Elon Musk Starlink : Jio ला देणार टक्कर, स्वस्तात मिळणार का इंटरनेट सेवा
Elon Musk Starlink : एलॉन मस्क भारतात सॅटेलाईट बेस्ड इंटरनेट आणण्याच्या तयारीत आहे. SpaceX ची स्टारलिंक सर्व्हिसेस देशातील ग्रामीण आणि दुर्गम भागात इंटरनेटची सुविधा आणण्याच्या तयारीत आहे.स्टारलिंकची ही सेवा देशात कधीपासून सुरु होत आहे. त्याची किंमत किती असेल आणि या प्राईस वॉरमध्ये ग्राहकांचा खरंच फायदा होणार?
नवी दिल्ली | 4 ऑक्टोबर 2023 : एलॉन मस्क याने उपग्रह आधारीत इंटरनेट (Satellite based Internet) सेवा स्टारलिंक इंडिया (Starlink India) सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मस्क याला भारत सरकारकडून ग्लोबल मोबाइल पर्सनल कम्युनिकेशन बाय सॅटेलाइट (GMPCS) याचा परवाना मिळू शकतो. मस्क याची ही नवीन सेवा देशात सॅटेलाईच्या माध्यमातून हाय-स्पीड इंटरनेट पोहचवेल. त्याचा वेग जोरदार असेल. स्टारलिंक यासाठी फायबर केबलसारखी खर्चिक प्रक्रिया यासाठी राबवावी लागणार नाही. तसेच ही सेवा अतिदुर्गम भागात पण सहज इंटरनेट पोहचवेल. त्यामुळे देशात स्वस्त इंटरनेटची लाट येण्याची शक्यता आहे.
काही आठवड्यातच परवानगी
केंद्र सरकारकडून लवकरच स्टारलिंकला सर्व परवानगी मिळण्याची शक्यता आहे. परवानगी मिळताच ही कंपनी देसात स्पेक्ट्रमसाठी पात्र होईल. कंपनी भारतीय ग्राहकांपर्यंत ब्रॉडब्रँड सेवा पोहचवेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार स्टारलिंक डिपार्टमेंट ऑफ स्पेस, डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन, गृह खात्याकडून परवानगीची तयारी करत आहे. काही आठवड्यातच ही परवानगी मिळण्याची शक्यता आहे.
कंपनीने मागितली परवानगी
एलॉन मस्क याच्या मालकीची कंपनी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात GMPCS परवान्यासाठी परवानगी मागणार आहे. याशिवाय कंपनीने नॅशनल स्पेस प्रोमोशन अँड अथॉरॉयजेशन सेंटरकडे (IN-SPACe) पण परवानगी मागितली आहे. भारतात इंटरनेट सेवा देण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Starlink ची अशी मिळेल सेवा
सध्या पृथ्वीच्या कक्षेत फिरणाऱ्या सक्रिय अनेक उपग्रहात SpaceX ची मोठी भागीदारी आहे. तर अनेक सॅटेलाईट या कंपनीचे आहेत. स्टारलिंक संपूर्ण पृथ्वीवर कुठे पण इंटरनेट सेवा पुरविण्यासाठी सक्षम आहे. ही कंपनी सॅटेलाईटच्या माध्यमातून सेवा देते. त्यामुळे तांत्रिक अडचणींचा अडथळा कमी येतो. स्पेसएक्सच्या सॅटेलाईट पृथ्वीपासून 550 किलोमीटर दूर त्यामुळे कनेक्शनची अडचण येणार नाही.
Starlink चे इंटरनेट कितीला
आता स्टारलिंकचा ऑपटिकल फायबरचा खर्च वाचणार असला तरी इतर सेवेसाठी मोठा खर्च आहे. सॅटेलाईट इंटरनेटमुळे ही सेवा स्वस्तात मिळणार नाही. त्यासाठी प्रत्येक महिन्याला मोठा खर्च करावा लागणार आहे. 8,000-10,000 रुपये खर्च त्यासाठी करावा लागेल. त्यामुळे जिओला स्टारलिंक कितपत टक्कर देऊ शकेल हे वेगळं सांगायची गरज नाही.