I LoveYou ते … तुमच्या अकाऊण्टची सुरक्षितता धोक्यात घालणारे 100 पासवर्ड्स

जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे आणि सर्वात कमकुवत पासवर्ड्सची (Weak Password) एक यादी समोर आली आहे.

I LoveYou ते ... तुमच्या अकाऊण्टची सुरक्षितता धोक्यात घालणारे 100 पासवर्ड्स
Follow us
| Updated on: Nov 19, 2020 | 9:56 PM

मुंबई : नॉर्डपासकडून (NordPass) जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे आणि सर्वात कमकुवत पासवर्ड्सची (Weak Password) एक यादी जारी करण्यात आली आहे. यापैकी कोणताही पासवर्ड जर तुम्ही वापरत असाल तर तुम्ही तातडीने पासवर्ड बदलायला, कारण हे पासवर्ड अगदी काही सेकंदांमध्ये हॅक केले जाऊ शकतात. (Worst Passwords of 2020 that can be hacked in less than one seconds; NordPass Report)

नॉर्डपासने 2020 या वर्षात वापरले गेलेले सर्वात कमकुवत (Weak) पासवर्ड्सची एक लिस्ट जारी केली आहे. त्यात त्यांनी एखादा पासवर्ड किती जणांनी, किती वेळा वापरला आहे. एखादा पासवर्ड किती वेळा लीक झाला आहे. याबाबतचा डेटा सादर केला आहे. तसेच कंपनीने काही पासवर्ड क्रॅक करण्यासाठी किती वेळ लागतो, किंवा ठराविक प्राकरचा पासवर्ड क्रॅक करण्यास हॅकरला किती वेळ लागू शकतो याबाबतची माहिती जाहीर केली आहे.

युजर्स कशाप्रकारचे पासवर्ड ठेवतात, ते पासवर्ड लक्षात ठेवण्यासाठी काय करतात, याबाबतची माहितीदेखील या रिपोर्टमध्ये मांडण्यात आली आहे. नॉर्डपासच्या या रिपोर्टनुसार 2020 या वर्षात तब्बल 2,756,99,516 पासवर्ड लीक झाले आहेत.

सर्वाधिक वापर होणारे पासवर्ड्स

नॉर्डपासने जारी केलेल्या रिपोर्टमध्ये सर्वाधिक वापर होणाऱ्या पासवर्डची यादी देण्यात आली आहे. त्यानुसार 123456, 123456789, picture1, password, आणि 12345678 हे पासवर्ड सर्वाधिक वापरले जातात. यापैकी picture1 हा पासवर्ड सोडला तर बाकीचे सगळे पासवर्ड अवघ्या काही सेंकंदांमध्ये क्रॅक करता येतील.

सर्वाधिक वापरले जाणारे टॉप 20 पासवर्ड्स

123456 123456789 picture1 password 12345678 111111 123123 12345 1234567890 senha 1234567 qwerty abc123 Million2 000000 1234 iloveyou aaron431 password1 qqww1122

(*या पासवर्ड्ससह इतर 200 कॉमन पासवर्ड्सबाबत जाणून घेण्यासाटी nordpass ची वेबसाईट पाहा)

पासवर्ड कसा निवडायचा

पासवर्ड निवडताना युजरने ठराविक पॅटर्न्स, आणि रिपिटेशन्स (पुनरावृत्ती) टाळायला हवं. 12345, abcdef, asdfgh असे पासवर्ड निवडू नयेत. युजरने शक्यतो अल्फान्युमरीक पासवर्ड्स निवडायला हवेत. म्हणजेच पासवर्डमध्ये अंक, अक्षरं, सिम्बॉल या सर्वांचा समावेश असायला हवा. तसेच एखादं अक्षर कॅपिटल लेटर असावं. पासवर्डमध्ये खासगी माहिती नसावी, जसे की, तुमची जन्मतारीख, तुमचं नाव या गोष्टींचा वापर टाळावा. युजरने स्वतःचे नाव आणि जन्मतारीख वापरून अल्फान्युमरिक पासवर्ड जरी सेट केला असला तरी तो पासवर्ड क्रॅक करणं सोपं असतं.

संबंधित बातम्या

Whatsapp वर व्हिडीओ शेअर करता? तुमच्यासाठी कंपनीने नवं फिचर आणलंय

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने फेसबुक आक्षेपार्ह कंटेंटवर त्वरित कारवाई करणार

(Worst Passwords of 2020 that can be hacked in less than one seconds; NordPass Report)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.