डेबिट कार्डऐवजी OTP ची पॉवर! आता पैसे काढण्यासाठी ATM ची पण नाही गरज!

Virtual ATM | तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. आता छोट्या-छोट्या रक्कमेसाठी एटीएम शोधण्याची गरज नाही. सध्या एटीएमची संख्या वाढली आहे. पण एटीएममधून छोटी रक्कम निघत नाही. इच्छा नसताना मोठी रक्कम काढावी लागते. त्यानंतर सुट्टे करण्यासाठी जुगाड करावा लागतो. पण व्हर्च्युअल एटीएमच्या मदतीने तुम्हाला एका ओटीपीवर रोख रक्कम मिळेल, कशी ते घ्या जाणून..

डेबिट कार्डऐवजी OTP ची पॉवर! आता पैसे काढण्यासाठी ATM ची पण नाही गरज!
Follow us
| Updated on: Feb 15, 2024 | 11:07 AM

नवी दिल्ली | 15 February 2024 : आता छोटी रक्कम काढण्यासाठी तुम्हाला एटीएम मशीन शोधण्याची गरज नाही. त्यांना सोबत त्यांचे डेबिट वा क्रेडिट कार्ड बाळगण्याची पण गरज नाही. एका ओटीपी आधारे तुम्हाला रक्कम मिळू शकते. व्हर्च्युअल एटीएम तुमची पैशांची चणचण दूर करेल. विशेष म्हणजे त्यासाठी मोठी रक्कम काढण्याची गरज नाही. छोटी रक्कम तुम्हाला काढता येईल. सध्या युपीआयचे प्रचलन वाढले आहे. अगदी खेड्यात पण तुम्हाला युपीआय कोड सहज मिळून जाईल. पण युपीआयच्या वाढत चाललेल्या फसवणुकीमुळे अनेक जण पण रोख रक्कम स्वीकारण्यावर भर देत आहे. शहरातही असाच प्रकार पहायला मिळतो. अनेक दुकानदार रोखीत व्यवहार करतात. अशावेळी डेबिट कार्ड सोबत नसेल, रोख रक्कम नसेल तर अडचण होते. व्हर्च्युअल एटीएम काय आहे, त्याचा वापर कसा करता येईल, कुठे मिळेल ही रक्कम, जाणून घ्या

या कंपनीचा उपाय

पेमार्ट इंडियाने छोट्या रक्कमेबाबत मोठी भूमिका घेतली आहे. चंदीगड येथील या फिनटेक कंपनीने व्हर्च्युअल, कार्डलेस आणि हार्डवेअर-लेस कॅश विदड्रॉल सेवा सुरु केली आहे. या सेवेमुळे ग्राहकांना आता रोख रक्कम काढण्यासाठी एटीएम मशीन शोधण्याच्या भानगडीत पडायचे काम नसेल. तर त्याच्याकडे डेबिट कार्ड नसले तरी रोख रक्कम काढता येणार आहे. रोख रक्कम काढण्यासाठी ग्राहकांना पिन क्रमांकाची गरज नसेल. पण त्यांना एक ओटीपीची गरज असेल. पेमार्ट इंडिया प्रायव्हेट कंपनीचे संस्थापक आणि सीईओ अमित नारंग या सेवेला व्हर्च्युअल एटीएम असे म्हणतात.

हे सुद्धा वाचा

कसा करता येईल व्हर्च्युअल एटीएमचा वापर

  1. व्हर्च्युअल एटीएमच्या मदतीने पैसे काढण्यासाठी तुम्हाला केवळ एक स्मार्टफोन, मोबाईल बँकिंग एप आणि इंटरनेट कनेक्शनची गरज आहे. त्यासाठी अगोदर बँकेच्या एपमध्ये रोख रक्कम काढण्यासाठी विनंती करावी लागेल. मोबाईल बँकिंग एपवर तुमचा बँकेत नोंद असलेला मोबाईल क्रमांक त्यासाठी वापरता येईल.
  2. तुम्हाला संबंधित जवळच्या दुकानदाराकडे छोटी रक्कम मागावी लागेल. लक्षात ठेवा ही सुविधा केवळ छोट्या रक्कमेसाठी आहे. मोठ्या रक्कमेसाठी ही सुविधा नसेल. छोट्या रक्कमेला पण काही मर्यादा असेल. संबंधित दुकानदार, टपरीधारकाकडे याविषयीचे यंत्र असेल. त्याआधारे हा व्यवहार पूर्ण होईल.
  3. त्यानंतर तुमचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी बँक एक ओटीपी क्रमांक पाठवेल. तुमच्या नोंदणीकृत क्रमांकावर हा ओटीपी पाठविण्यात येईल. पेमार्टच्या यादीतील जवळच्या दुकानदाराला हा ओटीपी क्रमांक तुम्हाला दाखवावा लागेल. तो तुम्हाला विनंती केलेली रक्कम रोखीत देईल.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....