Twitter विकत घेतल्यानंतर Elon Musk प्लॅटफॉर्ममध्ये बदल करणार?
गेल्या काही दिवसांपासून मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटर (Twitter) चर्चेत आहे आणि याचे कारण आहे टेस्लाचे सीईओ (Tesla CEO) एलॉन मस्क. काही दिवसांपासून, ते ट्विटरबद्दल ट्विट आणि पोल पोस्ट करत होते.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटर (Twitter) चर्चेत आहे आणि याचे कारण आहे टेस्लाचे सीईओ (Tesla CEO) एलॉन मस्क. काही दिवसांपासून, ते ट्विटरबद्दल ट्विट आणि पोल पोस्ट करत होते आणि नंतर अचानक एसईसी फाइलिंगमध्ये हे उघड झाले की एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरमध्ये 9.2% स्टेक विकत घेतले आहेत. त्याच वेळी, ते कंपनीचे सर्वात मोठे भागधारक बनले आहेत. यानंतर ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी एलॉन मस्क लवकरच ट्विटरच्या बोर्डावर सहभागी होणार असल्याची घोषणा केली. मात्र, मस्क यांनी ज्या स्टेक खरेदी केले त्याच दिवशी त्यांनी बोर्डात सहभागी होण्यास नकार देऊन सर्वांनाच चकित केले.
ट्विटर आणि मस्क यांच्यातील सुरू असलेला खेळ इथेच संपत नाही, तर 14 एप्रिलला त्यांनी स्वतः ट्विटर विकत घेण्याची ऑफर दिली. मस्क यांनी प्रति शेअर 54.20 डॉलर्सच्या भावाने ट्विटर विकत घेण्याची ऑफर दिली. त्यांनी संपूर्ण कंपनीचे मूल्य सुमारे 43 अब्ज डॉलर्स (सुमारे 3,509 अब्ज रुपये) ठेवले आहे. आता प्रश्न असा आहे की एलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यास ते या प्लॅटफॉर्ममध्ये काही बदल करू शकतील का?
Elon Musk यांच्या एंट्रीनंतर काय होईल?
या प्रश्नाचे योग्य उत्तर केवळ एलॉन मस्क देऊ शकतात. परंतु तुम्हीदेखील निश्चितपणे याचा अंदाज लावू शकता. यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे मस्क यांचे ट्विटर अकाउंट फॉलो करणे. एलॉन मस्क ट्विटरवर खूप सक्रिय आहेत आणि गेल्या काही दिवसांपासून ते ट्विटरवर पोल आणि इतर ट्वीट्स करत आहेत. अशा स्थितीत हा प्लॅटफॉर्म त्यांच्या ताब्यात आल्यानंतर नवीन काय घडू शकते, याचा अंदाज लावता येईल.
ट्विटर बदलेल का?
मस्क यांना ट्विटरला पूर्णपणे फ्री स्पीच प्लॅटफॉर्म बनवायचे आहे. फ्री स्पीच (भाषा स्वातंत्र्य) म्हणजे कोणालाही इथे व्यक्त होताना रोखले जाऊ नये आणि यासाठी कंटेंट मॉडरेशन पॉलिसी बदलावी लागेल. याआधी त्यांनी एक ट्विट केले होते, ज्यात मस्क यांनी ट्विटर ‘मरत आहे का’ असा सवाल केला होता.
मस्क यांनी ’10 टॉप’ ट्विटर अकाऊंटची यादी देखील शेअर केली होती आणि सांगितले होते की या यादीतील काही लोक प्लॅटफॉर्मवर खूप कमी कंटेंट पोस्ट करतात. मस्क यांनी टेलर स्विफ्टचे (Taylor Swift) नाव घेतले आणि सांगितले की गेल्या तीन महिन्यांत तिने एकही पोस्ट केलेली नाही.
याशिवाय त्यांनी ट्विटरवर एडिट बटण जोडण्याबाबतही सांगितले. यावर त्यांनी एक पोलही तयार केला होता. मस्क यांनी सबस्क्रिप्शन-आधारित सेवा ट्विटर ब्लूमध्ये काही अतिरिक्त फीचर्स जोडण्याबद्दल सांगितले होते. मात्र, हे सर्व बदल होतील की नाही, याबाबत कोणतीही माहिती नाही.
इतर बातम्या
10 हजारांच्या रेंजमधला Vivo स्मार्टफोन आणखी स्वस्त, कंपनीकडून किंमतीत कपात
युनिक लूकसह Realme 9 Pro + चं Free Fire लिमिटेड एडिशन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Apple WWDC 2022: जूनमध्ये येणार ‘ॲपल’चे ‘मॅक मिनी’ आणि ‘नवीन मॅकबुक प्रो’ डिझाईन