आठवड्यात किमान 70 तास काम? या दिग्गज कंपन्या कर्मचाऱ्यांसाठी एकदम बेस्ट
Working Hour | Infosys चे एन आर नारायण मूर्ती यांना देशातील तरुणाईला 70 तास काम करण्याचा सल्ला दिला आणि एकच हल्लाबोल झाला. अनेकांना हा सल्ला रुचला नाही. आयटी कंपन्यांना गुलाम हवे आहेत का? अशा तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. जगातील या दिग्गज आयटी कंपन्यात कर्मचाऱ्यांना इतके तास काम करावे लागते.
नवी दिल्ली | 29 ऑक्टोबर 2023 : इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी तरुणाईला एका आठवड्यात किमान 70 तास काम करण्याचा सल्ला दिला. चीनसह इतर देशांना टफ फाईट देण्यासाठी भारताचे वर्क कल्चर बदलण्याचे विचार त्यांनी मांडले. सरकारी कर्मचाऱ्यांच्या कार्य पद्धतीवर त्यांनी सडकून टीका केली. मोहनदास पै यांच्या पॉडकास्ट ‘The Record’ मध्ये त्यांनी या भावना व्यक्त केल्या. अर्थात त्यावरुन गदारोळ माजला. अनेकांना हा सल्ला रुजला नाही. अनेक तरुणांनी त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. तर काहींनी इन्फोसिस कमी पगारात नव कर्मचाऱ्यांना राबवून घेत असल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकल्या. या वादात नेटिझन्सने आयटी कंपन्यात किती तास काम करावं लागते याविषयीचा कीवर्ड लागलीच गुगलवर सर्च केला.
काय आहेत भावना
नारायण मूर्ती यांच्या मतांवर अनेकांनी तात्काळ प्रतिसाद दिला. काही तरुणांनी 70 तास राबायला सुद्धा तयारी दर्शवली पण त्यासाठी 3.5 लाखांचं वार्षिक पॅकेज कितपत योग्य असल्याचा रोकडा सवाल केला. अनेकांनी फ्रेशर्सकडून कंपन्या जादा तास काम करुन घेतात आणि त्यांना 3.5 लाखांचा वार्षिक पगार टेकवतात असे दुखणे मांडले. कोरोनानंतर महागाईने मोठी उडी घेतली आहे. सर्वच वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. जीवनमान उंचावले आहे. अशावेळी हे पॅकेज तुटपूंजे असल्याचा दावा तरुणाईने केला आहे.
भारतातील आयटी कंपन्यांमध्ये किती तास काम
अनेक लोकांच्या मते आठवड्याला 70 तासांचे काम कर्मचाऱ्यांना थकवून टाकेल. त्यांची शारीरिक आणि मानसिक कुंचबणा होईल. ते आजारी पडल्याशिवाय राहणार नाही. कार्यालयीन कार्य संस्कृती जितकी आरोग्यदायी असेल, तितका कर्मचारी आपणहून कार्यालयात रमतो. पण त्याला केवळ टार्गेटकुमार केले तर कर्मचारी व्यवस्थित काम करत नाही. भारतीय आयटी कंपन्यांमध्ये सध्या 5 दिवसांचा आठवडा आहे. पण अनेक कर्मचाऱ्यांना 12-14 तास कार्यालयात थांबावे लागते. तसेच कार्यालयात पोहचण्यासाठी वेगळा वेळ लागतो. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची पुरेशी झोप सुद्धा होत नाही.
फोर्ब्स नुसार, या आहेत जगातील बेस्ट टेक कंपन्या
&n
- सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स : 45 तासांचा कार्यालयीन आठवडा
- मायक्रोसॉफ्ट : 40 तासांचा कार्यालयीन आठवडा
- अल्फाबेट : दिवसाला 8 तासांचे काम
- एप्पल : या कंपनीत दिवसाला 8 तासांचे काम
- आयबीएम : 8 तासांचे काम दिवसाला
- एडोबे : 40 तासांचा कार्यालयीन आठवडा
- डेल टेक्नॉलॉजी : 40 तासांचा कार्यालयीन आठवडा
- पेपल : या कंपनीत दिवसाला 8 तासांचे काम
- एमेझॉन : 40 तासांचा कार्यालयीन आठवडा