही खरच फायदा आहे की, फक्त लावायचे म्हणून लावण्यात आले आहेत.

टायर निर्माण होत असतानाच हे स्पाईक्स त्याच्यासोबतच तयार होतात, म्हणजे या काट्यांना किंवा स्पाईकला वाहनांच्या टायरला वेगळं लावण्यात येत नाही, किंवा त्याची वेगळी निर्मिती देखील होत नाही. टायर बनवताना सर्वात प्रथम द्रव रुपात असलेल्या रबराला साच्यामध्ये टाकलं जातं. द्रव रुपातील रबर हे संपूर्ण साच्यामध्ये पसरावं यासाठी हवेच्या दबावाचा उपयोग केला जातो.हवेच्या दबावामुळे रबर आणि साच्यामध्ये हवेचे बुडबुडे निर्माण होतात.

मात्र टायर बनत असताना हे जर हवेचे बुडबुडे तसेच राहिले तर त्याचा परिणाम हा चाकाच्या क्वॉलिटीवर होण्याची शक्यता असते. त्यामुळे हे बुडबुडे काढून टाकण्यासाठी एक विशिष्ट पद्धत वापरली जाते.टायरच्या छोट्या-छोट्या छिद्रांमधून हवा बाहेर काढली जाते. या प्रक्रियेदरम्यान रबराचा काही भाग टायरच्या वर येतो, हा भाग सुकल्यानंतर त्याचा आकार काट्या सारखा दिसतो. याचाच अर्थ हे स्पाईक्स स्पेशल तयार केले जात नाहीत.एखाद्या चाकाला स्पाईक्स आहेत, याचा अर्थ ते टायर नवं आहे असा त्याचा अर्थ होतो.

Non Stop LIVE Update
मनसेत नाराज? राज ठाकरेंच्या शिलेदारानं उद्धव ठाकरेंची मशाल घेतली हाती
मनसेत नाराज? राज ठाकरेंच्या शिलेदारानं उद्धव ठाकरेंची मशाल घेतली हाती.
अजित पवार की युगेंद्र पवार? बारामती कोणाची? काका-पुतण्या भिडले
अजित पवार की युगेंद्र पवार? बारामती कोणाची? काका-पुतण्या भिडले.
राणांची यशोमती ठाकूरांवर टीका, 'माझी नणंदबाई मेलेल्या माणसाच्या...'
राणांची यशोमती ठाकूरांवर टीका, 'माझी नणंदबाई मेलेल्या माणसाच्या...'.
'इंजिन-मनसे घेऊन बसा', पक्ष-चिन्हाच्या टीकेवर दादांचं राज यांना उत्तर
'इंजिन-मनसे घेऊन बसा', पक्ष-चिन्हाच्या टीकेवर दादांचं राज यांना उत्तर.
सलमान नंतर बॉलिवूडच्या 'या' सुपरस्टारच्या जीवाला धोका, आला धमकीचा फोन
सलमान नंतर बॉलिवूडच्या 'या' सुपरस्टारच्या जीवाला धोका, आला धमकीचा फोन.
राऊतांना 'सिल्व्हर ओक'चा बुलडॉग म्हटल तर चालेल का?, भाजप नेत्याचा सवाल
राऊतांना 'सिल्व्हर ओक'चा बुलडॉग म्हटल तर चालेल का?, भाजप नेत्याचा सवाल.
शरद पवारांच्या निवृत्तीवर अजितदादांचं मिश्कील भाष्य, 'मला तर मागचा...'
शरद पवारांच्या निवृत्तीवर अजितदादांचं मिश्कील भाष्य, 'मला तर मागचा...'.
खोत फडणवीसांचा कुत्रा तर राऊत साप, दोघांच्या भांडणात भाजप नेत्याची उडी
खोत फडणवीसांचा कुत्रा तर राऊत साप, दोघांच्या भांडणात भाजप नेत्याची उडी.
'डुक्कराला कितीही साबण शॅम्पू लावला तरी ते..', खोतांचा राऊतांवर पटलवार
'डुक्कराला कितीही साबण शॅम्पू लावला तरी ते..', खोतांचा राऊतांवर पटलवार.
पवारांवरील त्या वक्तव्यानंतर खोत म्हणाले, 'ही गावगाड्याची भाषा पण...'
पवारांवरील त्या वक्तव्यानंतर खोत म्हणाले, 'ही गावगाड्याची भाषा पण...'.